कोकणातील पारंपरिक पदार्थ! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी बनवा कुळथाचं पिठलं, पचनक्रिया राहील मजबूत
कोकणातील प्रत्येक घरात अतिशय आवडीने कुळीथ पिठापासून बनवलेली पिठी किंवा पिठलं खाल्लेले जाते. हा पदार्थ कोकणकरांच्या अतिशय जिव्हाळयाचा आहे. गरमागरम भात किंवा भाकरीसोबत कुळीथ पिठाची पिठी अतिशय सुंदर लागते. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि इतरही ग्रामीण भागात हा पदार्थ अतिशय आवडीने बनवून खाल्ला जातो. जेवण बनवण्याचा कंटाळा आल्यानंतर अनेक घरांमध्ये डाळ बनवण्याऐवजी भातासोबत खाण्यासाठी पिठी बनवली जाते. पारंपरिक आणि पौष्टिक चवीच्या पदार्थाचे सेवन केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतात आणि आरोग्य सुधारते. पावसाळ्यात कुळीथपासून बनवलेले सूप किंवा इतर पौष्टिक पदार्थ खाल्ल्यास शरीरात उष्णता कायम टिकून राहते आणि पचनक्रिया बिघडत नाही. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये इतर कोणतेही तिखट किंवा तेलकट पदार्थ खाण्याऐवजी कुळीथ पिठापासून बनवलेले पदार्थ खावेत. आज आम्ही तुम्हाला १० मिनिटांमध्ये तयार होणारे कुळीथ पिठाचे पिठलं बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि चव सुद्धा मस्त लागते. जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)






