वाढत्या उन्हाळ्यात तेलकट त्वचेची 'या' पद्धतीने घ्या काळजी
राज्यासह संपूर्ण देशभरात कधी ऊन तर कधी पाऊस पडत आहे. अवकाळी पावसाला सुरुवात झाल्यामुळे आरोग्यासंबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्वचेमध्ये होणारे बदल, केसांसंबधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. उन्हात कुठेही बाहेर फिरून आल्यानंतर त्वचा अतिशय चिकट किंवा तेलकट होऊन जाते. यामुळे उन्हाळ्यात त्वचेची जास्त काळजी घ्यावी. तेलकट झालेली त्वचा योग्य वेळी स्वच्छ करणे आवश्यक आहे. अन्यथा तेलकट थरामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येणे, मोठं मोठे फोड येणे, मुरूम इत्यादी अनेक समस्या उद्भवू शकतात. चेहऱ्यावर असलेल्या ओपन पोर्समुळे त्यात अतिरिक्त घाण आणि धूळ माती तशीच साचून राहते. यामुळे चेहऱ्यावर अनेक समस्या उद्भवू लागतात.(फोटो सौजन्य – iStock)
‘या’ लोकांनी चुकूनही करू नका हेअर ट्रान्सप्लांट, ट्रीटमेंटनंतर होऊ शकतो मृत्यू, वेळच व्हा सावध
चेहऱ्यावर अतिरिक्त तेल जमा होण्यास सुरुवात झाल्यानंतर बऱ्याच महिला बाजारात उपलब्ध असलेले वेगवेगळे सिरम, स्किन केअर प्रॉडक्ट किंवा इतर अनेक गोष्टी चेहऱ्यावर लावतात. मात्र हे स्किन केअर प्रॉडक्ट त्वचेला सूट न झाल्यामुळे चेहरा आणखीनच खराब होऊन जातो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला तेलकट त्वचेची कशा प्रकारे काळजी घ्यावी, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी होईल आणि चेहरा सुंदर उजळदार दिसू लागेल.
उन्हाळा वाढल्यानंतर चेहऱ्यावर जमा होणारे अतिरिक्त तेल कमी करण्यासाठी चेहरा नेहमी कोमट पाण्याने स्वच्छ करावा. कोमट पाण्याने त्वचा स्वच्छ केल्यास चेहऱ्यावरील घाण स्वच्छ होईल. वाढलेले प्रदूषण आणि धूळ मातीपासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ करावा.
आपल्यातील अनेकांना चेहरा सतत धुवण्याची सवय असते. मात्र सतत चेहरा पाण्याने धुतल्यामुळे त्वचेमधील ओलावा कमी होतो आणि चेहरा रुक्ष, कोरडा दिसू लागतो. त्यामुळे दिवसभरातून दोनदाच चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावा. जास्त पाण्याने त्वचा स्वच्छ केल्यास चेहऱ्यावर अतिरिक्त तेल जमा होऊ लागते.
सर्वच महिलांना नेहमीच मेकअप करण्याची सवय असते. मेकअप केल्यामुळे तुम्ही सुंदर आणि उठावदार दिसता. पण दिवसभर मेकअप करून राहिल्यामुळे त्वचा निस्तेज आणि कोरडी पडून जाते. त्यामुळे मेकअप केल्यानंतर तो योग्य वेळी स्वच्छ करणे आवश्यक आहे. खोबऱ्याचे तेल, कोरफड जेल किंवा बाजारात मिळणाऱ्या स्किन ऑइलचा वापर करून मेकअप काढून घ्यावा.