वाढत्या उन्हाळ्यात पौष्टिक रताळ्यापासून बनवा थंडगार आईस्क्रीम
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर प्रत्येकाला काहींना काही थंड आणि गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आईस्क्रीम खायला खूप जास्त आवडते. वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम विकत आणून खाल्ले जातात. पण बऱ्याचदा विकत आणलेले आईस्क्रीम बनवण्यासाठी दूषित पाण्याचा वापर किंवा खराब झालेल्या दुधाचा, शरीरास हानिकारक ठरणाऱ्या पदार्थांचा वापर केला जातो. त्यामुळे सोप्या पद्धतीमध्ये घरी सुद्धा तुम्ही आईस्क्रीम बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला पौष्टिक रताळ्याचा वापर करून थंडगार आईस्क्रीम बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले आईस्क्रीम चवीला अतिशय सुंदर लागते. रताळ्याचा वापर करून बनवलेले आईस्क्रीम खाल्ल्यानंतर ते पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा होईल. रताळ शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे.यामध्ये असलेल्या पोषक घटकांमुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. चला तर जाणून घेऊया आईस्क्रीम बनवण्याची कृती.(फोटो सौजन्य – pinterest)






