पावसाळ्यात गरमागरम चपातीसोबत खाण्यासाठी राजस्थानी पद्धतीमध्ये बनवा दही पापडाची भाजी
जेवणाच्या ताटात प्रत्येकाला कायमच वेगवेगळ्या भाज्या खाण्यास हव्या असतात. नेहमीच कडधान्य किंवा पालेभाज्या खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. अशावेळी एकतर विकतचे पदार्थ आणले जातात किंवा घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून भाजी बनवली जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला राजस्थानी पद्धतीमध्ये दही पापडाची भाजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि चव सुद्धा भारी लागते. जेवणात तोंडी लावण्यासाठी किंवा गरमागरम खिचडी बनवल्यानंतर त्यासोबत खाण्यासाठी पापड भाजला जातो. पण तेलकट पापड खाण्याऐवजी पापडपासून बनवलेले पदार्थ खावेत. यामुळे पोट सुद्धा भरलेले राहते आणि तोंडाची चव वाढते. चला तर जाणून घेऊया राजस्थानी पद्धतीमध्ये दही पापडाची भाजी बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
Ashadhi Ekadashi 2026 : आषढीचा उपवास करताय? हलक्या भूकेसाठी घरी बनवून ठेवा ‘साबुदाण्याचा चिवडा’






