Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बंगाली मिठाईने करा पाहुण्यांचे स्वागत! पिकलेल्या रसाळ आंब्याचा वापर करून झटपट बनवा Mango Bhapa Doi

पिकलेल्या हापूस आंब्यांपासून विविध प्रकार बनवले जातात. आज आम्ही तुम्हाला बंगाली पद्धतीमध्ये मँगो भापा डोई बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 21, 2026 | 11:20 AM
बंगाली मिठाईने करा पाहुण्यांचे स्वागत! पिकलेल्या रसाळ आंब्याचा वापर करून झटपट बनवा Mango Bhapa Doi

बंगाली मिठाईने करा पाहुण्यांचे स्वागत! पिकलेल्या रसाळ आंब्याचा वापर करून झटपट बनवा Mango Bhapa Doi

Follow Us
Follow Us:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणावर आंबे उपलब्ध होतात. हा ऋतू आंब्यांचा सीजन म्हणून ओळखला जातो. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पिकलेला रसाळ आंबा खायला खूप जास्त आवडतो. आंब्याचा वापर करून विविध पदार्थ बनवले जातात. हापूस आंब्याचा आमरस, आंब्याची पोळी, मिल्कशेक इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला बंगाली मिठाईतील मँगो भापा दोई बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा एक पुडिंगचा पदार्थ आहे. नेहमीच तेच ठराविक गोड पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही मँगो भापा दोई बनवू शकता. याशिवाय घरी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी किंवा पार्टीतील स्वीट म्हणून तुम्ही हा पदार्थ बनवू शकता. मँगो भापा दोई हा बंगालमधील अतिशय प्रसिद्ध पदार्थ आहे. चला तर जाणून घेऊया मँगो भापा दोई बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

विकतचे कशाला? वाढत्या उन्हाळ्यात पौष्टिक रताळ्यापासून बनवा थंडगार आईस्क्रीम, कधीच विसरणार नाही पदार्थाची चव

साहित्य:

  • पिकलेला आंबा
  • दही
  • कंडेन्स्ड मिल्क
  • सुकलेल्या गुलाब पाकळ्या
  • पिस्त्याचे काप
  • केळीचे पान
हेल्दी पण चविष्ट असं काही खायचंय? मग आपल्या डाएटमध्ये समाविष्ट करा ‘मलाई ब्रोकली’, रेसिपी आहे फार सोपी

कृती:

  • मँगो भापा दोई बनवण्यासाठी सर्वप्रथम, पिकलेले आंबे काहीवेळ पाण्यात घालून ठेवा. यामुळे त्यांच्यावरील चीक कमी होऊन जाईल.
  • त्यानंतर पिकलेल्या आंब्याची साल काढून गर काढा आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून घ्या.
  • चाळणीवर कापड टाकून त्यावर वाटीभर दही घेऊन त्यातील पाणी पूर्णपणे काढून घ्या. त्यानंतर कपड्याला गाठ मारून काहीवेळ तसेच ठेवा.
  • मोठ्या वाटीमध्ये पाणी काढून घेतलेले दही घेऊन त्यात आंब्याची पेस्ट, कंडेन्स्ड मिल्क आणि वेलची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेले मिश्रण व्यवस्थित फेटून झाल्यानंतर बेकिंग टिनला बटर लावून मध्ये केळीचे गोलाकार कापलेले पान टाका.
  • त्यावर तयार केलेले मिश्रण ओतून व्यवस्थित सेट करा आणि सिल्व्हर फॉईलने पॅक करून घ्या. त्यानंतर इडलीच्या भांड्यात २० मिनिट मिश्रण वाफवण्यासाठी ठेवा.
  • वाफवून घेतल्यानंतर ट्रे ३ तासांसाठी फ्रिजमध्ये ठेवा आणि ताटात काढून त्यावर आंब्याचा गर आणि पिस्ता, गुलाब पाकळ्यांची सजावट करून घ्या.
  • तयार आहे बंगाली मिठाईतील मँगो भापा दोई.

Web Title: Welcome guests with bengali sweets make a quick mango bhapa doi using ripe juicy mangoes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 11:20 AM

Topics:  

  • Alphonso Mango
  • easy food recipes
  • Sweet Recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
1

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
3

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
4

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.