पोटावर वाढलेली चरबी झपाट्याने कमी करेल 'हे' बारीक दाण्यांचे जादुई पाणी
जगभरात वाढलेल्या वजनाने अनेक लोक त्रस्त आहेत. आहारात पोषक घटकांची कमतरता, सतत एक जागेवर बसून राहणे, जंक फूडचे अतिसेवन, कामाचा वाढलेला ताण, शरीरात होणारे हार्मोनल बदल, अपुरी झोप, बिघडलेली पचनक्रिया इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे चुकीच्या सवयी फॉलो न करता योग्य सवयी फॉलो करणे आवश्यक आहे. शरीरात लठ्ठपणा वाढल्यानंतर अनेक आजारांची शरीराला लागण होते. मधुमेह, वाढते कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. पोटाच्या अवतीभोवती वाढलेला चरबीचा घेर बऱ्याचदा महिलांचा आत्मविश्वास कमी करून टाकतो.(फोटो सौजन्य – iStock)
Vitamin च्या कमतरतेमुळे होतोय AMH पातळीवर परिणाम, जाणून घ्या तज्ज्ञांकडून
वजन वाढल्यानंतर अनेक लोक आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करतात. याशिवाय आहारात प्रोटीनशेक, वेगवेगळे डाएट इत्यादी अनेक गोष्टी फॉलो केल्या जातात. मात्र यामुळे वाढलेल्या वजनावर फारसा परिणाम दिसून येत नाही. बाजारातील कोणत्याही केमिकलयुक्त प्रोटीनशेकचे सेवन करण्याऐवजी घरगुती पेयांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात कोणत्या पेयांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होईल.
मेटाबॉलिज्म वाढवण्यास मदत:
ओव्याचे पाणी नियमित प्यायल्यास शरीरावर वाढलेली चरबी कमी होण्यास मदत होते. याशिवाय शरीराचे मेटाबॉलिज्म सुधारण्यास मदत होते. ओव्यांमध्ये थायमॉल आणि अॅन्टीऑक्सिडंट्स घटक आढळून येतात. यामुळे शरीराचे वाढलेले वजन झपाट्याने कमी होते. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी ओव्याचे पाणी प्यायल्यास शरीरातील विषारी घाण बाहेर पडून जाईल आणि शरीर स्वच्छ होईल . ओव्याचे पाणी प्यायल्यामुळे अन्नाचे विघटन लवकर होते आणि शरीरावर साठलेली चरबी कमी होऊन जाते.
बऱ्याचदा शरीराच्या अनेक अवयवांवर अनावश्यक चरबीचा घेर वाढू लागतो. शरीरावर वाढलेल्या चरबीमुळे वजन वाढत जाते आणि शरीर फुगल्यासारखे वाटू लागते. शरीरावरील बेली फॅट कमी करण्यासाठी ओव्याचे पाणी प्यावे. उपाशी पोटी ओव्याच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे पोटात आलेली सूज कमी होते आणि शरीर सुधारते.
आहारात सतत तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. शरीरात पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर अन्नपदार्थांचे विघटन होण्यास बराच वेळ लागतो. त्यामुळे पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर ओव्याचे पाणी प्यावे.