Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्यायाम डाईट करून वजन कमी होत नाही? मग फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

वजन कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा अवलंब केला जातो. गोळ्या खाणे, सप्लिमेंट पिणे, महागडे डाईट, सतत व्यायाम करणे इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. पण तरीसुद्धा वजन कमी होत नाही. चुकीच्या पद्धतीचा डाईट आणि व्यायाम केल्यामुळे वजन कमी होत नाही. जेवण बंद करणे, कमी झोपणे, सतत व्यायाम करणे, तासनतास चालणे इत्यादी गोष्टींचा चुकीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला वजन कमी करताना कोणत्या चुका करू नये, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 07, 2024 | 08:35 AM
वजन कमी करताना 'या' चुका करणे टाळा

वजन कमी करताना 'या' चुका करणे टाळा

Follow Us
Close
Follow Us:

वजन वाढल्यानंतर अनेक लोक महागडे डाईट, जीममध्ये जाऊन तासनतास व्यायाम करणे इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. पण त्याचा फारसा प्रभाव शरीरावर दिसून येत नाही. सध्या वाढलेलं वजन हा एक चर्चेचा विषय झाला असून अनेक लोक या समस्येने त्रस्त आहेत. वजन वाढल्यानंतर पोटावर अतिरिक्त चरबी जमा होण्यास सुरुवात होते. ऑफिसमध्ये काम करत तासनतास एकाच जागेवर बसून राहिल्यानंतर हळूहळू वजन वाढू लागते. तसेच खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, सतत बाहेरून आणलेले पदार्थ खाणे, कमी झोप इत्यादींचा परिणाम लगेच शरीरावर दिसतो. चुकीच्या पद्धतीचा डाईट केल्यामुळे सुद्धा वजन आणखीन वाढण्यास सुरुवात होते.त्यामुळे आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी फॉलो करत असलेला डाईट करताना कोणत्या गोष्टी करू नये, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

नियमित व्यायाम करता का?

वाढलेले वजन कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे.डाईटच्या आधारावर लवकर वजन कमी होत नाही. त्यामुळे व्यायाम करणे आवश्यक आहे. अनेकांना व्यायाम करण्याचा कंटाळा येतो किंवा व्यायाम करण्याची इच्छा होत नाही. पण वजन कमी करण्यासाठी नियमित 45 मिनिटं व्यायाम करणे बंधनकारक आहे. सायकल चालवणे, धावणे, पोहणे किंवा योगासने केल्यास शरीरावर लवकर प्रभाव दिसून येईल.

हे देखील वाचा: सकाळी उठल्यावर अंग आणि पाठदुखी होते का? मग नियमित करा स्ट्रेचिंग

जेवण बंद करणे:

अनेक लोक वजन कमी करण्यासाठी संध्याकाळचे जेवण पूर्णपणे बंद करून टाकतात. पण असे केल्यामुळे शरीर आणखीन कमकुवत होण्यास सुरुवात होते. तसेच शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ लागते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी बंद करण्याऐवजी जेवणात कमी कॅलरी युक्त पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे. गोड आणि चवीला आंबट असलेले पदार्थ खाणे टाळावे.

भरपूर पाणी पिणे:

दैनंदिन जीवनात निरोगी शरीरासाठी आणि त्वचेसाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. नारळ पाणी, डिटॉक्स वॉटर, ज्यूस यांच्यावर जास्त भर द्यावा.वजन कमी करण्यासाठी दररोज भरपूर पाणी प्यावे. अनेकदा साधं पाणी पिण्याचा कंटाळा येतो, अशावेळी तुम्ही उकळलेलं किंवा लिंबू पाणी पिऊ शकता.

हे देखील वाचा: रोज डोकं दुखण्याची ही असू शकतात कारणं

अपुरी झोप:

वजन कमी करण्यासाठी आणि निरोगी जीवनशैली जगण्यासाठी कमीत कमी ७ तास झोपणे आवश्यक आहे. झोप पूर्ण झाल्यानंतर शरीर आणि मन प्रसन्न राहत. मानसिक आरोग्य चांगले राहिले तर शारीरिक आरोग्यसुद्धा चांगले राहते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी पूर्ण झोप घ्या.

 

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Weight loss mistakes health care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2024 | 08:35 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • weight loss tips

संबंधित बातम्या

रात्रीच्या जेवणात दररोज किती चपात्या खाव्यात? वजन कमी करण्यासाठी आणि आरोग्यासाठी मानला जाणारा हेल्दी पदार्थ
1

रात्रीच्या जेवणात दररोज किती चपात्या खाव्यात? वजन कमी करण्यासाठी आणि आरोग्यासाठी मानला जाणारा हेल्दी पदार्थ

आतड्यांमध्ये कुजलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित खा ‘ही’ फळे, सकाळी जोर न लावता पोट होईल स्वच्छ
2

आतड्यांमध्ये कुजलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित खा ‘ही’ फळे, सकाळी जोर न लावता पोट होईल स्वच्छ

रात्रीच्या वेळी उशिरा जेवल्यामुळे शरीरसंबंधित उद्भवू शकतो ‘या’ गंभीर आजारांचा धोका, झपाट्याने वाढेल वजन
3

रात्रीच्या वेळी उशिरा जेवल्यामुळे शरीरसंबंधित उद्भवू शकतो ‘या’ गंभीर आजारांचा धोका, झपाट्याने वाढेल वजन

लघवी दीर्घकाळ थांबवून ठेवल्यामुळे किडनी-मूत्राशयावर होतो गंभीर परिणाम! इन्फेक्शन रोखण्यासाठी करा ‘हे’ उपाय
4

लघवी दीर्घकाळ थांबवून ठेवल्यामुळे किडनी-मूत्राशयावर होतो गंभीर परिणाम! इन्फेक्शन रोखण्यासाठी करा ‘हे’ उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.