Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘म्युकस फिशिंग सिंड्रोम’ म्हणजे नेमकं काय? डोळ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्यास दृष्टीवर होऊ शकतो परिणाम

डोळ्यांचे इन्फेक्शन वाढल्यानंतर दृष्टी कमी होण्याची शक्यता असते. याशिवाय डोळ्यांसंबंधित अनेक गंभीर आजार होऊ शकतात. त्यामुळे डोळ्यांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 07, 2026 | 11:40 AM
'म्युकस फिशिंग सिंड्रोम' म्हणजे नेमकं काय? डोळ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्यास दृष्टीवर होऊ शकतो परिणाम

'म्युकस फिशिंग सिंड्रोम' म्हणजे नेमकं काय? डोळ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्यास दृष्टीवर होऊ शकतो परिणाम

Follow Us
Close
Follow Us:

शरीरातील अतिशय नाजूक अवयव म्हणजे डोळे. जो प्रकाश ग्रहण करून वस्तूंचे रंगरूप दाखवतो आणि आपल्याला जग पाहण्यास मदत करते. डोळ्यांच्या आतमध्ये कॉर्निया, भिंग आणि रेटिना यांसारख्या नाजूक अवयव असतात. पण वारंवार मोबाईल, लॅपटॉपआणि स्क्रीन पाहत राहिल्यामुळे डोळ्यांची दृष्टी खराब होऊन जाते. याशिवाय डोळ्यांसंबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. मोतीबिंदू, काचबिंदू, दृष्टिवैषम्य यांसारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असते. डोळ्यांवर जास्तीचा तणाव निर्माण झाल्यानंतर डोळ्यांना इजा पोहचण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)

सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? मग कोमट पाण्यात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, आतड्यांमधील घाण पडून जाईल बाहेर

सकाळी झोपेतून उठल्यानंतर अनेकांच्या बोळ्यांच्या कोपऱ्यात दिसतो. जिला डोळ्यातली घाण आपण समजतो तिलाच वैद्यकीय भाषेत म्यूकस म्हणतात. बहुतेक जण हा पदार्थ घाण समजून बोटांनी किंवा टिश्यूने काढून टाकतात. पण ही घाण रोजच साचत असल्यामुळे सतत डोळे चोळले जातात. मात्र या सवयीमुळे डोळ्यांच्या आरोग्याला दीर्घकाळासाठी गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे योग्य काळजी घेणं आवश्यक आहे.

सोशल मीडियावर आरोग्यविषयक माहिती देणारे अमेरिकेतील डॉक्टर कुणाल सूद यांच्या म्हणण्यानुसार, डोळ्यांतून वारंवार चिकट पदार्थ काढण्याच्या सवयीला ‘म्यूकस फिशिंग सिंड्रोम’ म्हणतात. ही कृती वरवर साधी आणि निरुपद्रवी वाटत असली, तरी प्रत्यक्षात ती डोळ्यांना हळूहळू नुकसान पोहोचवू शकते.

म्यूकस फिशिंगमुळे नेमका काय धोका होतो ?

डोळ्यांचा पृष्ठभाग खूपच नाजूक असतो, जेव्हा आपण बोटांनी किंवा नखांनी हा चिकट धाग्यासारखा म्यूकस काढतो, तेव्हा डोळ्यांच्या वरच्या थरावर सूक्ष्म ओरखडे पडू शकतात. यामुळे डोळ्यांत जळजळ, खाज आणि सूज वाढते. शरीर या त्रासाला प्रतिसाद म्हणून अधिक म्यूकस तयार करू लागते. परिणामी पुन्हा तो काढण्याची सवय लागते आणि हा त्रासदायक चक्र सुरू होतं.

डोळ्यांसाठी म्यूकस का आवश्यक आहे ?

बहुतेकांना हे माहीत नसते, पण डोळ्यांतील हा चिकट पदार्थ घाण नसून संरक्षणात्मक कवच असतो. डोळे सतत पाणी, तेल आणि म्यूकस यांचे संतुलित मिश्रण तयार करत असतात. ही पातळ परत डोळे ओलसर ठेवते, धूळ, माती आणि जंतू बाहेर काढण्यास मदत करते. सकाळी दिसणारी पपडी म्हणजे रात्रीच्या वेळेत सुकलेले अश्रू आणि मृत पेशी असतात, ज्यामुळे डोळे स्वच्छ राहतात.

कॅन्सरच्या जीवघेण्या गाठी नष्ट करून टाकण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, पोट आतड्यांच्या कॅन्सरपासून मिळेल सुटका

दृष्टीवरही होऊ शकतो परिणाम:

डॉ. सूद यांच्या मते, वारंवार डोळे कुरतडल्यास कॉर्नियाला गंभीर इजा होऊ शकते. त्यामुळे ससर्गाचा धोका वाढतोच, शिवाय काही प्रकरणांत दृष्टी धूसर होणे किंवा कायमस्वरूपी नुकसान होण्याची शक्यताही नाकारता यंत येत नाही. म्हणूनच डोळ्यांत साचलेला म्यूकस सतत काढण्याऐवजी डोळ्यांची स्वच्छता योग्य पद्धतीने राखणे आणि त्रास जास्त असल्यास नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी काय खावे?

    Ans: गाजर, रताळे, भोपळा, पपई, सॅल्मन, ट्यूना सारखे मासे.

  • Que: डोळ्यांच्या सामान्य समस्या कोणत्या आहेत?

    Ans: मोतीबिंदू , काचबिंदू , दृष्टिदोष

  • Que: डोळ्यांचे संरक्षण कसे करावे?

    Ans: हानिकारक UV किरणांपासून डोळ्यांचे रक्षण करतात

Web Title: What exactly is mucus fishing syndrome if it poses a threat to eye health it can affect vision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • eye care
  • eye infection
  • eyes health

संबंधित बातम्या

स्क्रीनटाइम वाढल्याने डोळ्यांसह मेंदूच्या आजारांमध्ये वाढ! चिमुरडे ‘डिजिटल आय स्ट्रेन’च्या विळख्यात, स्मरणशक्तीवर परिणाम
1

स्क्रीनटाइम वाढल्याने डोळ्यांसह मेंदूच्या आजारांमध्ये वाढ! चिमुरडे ‘डिजिटल आय स्ट्रेन’च्या विळख्यात, स्मरणशक्तीवर परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.