Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stress Ulcer म्हणजे नेमकं काय? मानसिक तणाव वाढल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ भयंकर लक्षणे, वेळीच व्हा सावध

मानसिक तणाव शरीराच्या पचनक्रियेवर गंभीर परिणाम करतो. त्यामुळे नेहमीच आनंदी आणि हसत खेळत जीवन जगणे आवश्यक आहे. शरीरात वाढलेल्या मानसिक तणावामुळे स्ट्रेस अल्सर होण्याची जास्त शक्यता असते.

  • By सुरुची कदम
Updated On: May 22, 2025 | 05:30 AM
स्ट्रेस अल्सर म्हणजे नेमकं काय? मानसिक तणाव वाढल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' भयंकर लक्षणे

स्ट्रेस अल्सर म्हणजे नेमकं काय? मानसिक तणाव वाढल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' भयंकर लक्षणे

Follow Us
Close
Follow Us:

धावपळीचे जीवन जगणारी प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या मानसिक तणावात जगत आहे. शरीरात वाढलेला मानसिक तणाव आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. यामुळे शरीरात अनेक गंभीर बदल दिसून येतात. त्यामुळे कमीत कमी मानसिक तणावात जगणे आवश्यक आहे. कामाचा ताण, कौटुंबिक जबाबदाऱ्या, आर्थिक अडचणी इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम मनावर आणि शरीरावर दिसून येतो. मानसिक तणावात जगत असलेली व्यक्ती कोणत्या ना कोणत्या शारीरिक समस्येला तोंड देत असते. मानसिक तणाव शरीराच्या पचनक्रियेवर गंभीर परिणाम करतो. त्यामुळे नेहमीच आनंदी आणि हसत खेळत जीवन जगणे आवश्यक आहे. शरीरात वाढलेल्या मानसिक तणावामुळे स्ट्रेस अल्सर होण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला स्ट्रेस अल्सर म्हणजे काय? याची शरीरात दिसून येणारी लक्षणे? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)

पोटावर वाढलेली चरबी झपाट्याने कमी करेल ‘हे’ बारीक दाण्यांचे जादुई पाणी, उपाशी पोटी नियमित करा सेवन

स्ट्रेस अल्सर म्हणजे काय:

मानसिक तणावात असलेल्या व्यक्तीच्या शरीरात अनेक बदल दिसून येतात. स्ट्रेस अल्सर म्हणजे तणावामुळे पोटात जखमा होणे. या समस्येकडे योग्य वेळी लक्ष न दिल्यामुळे हाच आजार आणखीन गंभीर होऊन मोठे स्वरूप घेण्याची शक्यता असते. याशिवाय शरीरात कोर्टिसोल व इतर स्ट्रेस हार्मोन्स वाढू लागतात. यामुळे पचनासाठी लागणारे आम्ल्पित्ता असंतुलित होऊन जाते, ज्यामुळे पोटात जळजळ, जखमा किंवा अल्सर तयार होण्याची जास्त शक्यता असते. शरीरात वाढलेला तणाव कमी करणे आवश्यक आहे. मानसिक तणाव कमी करण्यासाठी नियमित योगासने करणे, ध्यान करणे, मनाला आंनद वाटणाऱ्या गोष्टी करणे इत्यादींमुळे मानसिक तणाव कमी होतो.

स्ट्रेस अल्सर झाल्यानंतर शरीरात दिसून येणारी गंभीर लक्षणे:

पोटात वारंवार जळजळ होणे:

पोटात वाढलेली जळजळ ही सामान्य समस्या असलेली तरीसुद्धा अनेक लोक याकडे दुर्लक्ष करतात. असे केल्यामुळे आजार आणखीन गंभीर स्वरूप घेतात. पोटात जळजळ होणे, आंबटपणा वाढणे इत्यादी लक्षणे शरीरात दिसू लागतात. बऱ्याचदा ही जळजळ छाती आणि गळ्यापर्यंत पोहचते. त्यामुळे पोटात जळजळ वाढल्यास डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्यावा.

भूक न लागणे किंवा पोटात दुखणे:

स्ट्रेस अल्सर झाल्यानंतर शरीराची पचनक्रिया अतिशय कमकुवत होऊन जाते. ज्यामुळे जेवलेले अन्नपदार्थ सहज पचन होण्यास जास्तीचा वेळ लागतो. पचनक्रिया कमकुवत झाल्यानंतर भूक न लागणे, पोटात दुखणे, पोटात खवखव होणे, गॅस वाढणे इत्यादी अनेक लक्षणे दिसून येतात. स्ट्रेस अल्सर आणखीनच गंभीर झाल्यानंतर उलट्या, मळमळ होण्याची जास्त शक्यता असते. तर काहीवेळा रक्ताच्या उलट्या होऊ लागतात.

दातांना लागलेली कीड आपोआप होईल नष्ट! वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी तुरटीमध्ये मिक्स करा ‘हे’ पदार्थ, दात होतील स्वच्छ

लघवीतून रक्त येणे:

पोटात अल्सर वाढल्यानंतर दुर्लक्ष केल्यास लघवीतून रक्त येण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे पोटात वाढलेल्या अल्सरकडे दुर्लक्ष करू नका. अल्सर झाल्यानंतर शरीराच्या आतून रक्तस्त्राव होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे लघवीचा रंग सुद्धा बदलू लागतो. काळसर किंवा रक्ताळलेला रंग लघवीमध्ये दिसून येतो. त्यामुळे या समस्येकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्यावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: What exactly is a stress ulcer these terrible symptoms appear in the body after increasing mental stress

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • Mental Illness
  • mental stress

संबंधित बातम्या

सकाळी उठल्यानंतर नियमित करा ‘या’ काळ्या पदार्थाच्या पाण्याचे सेवन, महिनाभरात शरीरात दिसून येतील आश्चर्यकारक बदल
1

सकाळी उठल्यानंतर नियमित करा ‘या’ काळ्या पदार्थाच्या पाण्याचे सेवन, महिनाभरात शरीरात दिसून येतील आश्चर्यकारक बदल

हृदयाचे आरोग्य कायमच निरोगी ठेवण्यासाठी कोणत्या चहाचे करावे सेवन! चहा पिण्याआधी नक्की वाचा ‘या’ गोष्टी
2

हृदयाचे आरोग्य कायमच निरोगी ठेवण्यासाठी कोणत्या चहाचे करावे सेवन! चहा पिण्याआधी नक्की वाचा ‘या’ गोष्टी

हृदयरोग किंवा उच्च रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात करावा ‘या’ मिठाचा समावेश, जाणून घ्या मिठाचे प्रकार
3

हृदयरोग किंवा उच्च रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात करावा ‘या’ मिठाचा समावेश, जाणून घ्या मिठाचे प्रकार

Copper Water: ‘या’ लोकांनी चुकूनही करू नका तांब्याच्या भांड्यातील पाण्याचे सेवन! आरोग्यासंबंधित उद्भवतील गंभीर समस्या
4

Copper Water: ‘या’ लोकांनी चुकूनही करू नका तांब्याच्या भांड्यातील पाण्याचे सेवन! आरोग्यासंबंधित उद्भवतील गंभीर समस्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.