Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 4 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अल्झायमर म्हणजे काय? सुरुवातीच्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेल्या महत्वपूर्ण टिप्स

अल्झायमर हळूहळू वाढणारा आजार आहे. प्रत्येक व्यक्तीनुसार हा आजार विकसित होण्यासाठी साधारणपणे 7 ते 14 वर्षे लागू शकतात. त्यामुळे काळात मेंदूमध्ये होणारे बदल अनेक वर्षे शांतपणे सुरू असतात आणि स्पष्ट लक्षणे दिसण्यापूर्वीच त्यांची सुरुवात झालेली असते.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 04, 2026 | 02:46 PM
अल्झायमर म्हणजे काय? सुरुवातीच्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेल्या महत्वपूर्ण टिप्स

अल्झायमर म्हणजे काय? सुरुवातीच्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेल्या महत्वपूर्ण टिप्स

Follow Us
Follow Us:

अल्झायमर या आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी जांभळ्या (Purple) रंगाच्या रिबनचा वापर केला जातो आणि दरवर्षी जून महिन्यात या आजाराविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. डिमेन्शिया हा मेंदूशी संबंधित हळूहळू वाढणारा (प्रोग्रेसिव्ह न्यूरोडिजेनेरेटिव्ह) आजार आहे, ज्यामध्ये व्यक्तीच्या विचार करण्याच्या, आठवण्याच्या आणि निर्णय घेण्याच्या क्षमता कमी होत जातात. याविषयी डॉ. वर्षा बिर्ला, एमडी, डीएनबी (बायोकेमिस्ट्री), रिजनल क्वालिटी हेड, मेट्रोपोलिस हेल्थकेअर लि.यांनी सविस्तर माहिती दिली आहे.(फोटो सौजन्य – istock)

वजन अचानक वाढतंय किंवा कमी होतंय? थायरॉईडच्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, वेळीच करा योग्य चाचण्या

डिमेन्शियामध्ये सर्वात सामान्य प्रकार म्हणजे अल्झायमर रोग. Alzheimer’s Disease International (2020) च्या अहवालानुसार, 2020 मध्ये जगभरात 5.5 कोटींहून अधिक लोक डिमेन्शियाने ग्रस्त होते आणि 2050 पर्यंत हा आकडा 15.2 कोटींवर जाण्याची शक्यता आहे.

अल्झायमर म्हणजे नेमकं काय?

अनेकांना वाटतं की वय वाढलं की विसरभोळेपणा येणं हे स्वाभाविक आहे. पण अल्झायमर हा केवळ वाढत्या वयाचा भाग नाही. हा डिमेन्शियाचा सर्वात सामान्य प्रकार असून, व्यक्तीच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करणारा आजार आहे. अल्झायमर हा हळूहळू वाढणारा आजार आहे. प्रत्येक व्यक्तीनुसार हा आजार विकसित होण्यासाठी साधारणपणे 7 ते 14 वर्षे लागू शकतात. या काळात मेंदूमध्ये होणारे बदल अनेक वर्षे शांतपणे सुरू असतात आणि स्पष्ट लक्षणे दिसण्यापूर्वीच त्यांची सुरुवात झालेली असते.

सुरुवातीची कोणती लक्षणे ओळखावी?

सुरुवातीच्या टप्प्यातील सर्वात मोठं आव्हान म्हणजे नेहमीचा विसरभोळेपणा आणि अल्झायमरची सुरुवात यामधला फरक ओळखणं.  Alzheimer’s Association ने अल्झायमर आणि वयानुसार होणारा सामान्य विसरभोळेपणा यामधील फरक समजण्यासाठी 10 महत्त्वाची लक्षणे सांगितली आहेत. उदाहरणार्थ, एखाद्या नवीन व्यक्तीचं नाव लगेच आठवलं नाही, पण नंतर आठवलं, तर ते वयानुसार सामान्य मानलं जाऊ शकतं. मात्र खालील लक्षणे दिसू लागली तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

