अंघोळ करताना केलेल्या 'या' चुका महिलांच्या आरोग्यासाठी ठरू शकतात घातक
शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी नियमित अंघोळ केली जाते . अंघोळ केल्यामुळे शरीरावर घामाचा वास, दुर्गंधी कमी होऊन शरीर स्वच्छ होते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर नियमित अंघोळ करावी. अंघोळ केल्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. याशिवाय कायम फ्रेश वाटते. शरीराच्या स्वच्छतेसाठी सर्वच लोक नियमित अंघोळ करतात. मात्र बऱ्याचदा महिला अंघोळ करताना अनेक चुका करतात. या चुका शरीर, त्वचा, केसांसंबधित असतात. अंघोळ करताना केलेल्या चुकांचा परिणाम संपूर्ण आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला महिलांनी अंघोळ करताना कोणत्या चुका करू नये? या चुका केल्यामुळे शरीराचे कोणते नुकसान होते? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
केसांच्या स्वच्छतेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. पण केस स्वच्छ करण्यासाठी वारंवार शँम्पूचा वापर करू नये. सतत शँम्पूचा वापर केल्यामुळे केसांचे गंभीर नुकसान होते. यामध्ये असलेले हानिकारक केअमिकल्स केसांसाठी अतिशय घातक आहे. त्यामुळे नियमित केस स्वच्छ करताना शाम्पूचा वापर करू नये. सतत शँम्पू वापरल्यामुळे केसांमधील नैसर्गिक तेल निघून जाते आणि केस कोरडे किंवा निस्तेज होऊन जातात. त्यामुळे केसांची काळजी घेताना केसांना कोणतेही केमिकल शॅम्पू लावू नये. त्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच केस स्वच्छ करावे.
अंघोळ केल्यामुळे शरीर कोरडे करण्यासाठी अस्वच्छ टॉवेलचा वापर करू नये. यामुळे शरीरावर लाल रॅश किंवा त्वचेवर पुरळ येऊ शकतात. त्यामुळे नेहमीच स्वच्छ टॉवेलचा वापर करावा. अंग घासण्यासाठी वापरला जाणारा लूफा पूर्ण स्वच्छ करून घ्यावा. तसेच दोन किंवा तीन आठवड्यातून एकदा लूफा बदलणे आवश्यक आहे. याशिवाय दोन किंवा तीन दिवसांनी टॉवेल स्वच्छ धुवून कोरडा करूनच वापरावा.
स्त्रिया नाजूक अवयवांची स्वच्छता करण्यासाठी इंटिमेट वॉश किंवा साबणाचा वापर करतात. मात्र जास्त तीव्र साबणाचा वापर नाजूक अवयव स्वच्छ करण्यासाठी वापरू नये. यामुळे शरीराचे नुकसान होण्याची जास्त शक्यता असते. शरीराच्या संवेदनशील भागांचे पीएच खराब झाल्यानंतर ते सुधारण्यासाठी कोणत्याही प्रॉडक्टचा वापर करू नये. यामुळे संसर्ग किंवा कोणताही त्वचा रोग होऊ शकतो. त्यामुळे नाजूक अवयवांच्या स्वच्छतेसाठी अतिशय सौम्य आणि चांगल्या दर्जाच्या प्रॉडक्टचा वापर करावा.