Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘बाल दृष्टी’मधून नेत्रआरोग्याला दृष्टी! ३ वर्षांत महापालिकेच्या १,२०० शाळांतील ३ लाख विद्यार्थ्यांच्या नेत्रतपासणीचे उद्दिष्ट

Mumbai News: उपक्रमांतर्गत आतापर्यंत ३६१ विद्यार्थ्यांना चष्मे देण्यात आले आहेत. संशयित नेत्रविकार आढळलेल्या विद्यार्थ्यांना ताडदेव रोडवरील व्हिजन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या कम्युनिटी आय क्लिनिकमध्ये सविस्तर तपासणीसाठी पाठविण्यात येते. या तपासणीनंतर चष्मा, तज्ज्ञ उपचार अथवा शस्त्रक्रियेची आवश्यकता निश्चित करण्यात येते.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 14, 2026 | 09:00 AM
'बाल दृष्टी'मधून नेत्रआरोग्याला दृष्टी! ३ वर्षांत महापालिकेच्या १,२०० शाळांतील ३ लाख विद्यार्थ्यांच्या नेत्रतपासणीचे उद्दिष्ट

'बाल दृष्टी'मधून नेत्रआरोग्याला दृष्टी! ३ वर्षांत महापालिकेच्या १,२०० शाळांतील ३ लाख विद्यार्थ्यांच्या नेत्रतपासणीचे उद्दिष्ट

Follow Us
Follow Us:

Mumbai News: फळा स्पष्ट दिसत नसल्याने अभ्यासात मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक नेत्रोपचार उपलब्ध करून देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि व्हिजन फाउंडेशन ऑफ इंडियाने यांच्या समन्वयाने ‘बाल दृष्टी’ हा वेगळ्या प्रकारचा पहिला उपक्रम सुरू केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. तीन वर्षाच्या कालावधीत महापालिकेच्या १२०० शाळांमधील तीन लाख विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी करण्याचे उद्दिष्ट या उपक्रमातून निश्चित करण्यात आले आहे.(फोटो सौजन्य – AI)

पाणी कपातीनंतर आता राज्यात भारनियमनचे संकट; मागणी वाढती पण पुरवठा कमी

७५% अधिक दृष्टीदोष टाळता अथवा उपचारांद्वारे सुधारता येऊ शकतात. ‘बाल दृष्टी’ हा उपक्रम अपवर्तनदोषाच्या निदान व उपचारांवर केंद्रित असून, तो आयुष्मान भारत अंतर्गत शालेय आरोग्य व कल्याण कार्यक्रमाशी संलग्न आहे. मुलांना अनेकदा दृष्टी स्पष्ट नसल्याचे सांगता येत नाही. हळूहळू उतरविणे अशा वर्तनातून अडचणी व्यक्त करतात. मात्र, या लक्षणांचा अर्थ अनेकदा अनवधान किंवा अभ्यासातील दुर्लक्ष असा लावला जातो. ही स्थिती वेळीच ओळखून विद्यार्थ्यांना उपचारांशी जोडण्यावर या उपक्रमात भर देण्यात आला आहे.

घरभेटी आणि शाळाभेटींद्वारे सातत्याने पाठपुराव्यासाठी संपर्क ठेवणार

उपक्रमांतर्गत आतापर्यंत ३६१ विद्यार्थ्यांना चष्मे देण्यात आले आहेत. संशयित नेत्रविकार आढळलेल्या विद्यार्थ्यांना ताडदेव रोडवरील व्हिजन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या कम्युनिटी आय क्लिनिकमध्ये सविस्तर तपासणीसाठी पाठविण्यात येते. या तपासणीनंतर चष्मा, तज्ज्ञ उपचार अथवा शस्त्रक्रियेची आवश्यकता निश्चित करण्यात येते. पालकांशी घरभेटी आणि शाळाभेटींद्वारे सातत्याने संपर्क ठेवून उपचार पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करण्यात येत आहे. आतापर्यंत चार विद्यार्थ्यांवर तिरळेपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

काही गंभीर नेत्रदोषही उघड

तपासणीदरम्यान काही गंभीर नेत्रदोषही निदर्शनास आले आहेत. एका विद्यार्थ्यांच्या एका डोळ्यात उणे ११.५० एसपीएच इतका निकटदृष्टीदोष आढळला, तर काही विद्यार्थ्यांच्या नोंदी उणे १६ एसपीएचपर्यंत आल्या आहेत. शून्य हे सामान्य दृष्टीमापन मानले जाते, तर उणे ६ पासून उच्च निकटदृष्टीदोषाची स्थिती सुरू होते. या पातळीवर काही सेंटीमीटरपलीकडील दृश्यही धूसर दिसू शकते. एका विद्यार्थ्यास मोतीबिंदू असल्याचेही निदान झाले आहे.

Dharavi Redevelopment: धारावीचा चेहरामोहरा बदलणार! ३७ ते ३९ मजली इमारती, १० हजारांहून अधिक घरांची उभारणी

देशात अंदाजे ९३ लाख मुले दृष्टीबाधित

देशात अंदाजे ९३ लाख मुले दृष्टीबाधित असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ‘इंडियन जर्नल ऑफ ऑप्थेंल्मॉलॉजी’ मधील २०२२ च्या अभ्यासानुसार, बालअंधत्वामुळे भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचे सुमारे १ हजार ३०० कोटी रुपयांचे अप्रत्यक्ष नुकसान होते. अपवर्तनदोष आणि अॅम्ब्लायोपिया ही बालांधत्वाची प्रमुख कारणे असून, ७५ टक्क्यांहून अधिक दृष्टीदोष टाळता अथवा उपचारांद्वारे सुधारता येऊ शकतात.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Mumbai news eye screening target set for 3 lakh students across 1 200 municipal schools

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • eye care
  • Eyelashes
  • Mumbai News

संबंधित बातम्या

शस्त्रक्रियेच्या जगात नवं पाऊल! वॉकहार्ट मुंबई सेंट्रलमध्ये दाखल झाली Da Vinci X रोबोटिक प्रणाली
1

शस्त्रक्रियेच्या जगात नवं पाऊल! वॉकहार्ट मुंबई सेंट्रलमध्ये दाखल झाली Da Vinci X रोबोटिक प्रणाली

Dharavi Redevelopment: धारावीचा चेहरामोहरा बदलणार! ३७ ते ३९ मजली इमारती, १० हजारांहून अधिक घरांची उभारणी
2

Dharavi Redevelopment: धारावीचा चेहरामोहरा बदलणार! ३७ ते ३९ मजली इमारती, १० हजारांहून अधिक घरांची उभारणी

Weather Update : राज्यातील तापमानात मोठी वाढ; रत्नागिरीत सर्वाधिक 39.2 अंश तापमान
3

Weather Update : राज्यातील तापमानात मोठी वाढ; रत्नागिरीत सर्वाधिक 39.2 अंश तापमान

Mumbai News: औषधाच्या किमतीमागे मार्जिनची साखळी कार्यरत! सीसीआयच्या अभ्यासातून उलगडा; उत्पादकापासून मेडिकलच्या काउंटरपर्यंत टप्पे
4

Mumbai News: औषधाच्या किमतीमागे मार्जिनची साखळी कार्यरत! सीसीआयच्या अभ्यासातून उलगडा; उत्पादकापासून मेडिकलच्या काउंटरपर्यंत टप्पे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.