  • दैनंदिन आयुष्यावर परिणाम करणारा विसरभोळेपणा: अलीकडे घडलेल्या घटना विसरणे, आज कोणता दिवस आहे किंवा आपण कुठे आहोत हे विसरणे, एकाच प्रश्नाची वारंवार पुनरावृत्ती करणे.
  • नियोजन किंवा समस्या सोडवण्यात अडचण: स्वतः स्वयंपाक करणे, महिन्याचा खर्च सांभाळणे किंवा आर्थिक व्यवहार करणे कठीण होणे.
  • रोजची परिचित कामे करण्यात अडचण: घरातील उपकरणे वापरणे, स्वयंपाक करणे किंवा अनेक वर्षांपासूनची आवड जोपासणे कठीण होणे.
  • वेळ किंवा ठिकाणाबाबत गोंधळ: दिवस, महिना किंवा वर्ष याबाबत गोंधळ होणे किंवा आपण कुठे आहोत हे लक्षात न राहणे.
  • पाहण्याशी संबंधित समस्या: अंतराचा अंदाज न येणे, चालताना किंवा वाहन चालवताना अडचणी येणे किंवा रस्त्यावरील सुरक्षिततेबाबत समस्या निर्माण होणे.
  • बोलण्यात किंवा भाषेमध्ये अडचण: योग्य शब्द आठवत नाहीत, बोलताना मध्येच थांबणे किंवा परिचित वस्तूंची चुकीची नावे घेणे.
  • वस्तू विचित्र ठिकाणी ठेवणे: सामान नेहमीपेक्षा वेगळ्या ठिकाणी ठेवणे आणि नंतर ते कुठे ठेवले हे आठवू न शकणे.

निर्णयक्षमता कमी होणे:

चुकीचे आर्थिक निर्णय घेणे किंवा स्वतःची वैयक्तिक स्वच्छता आणि नीटनेटकेपणा दुर्लक्षित करणे.
सामाजिक आयुष्यातून दूर जाणे छंद, मित्रमंडळी किंवा सामाजिक कार्यक्रमांमध्ये रस कमी होणे. Journal of Alzheimer’s Disease मध्ये 2023 मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, अशा प्रकारचा सामाजिक अलिप्तपणा आणि उदासीनता हे देखील सुरुवातीची लक्षणे असू शकतात. अचानक चिडचिड होणे, संशयी स्वभाव, गोंधळ, भीती किंवा सतत चिंता वाटणे.

चाचणी कधी करून घ्यावी?

National Institute on Aging च्या मते, जर विसरभोळेपणा किंवा विचार करण्याच्या क्षमतेतील बदलांमुळे दैनंदिन आयुष्यावर परिणाम होत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.अशी लक्षणे नेहमीच अल्झायमरमुळे असतात असे नाही. काही वेळा त्यामागे नैराश्य (Depression), औषधांचे दुष्परिणाम किंवा स्ट्रोकसारखे गंभीर आजार असू शकतात, ज्यासाठी तातडीने उपचारांची गरज असते.लवकर निदान झाल्यास उपचारांचे पर्याय वेळेत सुरू करता येतात, ज्यामुळे लक्षणे नियंत्रित ठेवण्यास मदत होते आणि व्यक्ती अधिक काळ स्वतंत्रपणे आयुष्य जगू शकते. आज उपलब्ध असलेल्या अत्यंत अचूक रक्त तपासण्यांमुळे अधिक निश्चित निदान करून योग्य उपचार लवकर सुरू करणे शक्य झाले आहे.

चाचण्यांमध्ये झालेले नवे बदल: आज काय उपलब्ध आहे?

