Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विकेंड स्पेशल! संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा कुरकुरीत रेस्टॉरंट स्टाईल ‘चिकन पोपकोर्न’, चव अशी की लहानच काय मोठेही होतील खुश

Chicken Popcorn Recipe : संडे स्पेशन घरी काही चविष्ट आणि कुरकुरीत बनवायचं असेल तर चिकन पोपकोर्न तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. याची रेसिपी फार झटपट तयार होते आणि पार्टी स्नॅक्ससाठी एक परफेक्ट पर्याय ठरते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 18, 2026 | 10:30 AM
विकेंड स्पेशल! संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा कुरकुरीत रेस्टॉरंट स्टाईल 'चिकन पोपकोर्न', चव अशी की लहानच काय मोठेही होतील खुश

विकेंड स्पेशल! संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा कुरकुरीत रेस्टॉरंट स्टाईल 'चिकन पोपकोर्न', चव अशी की लहानच काय मोठेही होतील खुश

Follow Us
Follow Us:
  • चिकन लव्हर्स असाल तर कुरकुरीत चिकन पोपकोर्नची चव तुम्हाला नक्कीच फार आवडेल.
  • चिकनचे लहान तुकडे बॅटरमध्ये घोळवून त्यांना फ्राय केल्यावर त्याची कशी लागते हे तुम्ही एकदा चाखून पाहायलाचं हवं.
  • मुख्य म्हणजे फार झटपट आणि निवडक साहित्यापासून आपण ही डिश तयार करणार आहोत.
आजच्या धावपळीच्या जीवनात झटपट तयार होणारे, चवीला जबरदस्त आणि दिसायला आकर्षक असे स्नॅक्स सर्वांनाच आवडतात. त्यातही चिकन पॉपकॉर्न हा प्रकार तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच फेव्हरेट आहे. बाहेरून खूप कुरकुरीत आणि आतून रसाळ चिकनचे छोटे-छोटे घास म्हणजेच चिकन पॉपकॉर्न. पार्टी, किटी पार्टी, वाढदिवस, मूव्ही नाईट किंवा संध्याकाळच्या चहासोबत हा पदार्थ अगदी परफेक्ट लागतो.

मैद्याचे कशाला? आता घरीच बनवा बेकरी स्टाईल खुसखुशीत ‘गव्हाच्या पिठाचे बिस्कीट’, निवडक साहित्यापासून तयार होईल रेसिपी

बाजारात किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या चिकन पॉपकॉर्नमध्ये जास्त तेल, कृत्रिम फ्लेवर किंवा जास्त मसाले असतात. पण घरी बनवलेला चिकन पॉपकॉर्न हा अधिक हेल्दी, स्वच्छ आणि आपल्या आवडीनुसार मसाले घालून तयार करता येतो. कमी वेळात आणि अगदी सोप्या पद्धतीने हा कुरकुरीत स्नॅक्स तुम्ही घरी बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊया घरगुती, कुरकुरीत चिकन पॉपकॉर्नची खास रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य:

  • 250 ग्रॅम बोनलेस चिकन (लहान चौकोनी तुकडे)
  • 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर
  • 2 टेबलस्पून मैदा
  • 1 टीस्पून आलं-लसूण पेस्ट
  • 1 टीस्पून लाल तिखट
  • ½ टीस्पून काळी मिरी पावडर
  • ½ टीस्पून गरम मसाला
  • ½ टीस्पून मीठ (चवीनुसार)
  • 1 अंडं (ऑप्शनल, अधिक कुरकुरीसाठी)
  • 1 टीस्पून सोया सॉस (ऑप्शनल)
  • तळण्यासाठी तेल
रविवार होईल आणखीनच खास! दुपारच्या जेवणासाठी मालवणी पद्धतीमध्ये बनवा चिकन रस्सा, सर्दी खोकला होईल गायब

 कृती:

  • सर्वप्रथम एका भांड्यात चिकनचे तुकडे घ्या. त्यात आलं-लसूण पेस्ट, मीठ, लाल तिखट, काळी मिरी, गरम मसाला आणि सोया सॉस घालून नीट मिसळा.
  • आता त्यात कॉर्नफ्लोअर, मैदा आणि अंडं घालून चिकन सर्व बाजूंनी कोट होईल असे मिक्स करा.
    हे मिश्रण 15–20 मिनिटे मॅरिनेट होऊ द्या.
  • कढईत मध्यम आचेवर तेल गरम करा.
  • तेल गरम झाल्यावर चिकनचे तुकडे थोडे-थोडे करून सोडून सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
  • तळलेले चिकन पॉपकॉर्न टिश्यू पेपरवर काढा, जेणेकरून अतिरिक्त तेल निघून जाईल.
  • गरमागरम चिकन पॉपकॉर्न तयार आहे.
  • गरम चिकन पॉपकॉर्न टोमॅटो केचप, मॅयोनीज, चीज डिप किंवा गार्लिक सॉससोबत सर्व्ह करा. वरून थोडी चाट
  • मसाला किंवा लाल तिखट भुरभुरल्यास चव आणखी वाढते.
  • तुम्ही हे चिकन पॉपकॉर्न एअर फ्रायरमध्ये किंवा ओव्हनमध्येही कमी तेलात तयार करू शकता.
 

Web Title: Weekend special make tasty and cripsy chicken popcorn at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2026 | 10:30 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • non veg

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट
1

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट

Ganeshotsav 2026 : गणेशाच्या नैवेद्यासाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी ‘ड्रायफ्रुट्स मोदक’, काही मिनिटांची रेसिपी
2

Ganeshotsav 2026 : गणेशाच्या नैवेद्यासाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी ‘ड्रायफ्रुट्स मोदक’, काही मिनिटांची रेसिपी

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी
3

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

Recipe : हेल्दी अन् टेस्टी… नाचणीच्या पिठापासून बनवा जाळीदार आणि स्पाँजी ढोकळा, सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय
4

Recipe : हेल्दी अन् टेस्टी… नाचणीच्या पिठापासून बनवा जाळीदार आणि स्पाँजी ढोकळा, सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.