Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केमिकलयुक्त वॅक्स लावून त्वचा लाल होते? कडुलिंबाच्या पानांपासून सोप्या पद्धतीमध्ये घरीच करा वॅक्सिंग, नैसर्गिक उपाय ठरेल प्रभावी

बाजारात उपलब्ध असलेले हानिकारक वॅक्सिंग करण्यापेक्षा घरच्या घरी कडुलिंबाच्या पानांचा वापर करून वॅक्सिंग करू शकता. यामुळे तुमची त्वचा आणि निरोगी राहील. जाणून घ्या वॅक्स तयार करण्याची कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: May 15, 2025 | 09:47 AM
कडुलिंबाच्या पानांपासून सोप्या पद्धतीमध्ये घरीच करा वॅक्सिंग

कडुलिंबाच्या पानांपासून सोप्या पद्धतीमध्ये घरीच करा वॅक्सिंग

Follow Us
Close
Follow Us:

सर्वच महिलांना सुंदर आणि चमकदार त्वचा हवी असते. सुंदर दिसण्यासाठी महिला हेअर स्पा, हेअर केअर ट्रीटमेंट, वॅक्सिंग, क्लीनअप इत्यादी अनेक गोष्टी करतात. शरीरावर वाढलेले अनावश्यक केस काढण्यासाठी वॅक्सिंग केले जाते. तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या क्रीमचा वापर करून हात आणि पायांवरील केस काढले जातात. मात्र बाजारात उपलब्ध असलेल्या केमिकल युक्त वॅक्सिंगमुळे त्वचा खराब होण्याची जास्त शक्यता असते. याशिवाय वॅक्स गरम झाल्यानंतर त्वचा लाल होणे किंवा त्वचेसंबंधित समस्या उद्भवू लागतात. आज आम्ही तुम्हाला कडुलिंबाच्या पानांचा वापर करून सोप्या पद्धतीमध्ये घरच्या घरी वॅक्सिंग करण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. या पद्धतीने वॅक्सिंग केल्यास त्वचा कधीच खराब होणार नाही.(फोटो सौजन्य – iStock)

अंघोळ करताना केलेल्या ‘या’ चुका महिलांच्या आरोग्यासाठी ठरू शकतात घातक! त्वचा आणि नाजूक अवयवांचे होईल नुकसान

कडुलिंबाच्या पानांमध्ये असलेले आयुर्वेदिक गुणधर्म त्वचेवरील बॅक्टरीया कमी करण्यास मदत करतात. कडुलिंबाची पाने आरोग्य आणि सौंदर्यसाठी विशेषता वापरली जातात. आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेली कडुलिंबाची पाने अंगावर पुरळ, त्वचेवरील फोड किंवा मुरुमांचे डाग घालवण्यासाठी मदत करतात. केमिकलयुक्त प्रॉडक्टचा वापर करून त्वचेचे नुकसान करून घेण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करून त्वचेची काळजी घ्यावी. नैसर्गिक गुणधर्म असलेली कडुलिंबाच्या पानांचे सेवन केल्यास शरीरातील विषारी घाण स्वच्छ होते आणि चेहरा सुंदर आणि उजळदार दिसू लागतो.

हातापायांवर वाढलेले अनावश्यक केस काढून टाकण्यासाठी वॅक्सिंग केले जाते. मात्र वॅक्सिंग केल्यामुळे त्वचेवरील केस निघून जातात पण त्वचा मात्र अतिशय रुक्ष आणि कोरडी होऊन जाते. चॉक्लेट वॅक्स, एलोवेरा वॅक्स इत्यादी अनेक वेगवेगळे वॅक्स वापरले जातात. पण काहींची त्वचा अतिशय संवेदनशील किंवा नाजूक असते. त्यामुळे त्यांना त्वचेसंबंधित समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. कडुलिंबाची पाने त्वचेला कोणतेही हानी पोहचवता त्वचा स्वच्छ करण्यासाठीं मदत करतात.

कडुलिंबाच्या पानांपासून सोप्या पद्धतीमध्ये बनवा वॅक्स:

साहित्य:

  • कडुलिंबाच्या पानांची पावडर
  • गूळ
  • लिंबाचा रस

कृती:

  • वॅक्स तयार करताना सर्वप्रथम, मोठ्या भांड्यात किसून घेतलेले गूळ घेऊन त्यात लिंबाचा रस टाकून मिक्स करून घ्या.
  • तयार केलेल्या मिश्रणात कडुलिंबाची पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. तयार करून घेतलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवून मिश्रण पूर्णपणे वितळवून घ्या.
  • ५ मिनिटं झाल्यानंतर कडुलिंबाच्या पावडरचे मिश्रण घट्ट होण्यास सुरुवात होईल. त्यानंतर गॅस बंद करून मिश्रण वाटीमध्ये काढा.
वाढत्या उन्हाळ्यात तेलकट त्वचेची ‘या’ पद्धतीने घ्या काळजी, चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल होईल कमी

वॅक्स करण्याची सोपी पद्धत:

वॅक्स करताना सगळ्यात आधी तयार केलेले वॅक्स हलकेसे थंड झाल्यानंतर त्वचेवर लावून घ्या. त्यानंतर वॅक्सच्या पटीने ओढून घ्या. यामुळे तुमचे केस सहज निघतील आणि हातापायांच्या त्वचेला कोणतीही इजा होणार नाही. कडुलिंबाच्या पानांमध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म त्वचा आतून स्वच्छ करतात. त्वचेवरील जंतुसंसर्ग, पुरळ, मुरुम, फोड घालवण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचा वापर करावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Waxing at home in an easy way with neem leaves benefits of neem

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2025 | 09:47 AM

Topics:  

  • benefits of neem
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

उन्हामुळे काळवंडलेली त्वचा होईल आठवडाभरात गोरीपान! बटाट्याच्या रसात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, चेहरा राहील कायमच फ्रेश
1

उन्हामुळे काळवंडलेली त्वचा होईल आठवडाभरात गोरीपान! बटाट्याच्या रसात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, चेहरा राहील कायमच फ्रेश

ग्लोइंग स्किनसाठी महागडे डाएट किंवा क्रीम वापरण्याऐवजी आहारात ‘या’ पेयांचा समावेश, त्वचा होईल देखणी
2

ग्लोइंग स्किनसाठी महागडे डाएट किंवा क्रीम वापरण्याऐवजी आहारात ‘या’ पेयांचा समावेश, त्वचा होईल देखणी

चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्यांमुळे त्वचेवरील ग्लो हरवला आहे? मग गुलाबी पाणी आणि तुरटीचा ‘या’ पद्धतीने करा वापर
3

चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्यांमुळे त्वचेवरील ग्लो हरवला आहे? मग गुलाबी पाणी आणि तुरटीचा ‘या’ पद्धतीने करा वापर

चेहऱ्यावरील डेड स्किन आठवडाभरात होईल नष्ट! उजळदार त्वचेवर घरीच तयार करा नैसर्गिक स्क्रब, त्वचा होईल स्वच्छ
4

चेहऱ्यावरील डेड स्किन आठवडाभरात होईल नष्ट! उजळदार त्वचेवर घरीच तयार करा नैसर्गिक स्क्रब, त्वचा होईल स्वच्छ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.