Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Weekend Special : संध्याकाळचा नाश्ता होऊन जाऊद्या मजेदार, घरी बनवा ‘चिकन पाणिनी’, एकदा खाल तर पुन्हा बनवाल

Chicken Panini Recipe : संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही काही टेस्टी किंवा हटके स्नॅक शोधत आहात का? मग चिकन पाणिनी तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरेल. ब्रेडच्या आत मसालेदार चिकन, भाज्या आणि साॅस घालून बनवलेली स्टफिंग चवीला फारच रुचकर लागते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 05, 2026 | 09:33 AM
Weekend Special : संध्याकाळचा नाश्ता होऊन जाऊद्या मजेदार, घरी बनवा 'चिकन पाणिनी', एकदा खाल तर पुन्हा बनवाल

Weekend Special : संध्याकाळचा नाश्ता होऊन जाऊद्या मजेदार, घरी बनवा 'चिकन पाणिनी', एकदा खाल तर पुन्हा बनवाल

Follow Us
Follow Us:
  • चिकन पाणीनी हा इटालियन सँडविचचा एक प्रकार आहे.
  • ब्रेड, साॅस, भाज्या आणि ज्यूसी चिकनने भरलेली स्टफिंग चवीला छान लागते.
  • हीी डिश अजून ट्राय केली नसेल तर ही रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करा.
आजकाल कॅफे-स्टाईल पदार्थांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि त्यामध्ये चिकन पाणिनी हा एक अत्यंत आवडीचा आणि पोटभर नाश्ता किंवा हलका जेवणाचा पर्याय मानला जातो. इटालियन खाद्यसंस्कृतीतून प्रसिद्ध झालेला हा सँडविच आज जगभरात विविध प्रकारांनी तयार केला जातो.

Party Snacks : तुम्ही कधी ‘दही के शोले खाल्ले’ आहेत का? आजच नोट करा रेसिपी

चिकन पाणिनीची खासियत म्हणजे त्यामध्ये वापरले जाणारे मसालेदार चिकन, कुरकुरीत ब्रेड आणि ग्रिल केल्यामुळे मिळणारा सुंदर टेक्स्चर. हा पदार्थ सकाळच्या नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा विकेंड स्नॅकसाठी उत्तम पर्याय ठरतो. बाहेरून सोनेरी आणि कुरकुरीत तर आतून मऊ, रसाळ आणि चीजने भरलेला चिकन पाणिनी एकदा खाल्ल्यानंतर पुन्हा पुन्हा बनवावासा वाटतो. चला याची  रेसिपी नोट करून घेऊयात.

साहित्य

  • २ पाणिनी रोल किंवा जाड ब्रेड
  • २०० ग्रॅम बोनलेस चिकन
  • १ टीस्पून आले-लसूण पेस्ट
  • १ टीस्पून लाल तिखट
  • ½ टीस्पून काळी मिरी पूड
  • ½ टीस्पून ओरिगॅनो
  • ½ टीस्पून चिली फ्लेक्स
  • १ टीस्पून लिंबाचा रस
  • चवीनुसार मीठ
  • १ टेबलस्पून तेल
  • २ चीज स्लाइस किंवा किसलेले मोझरेला चीज
  • १ छोटा कांदा (पातळ चकत्या)
  • १ टोमॅटो (पातळ चकत्या)
  • लेट्यूसची पाने
  • २ टेबलस्पून मेयोनीज
  • १ टेबलस्पून टोमॅटो सॉस
  • लोणी आवश्यकतेनुसार
कोकणातील पारंपरिक पदार्थ! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी बनवा कुळीथाची पिठलं, पचनक्रिया राहील मजबूत

कृती

  • सर्वप्रथम चिकनचे पातळ तुकडे करून त्यामध्ये आले-लसूण पेस्ट, लाल तिखट, काळी मिरी, ओरिगॅनो, चिली फ्लेक्स, लिंबाचा रस, मीठ आणि थोडे तेल मिसळा. हे मिश्रण किमान ३० मिनिटे मुरू द्या.
  • गरम तवा किंवा ग्रिल पॅनवर थोडे तेल घालून मॅरिनेट केलेले चिकन दोन्ही बाजूंनी पूर्णपणे शिजेपर्यंत भाजून घ्या. नंतर त्याचे पातळ स्लाइस करा.
  • पाणिनी रोल किंवा ब्रेड आडवा कापून त्याच्या आतील बाजूस मेयोनीज आणि टोमॅटो सॉस समान प्रमाणात लावा.
  • ब्रेडमध्ये प्रथम लेट्यूसची पाने ठेवा. त्यावर चिकनचे तुकडे, कांदा, टोमॅटो आणि चीज व्यवस्थित लावा.
  • ब्रेड बंद करून बाहेरील बाजूस हलक्या हाताने लोणी लावा. त्यामुळे ग्रिल केल्यानंतर सुंदर सोनेरी रंग आणि कुरकुरीत पोत मिळेल.
  •  गरम तव्यावर सँडविच ठेवून दोन्ही बाजूंनी हलके दाब देत ४–५ मिनिटे ग्रिल करा. चीज वितळेपर्यंत आणि ब्रेड कुरकुरीत होईपर्यंत भाजा.
  • गरमागरम चिकन पाणिनी दोन तुकडे करून टोमॅटो केचप, चिली सॉस किंवा फ्रेंच फ्राईजसोबत सर्व्ह करा.
  • अधिक चवदार पाणिनीसाठी स्मोक्ड किंवा ग्रिल्ड चिकन वापरू शकता.
  • काकडी, शिमला मिरची किंवा ऑलिव्ह घालून पाणिनी अधिक पौष्टिक बनवू शकता.
  • पाणिनी नेहमी गरम असतानाच सर्व्ह केल्यास त्याची चव आणि टेक्स्चर सर्वोत्तम लागते.

Web Title: Weekend special make your evening snack fun try chicken panini recipe at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 09:33 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

उपवासाच्या ताटाची वाढेल रंगतदार चव! वाटीभर साबुदाण्यांचा वापर करून बनवा खुसखुशीत थालीपीठ, सगळेच खातील आवडीने
1

उपवासाच्या ताटाची वाढेल रंगतदार चव! वाटीभर साबुदाण्यांचा वापर करून बनवा खुसखुशीत थालीपीठ, सगळेच खातील आवडीने

Corn Cutlet: संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी बेस्ट! फक्त काही मिनिटांत तयार करा कुरकुरीत कॉर्न कटलेट
2

Corn Cutlet: संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी बेस्ट! फक्त काही मिनिटांत तयार करा कुरकुरीत कॉर्न कटलेट

सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा मऊसूत Onion Uttapam, नोट करा रेसिपी
3

सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा मऊसूत Onion Uttapam, नोट करा रेसिपी

चाट खाण्याची इच्छा झाली आहे? घरच्या घरी झटपट बनवा चटपटीत चाट टोकरी, नोट करून घ्या रेसिपी
4

चाट खाण्याची इच्छा झाली आहे? घरच्या घरी झटपट बनवा चटपटीत चाट टोकरी, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.