गूळ हा ऊसाच्या रसापासून तयार केला जातो. तो कमी प्रक्रिया केलेला असल्यामुळे त्यात लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांसारखी काही खनिजे आढळतात. दुसरीकडे, पांढरी साखर ही पूर्णपणे शुद्धीकरण प्रक्रियेतून तयार होत असल्याने त्यामध्ये पोषणमूल्य जवळपास शून्य असते. त्यामुळे अनेकजण गुळाला अधिक आरोग्यदायी पर्याय मानतात.
तज्ज्ञांच्या मते, गूळ आणि साखर या दोन्हीमध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट्स आणि सुक्रोज असते. त्यामुळे दोन्ही पदार्थांचे सेवन केल्यानंतर रक्तातील ग्लुकोजची पातळी(Blood Sugar Spike) वाढते. गूळ नैसर्गिक असला तरी तो रक्तातील साखर वाढवत नाही, असे म्हणणे चुकीचे ठरेल. काही अभ्यासांमध्ये गुळामुळे साखरेची वाढ किंचित मंद गतीने होत असल्याचे दिसून आले असले तरी दोन्हींचा एकूण परिणाम जवळपास सारखाच मानला जातो.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Colon Cancer: आतड्यांच्या कॅन्सरचा धोका कमी करायचा आहे? रोज खा ‘हे’ सुपरफूड्स






