Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health Tips: बदलत्या हवामानात वाढतो आजारांचा धोका; अशी घ्या योग्य काळजी

Weather change causes health issues: हवामानातील सतत होणारे बदल शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करून सर्दी, खोकला, ताप आणि व्हायरल संसर्गाचा धोका वाढवू शकतात. त्यामुळे या काळात आरोग्याची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 18, 2026 | 07:37 PM
Health Tips: बदलत्या हवामानात वाढतो आजारांचा धोका; अशी घ्या योग्य काळजी
Follow Us
Follow Us:
  • बदलत्या हवामानात वाढतो आजारांचा धोका
  • अशी घ्या योग्य काळजी
  • रोगप्रतिकारशक्ती मजबूत करा
हवामानातील सतत होणारे बदल आरोग्यासाठी मोठे आव्हान ठरू शकतात. सकाळी उकाडा, दुपारी कडक ऊन आणि संध्याकाळी पाऊस किंवा गारवा अशा बदलांमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती प्रभावित होते. विशेषत: आता उन्हाळा संपून थोड्या दिवसात पावसाळा सुरु होईल. परिणामी सर्दी, खोकला, ताप, घशात खवखव, अॅलर्जी आणि व्हायरल संसर्गाचा धोका वाढतो. विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि आधीपासूनच आजार असलेल्या व्यक्तींनी या काळात अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते, काही सोप्या सवयी अंगीकारल्यास बदलत्या हवामानाचा आरोग्यावर होणारा परिणाम कमी करता येतो.

Diabetes: गूळ की साखर? कोणामुळे ब्लड शुगर झपाट्याने वाढते? जाणून घ्या सत्य

पौष्टिक आहार घ्या

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. आहारात हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे, डाळी, ड्राय फ्रुट्स आणि व्हिटॅमिन-सीयुक्त पदार्थांचा समावेश करावा. हे पदार्थ शरीराला आवश्यक पोषण देतात आणि संसर्गांपासून संरक्षण करण्यास मदत करतात.

शरीर हायड्रेट ठेवा

बदलत्या हवामानात अनेकजण पाणी पिण्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दिवसभरात पुरेसे पाणी, नारळपाणी, ताक किंवा लिंबूपाणी प्यायल्यास शरीर ताजेतवाने राहते.

नियमित व्यायाम करा

दररोज किमान २० ते ३० मिनिटे चालणे, योग किंवा हलका व्यायाम केल्याने रक्ताभिसरण सुधारते. यामुळे शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि सर्दी-खोकला सारख्या आजारांचा धोका कमी होतो.

पुरेशी झोप घ्या

दररोज ७ ते ८ तासांची शांत झोप शरीराच्या रिकव्हरीसाठी आवश्यक असते. झोपेची कमतरता असल्यास थकवा वाढतो आणि रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते.

स्वच्छता आणि योग्य कपड्यांची काळजी घ्या

हवामानानुसार कपड्यांची निवड करणे गरजेचे आहे. तसेच हात वारंवार धुणे, स्वच्छतेची काळजी घेणे आणि संसर्गग्रस्त व्यक्तींपासून अंतर ठेवणेही महत्त्वाचे आहे.

तज्ज्ञांचा सल्ला

बदलत्या हवामानात आजारांपासून दूर राहण्यासाठी औषधांपेक्षा योग्य जीवनशैली अधिक प्रभावी ठरते. दररोजच्या जीवनात संतुलित आहार, पुरेसे पाणी, नियमित व्यायाम, चांगली झोप आणि स्वच्छतेच्या सवयी यांचा अवलंब केल्यास शरीराची रोग प्रतिकारशक्ती मजबूत राहते आणि काही आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात टाळता येतो. त्यामुळे हवामान बदलत असताना आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Colon Cancer: आतड्यांच्या कॅन्सरचा धोका कमी करायचा आहे? रोज खा ‘हे’ सुपरफूड्स

Web Title: Weather change health tips immunity boosting care seasonal illness prevention

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 07:37 PM

Topics:  

  • health awareness
  • Health Care Tips
  • Monsoon

संबंधित बातम्या

Rabies: कुत्र्याने चावलं नाही, फक्त चाटलं… तरी रेबीजचा धोका? जाणून घ्या धक्कादायक सत्य
1

Rabies: कुत्र्याने चावलं नाही, फक्त चाटलं… तरी रेबीजचा धोका? जाणून घ्या धक्कादायक सत्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.