Malai Paneer Tikka Recipe : पनीरमध्ये प्रोटीनचा चांगला स्त्रोत आढळतो. नेहमीचे पनीरचे तेच तेच पदार्थ खाऊन वीट आला असेल तर यावेळी घरी पनीरची ही नवीन डिश ट्राय करा.
(फोटो सौजन्य: Pinterest)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
मलाई पनीर टिक्का ही एक स्टार्टर डिस आहे.
तुम्ही अनेकदा रेस्टाॅरंट्समध्ये या पदार्थाची चव चाखली असेल.
पण यावेळी ही डिश घरी बनवून पाहा.
मलाई पनीर टिक्का हा उत्तर भारतीय खाद्यसंस्कृतीतील अत्यंत लोकप्रिय आणि रुचकर स्टार्टर आहे. रेस्टॉरंटमध्ये आवडीने मागवला जाणारा हा पदार्थ आता घरीही अगदी सहज तयार करता येतो. ओव्हन, एअर फ्रायर, तवा किंवा ग्रिल पॅन यापैकी कोणत्याही साधनाचा वापर करून स्वादिष्ट मलाई पनीर टिक्का बनवता येतो. इतर पनीर टिक्क्यांच्या तुलनेत या प्रकारात तिखटपणा कमी आणि क्रीमीपणा अधिक असतो. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा पदार्थ आवडतो. पार्टी, वाढदिवस, कुटुंबीयांची मेजवानी किंवा संध्याकाळच्या खास स्नॅक्ससाठी हा उत्तम पर्याय ठरतो. घरच्या घरी रेस्टॉरंटसारखा मलाई पनीर टिक्का कसा बनवायचा याची रेसिपीजाणून घेऊया.
एका भांड्यात घट्ट दही, ताजी साय, काजू पेस्ट, आले-लसूण पेस्ट, हिरव्या मिरचीची पेस्ट, काळी मिरी, गरम मसाला, चाट मसाला, लिंबाचा रस, कॉर्नफ्लोअर आणि मीठ घालून गुळगुळीत मिश्रण तयार करा.
या मिश्रणात पनीरचे तुकडे आणि हवे असल्यास कांदा व सिमला मिरची घालून हलक्या हाताने एकजीव करा. भांडे झाकून किमान ३० ते ६० मिनिटे फ्रीजमध्ये मुरण्यासाठी ठेवा.
मुरलेले पनीर, कांदा आणि सिमला मिरची आलटून-पालटून स्क्युअरमध्ये लावा. स्क्युअर नसल्यास थेट तव्यावरही भाजू शकता.
ओव्हन २०० अंश सेल्सिअसवर गरम करून १५ ते २० मिनिटे भाजा. मध्ये एकदा उलटून वरून थोडे बटर लावा. तव्यावर करत असल्यास मंद ते मध्यम आचेवर सर्व बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत भाजा.
भाजून झाल्यावर वरून थोडे बटर आणि चाट मसाला भुरभुरा. त्यामुळे टिक्क्याला अधिक चव आणि आकर्षक स्वाद मिळतो.
गरमागरम मलाई पनीर टिक्का पुदिन्याची चटणी, कांद्याच्या चकत्या आणि लिंबाच्या फोडीसोबत वाढा. स्टार्टर किंवा स्नॅक्स म्हणून हा पदार्थ सर्वांना नक्की आवडेल.
जाहिरात
जाहिरात
Web Title: Make restaurant style malai paneer tikka at home note down the recipe