Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : रविवार बनवा खास, संध्याकाळच्या नाश्त्याला ट्राय करा कुरकरीत ‘चिकन कटलेट’, रेसिपी आहे सोपी

Chicken Cutlet Recipe : तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही चिकनपासून ज्यूसी आणि क्रिस्पी असे चिकनचे कटलेट तयार करु शकता. संध्याकाळचा नाश्ता किंवा घरी आलेल्या पाहुण्यांना सर्व्ह करण्यासाठी ही एक परफेक्ट डिश ठरते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 26, 2026 | 10:00 AM
Recipe : रविवार बनवा खास, संध्याकाळच्या नाश्त्याला ट्राय करा कुरकरीत 'चिकन कटलेट', रेसिपी आहे सोपी

Recipe : रविवार बनवा खास, संध्याकाळच्या नाश्त्याला ट्राय करा कुरकरीत 'चिकन कटलेट', रेसिपी आहे सोपी

Follow Us
Follow Us:
  • चिकन कटलेटची चव तुम्ही अनेकदा चाखली असेल.
  • पण हा पदार्थ तुम्ही कधी घरी बनवला आहे का?
  • फार मुबलक साहित्यापासून ही डिश तयार केली जाते.
चिकनपासून बनणारे विविध पदार्थ प्रत्येकाला आवडतात, त्यामध्ये चिकन कटलेट हा एक अत्यंत लोकप्रिय आणि चविष्ट स्नॅक आहे. बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ, रसाळ पोत असलेले हे कटलेट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. संध्याकाळच्या चहासोबत, पाहुण्यांसाठी स्टार्टर म्हणून किंवा मुलांच्या डब्यात देण्यासाठी हा पदार्थ उत्तम पर्याय ठरतो.

पावसाळ्यात गरमागरम चपातीसोबत खाण्यासाठी राजस्थानी पद्धतीमध्ये बनवा दही पापडाची भाजी, लहान सुद्धा खातील आवडीने

चिकन कटलेटची खासियत म्हणजे ते आपल्या आवडीनुसार मसाले आणि हर्ब्स घालून वेगवेगळ्या चवीत तयार करता येते. ही रेसिपी घरी सहज उपलब्ध असलेले साहित्य वापरून तयार करता येते आणि प्रत्येक वेळी रेस्टॉरंटसारखी चव देते.

साहित्य

  • २५० ग्रॅम उकडून किसलेले किंवा बारीक चिरलेले चिकन
  • २ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे
  • १ बारीक चिरलेला कांदा
  • २ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
  • १ टीस्पून आले-लसूण पेस्ट
  • २ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
  • ½ टीस्पून गरम मसाला
  • ½ टीस्पून लाल तिखट
  • ¼ टीस्पून काळी मिरी पावडर
  • ½ टीस्पून धणे-जिरे पावडर
  • चवीनुसार मीठ
  • १ अंडे (फेटलेले)
  • १ कप ब्रेडक्रम्ब्स
  • तळण्यासाठी तेल
Recipe : व्हेज खाण्याऱ्यांसाठी पर्वणी, घरीच बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘मलाई पनीर टिक्का’, रेसिपी नोट करा

कृती

  • एका मोठ्या भांड्यात उकडलेले चिकन, उकडलेले बटाटे आणि बारीक चिरलेला कांदा एकत्र करा.
  • त्यामध्ये हिरव्या मिरच्या, आले-लसूण पेस्ट, कोथिंबीर, गरम मसाला, लाल तिखट, धणे-जिरे पावडर, काळी मिरी आणि मीठ घालून सर्व मिश्रण व्यवस्थित मळून घ्या.
  • तयार मिश्रणाचे समान आकाराचे गोळे करून त्यांना गोल किंवा अंडाकृती कटलेटचा आकार द्या.
  • प्रत्येक कटलेट प्रथम फेटलेल्या अंड्यात बुडवा आणि नंतर सर्व बाजूंनी ब्रेडक्रम्ब्समध्ये व्यवस्थित घोळवा.
  • कढईत तेल मध्यम आचेवर गरम करा. तेल पुरेसे गरम झाल्यावर कटलेट सावधपणे सोडा.
  • कटलेट दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा. नंतर टिश्यू पेपरवर काढून अतिरिक्त तेल निघू द्या.
  • गरमागरम चिकन कटलेट टोमॅटो सॉस, हिरवी चटणी किंवा मेयोनीजसोबत सर्व्ह करा. सोबत कांदा, लिंबाच्या
  • फोडी आणि सॅलड दिल्यास त्याची चव आणखी खुलते.
  • अधिक खुसखुशीत कटलेटसाठी ब्रेडक्रम्ब्सचे दुहेरी कोटिंग करा.
  • मिश्रण सैल वाटत असल्यास त्यामध्ये थोडे ब्रेडक्रम्ब्स मिसळा.
  • डीप फ्रायऐवजी शॅलो फ्राय किंवा एअर फ्राय करूनही कटलेट तयार करता येतात.
  • अधिक चवदार परिणामासाठी मिश्रण २० ते ३० मिनिटे फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर कटलेट बनवा.

Web Title: Weekend special chicken cutlet recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Schezwan Noodle Recipe : विकत नको, घरी बनवा ताजे, चटपटीत स्ट्रीट स्टाईल ‘शेझवान नूडल्स’
1

Schezwan Noodle Recipe : विकत नको, घरी बनवा ताजे, चटपटीत स्ट्रीट स्टाईल ‘शेझवान नूडल्स’

Thatte Idli Recipe : सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट, यंदा घरी बनवा ‘थट्टे इडली’, अशी आहे रेसिपी
2

Thatte Idli Recipe : सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट, यंदा घरी बनवा ‘थट्टे इडली’, अशी आहे रेसिपी

Ganeshotsav 2026: नैवेद्याच्या पानातील सोपा पदार्थ! गणपती उत्सवात १० मिनिटांमध्ये बनवा रबडीसारखी घट्टसर शाही साबुदाणा खीर
3

Ganeshotsav 2026: नैवेद्याच्या पानातील सोपा पदार्थ! गणपती उत्सवात १० मिनिटांमध्ये बनवा रबडीसारखी घट्टसर शाही साबुदाणा खीर

Ganeshotsav 2026 : सणाचा गोडवा वाढवा, घरी बनवा मार्केट स्टाईल खुशखुशीत ‘बालुशाही’
4

Ganeshotsav 2026 : सणाचा गोडवा वाढवा, घरी बनवा मार्केट स्टाईल खुशखुशीत ‘बालुशाही’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.