Dahi Ke Sholey Recipe: खास प्रसंगी किंवा घरी आलेल्या पाहुण्यांना काहीतरी वेगळं आणि टेस्टी खाऊ घालायचं असल्यास दही के शोले तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरेल. घट्टसर दही आणि ब्रेडपासून हा पदार्थ बनवला जातो.
(फोटो सौजन्य: Youtube)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
दही के शोले हा एक स्टाटर्सचा पदार्थ आहे.
उत्तर भारतात ही डिश फार लोकप्रिय आहे.
खास प्रसंगी टेस्टी स्नॅक्स म्हणून तुम्ही ही रेसिपी बनवू शकता.
दही के शोले हा उत्तर भारतीय खाद्यसंस्कृतीतील एक अतिशय लोकप्रिय स्टार्टर आहे. रेस्टॉरंटमध्ये आवर्जून मागवला जाणारा हा पदार्थ आता घरच्या घरीही अगदी सहज तयार करता येतो. पार्टी, वाढदिवस, सण-समारंभ किंवा संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी वेगळे बनवायचे असल्यास दही के शोले हा उत्तम पर्याय ठरतो. मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा पदार्थ आवडतो. यामध्ये वापरले जाणारे दही, पनीर आणि मसाले यामुळे हा पदार्थ चविष्ट तर होतोच, शिवाय पौष्टिकही ठरतो. विशेष म्हणजे हा पदार्थ डीप फ्राय करण्याऐवजी एअर फ्रायर किंवा कमी तेलात शॅलो फ्राय करूनही तयार करता येतो. चला याची रेसिपी जाणून घेऊया.
एका मोठ्या भांड्यात हंग कर्ड, किसलेले पनीर, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरेपूड, काळी मिरी, चाट मसाला आणि मीठ घालून सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत व्यवस्थित मिसळा.
ब्रेडच्या स्लाइसच्या कडा काढून टाका. प्रत्येक स्लाइस हलक्या पाण्याने ओलसर करून दोन्ही हातांनी अलगद दाबून अतिरिक्त पाणी काढून टाका.
ओलसर ब्रेडच्या मध्यभागी दह्याचे तयार केलेले सारण ठेवा. ब्रेडच्या कडा व्यवस्थित बंद करून लांबट किंवा सिलिंडर आकाराचे रोल तयार करा. सारण बाहेर येणार नाही याची काळजी घ्या.
मैदा आणि थोडे पाणी एकत्र करून गुठळ्या नसलेला घट्ट घोळ तयार करा. आवश्यक असल्यास तयार रोलच्या कडा या घोळाने सील करा.
कढईत तेल गरम करा. मध्यम आचेवर तयार रोल सर्व बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
तळल्यानंतर अतिरिक्त तेल निघण्यासाठी टिश्यू पेपरवर ठेवा.
दही के शोले मधून तिरपे कापून प्लेटमध्ये सजवा. वर थोडा चाट मसाला भुरभुरवा आणि पुदिन्याची चटणी,
हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर गरमागरम सर्व्ह करा.