आजाराचे निदान करण्यासाठी आता केवळ आक्रमक (Invasive) चाचण्यांवर अवलंबून राहण्याची गरज नाही.तपासणीमध्ये रुग्णाचा वैद्यकीय इतिहास, शारीरिक तपासणी, स्मरणशक्ती आणि विचारक्षमतेच्या चाचण्या, रक्त तपासण्या तसेच मेंदूचे सीटी स्कॅन (CT Scan) किंवा एमआरआय (MRI) यांचा समावेश असू शकतो. मे 2025 मध्ये अमेरिकेच्या Food and Drug Administration (FDA) ने अल्झायमरच्या निदानासाठी मदत करणाऱ्या Lumipulse या पहिल्या रक्त तपासणीला मान्यता दिली.

या चाचणीत रक्तातील pTau217 आणि beta-amyloid 1-42 या दोन प्रोटीन्सचे प्रमाण आणि त्यांचे गुणोत्तर तपासले जाते, ज्यामुळे मेंदूमध्ये Amyloid Plaques आहेत का याचा अंदाज घेता येतो. ज्या रुग्णांमध्ये या तपासणीतील मूल्ये ठरावीक मर्यादेपेक्षा जास्त असतात, त्यांना 90% पेक्षा जास्त शक्यतेने अल्झायमर असू शकतो. मात्र या चाचणीचा अहवाल नेहमी रुग्णाचा वैद्यकीय इतिहास, कौटुंबिक इतिहास आणि संज्ञानात्मक (Cognitive) तपासण्यांसोबतच समजून घेतला पाहिजे.

याशिवाय, National Institutes of Health (NIH) च्या मदतीने संशोधकांनी p-tau217 या रक्त तपासणीवर आधारित एक Predictive Clock Model विकसित केला आहे. या मॉडेलच्या मदतीने अल्झायमरची लक्षणे कधी सुरू होण्याची शक्यता आहे, याचा अंदाज घेता येतो. याविषयीचा अभ्यास फेब्रुवारी 2026 मध्ये Nature Medicine या जर्नलमध्ये प्रकाशित झाला होता (NIH, 2026).

बीट कच्चे खावे की शिजवून? जाणून घ्या बीट खाण्याचे योग्य प्रमाण, पद्धत आणि शरीराला होणारे भरमसाट फायदे

शेवटी एक महत्त्वाचा संदेश:

एखाद्या व्यक्तीला आपल्या जवळच्या व्यक्तीचं नाव विसरायला लागलं, तेव्हाच अल्झायमरची सुरुवात होते असं नाही. हा आजार त्यापूर्वी अनेक वर्षे शांतपणे मेंदूमध्ये विकसित होत असतो. या आजाराचा सर्वात मोठा जोखीम घटक म्हणजे वाढतं वय. अल्झायमरच्या 90% पेक्षा जास्त रुग्णांचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त असते. याशिवाय कौटुंबिक इतिहास आणि जीवनशैली यांचाही धोका वाढवण्यात महत्त्वाचा वाटा असतो. स्वतःमध्ये किंवा आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीमध्ये वरीलपैकी कोणतीही लक्षणे दिसत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. विशेषतः या जनजागृती महिन्यात याबाबत जागरूक व्हा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेळेवर निदान आणि लवकर उपचार हीच अल्झायमरविरुद्धची सर्वात मोठी आशा आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अल्झायमर म्हणजे काय?

    Ans: अल्झायमर हा मेंदूशी संबंधित प्रगतिशील (Progressive) आजार असून, तो स्मरणशक्ती, विचार करण्याची क्षमता, भाषा आणि दैनंदिन कामे करण्याच्या क्षमतेवर परिणाम करू शकतो. हा डिमेन्शियाचा (Dementia) सर्वात सामान्य प्रकार मानला जातो.

  • Que: अल्झायमरची सुरुवातीची लक्षणे कोणती असू शकतात?

    Ans: वारंवार विस्मरण होणे, नुकत्याच घडलेल्या गोष्टी लक्षात न राहणे, योग्य शब्द आठवण्यात अडचण येणे, निर्णयक्षमता कमी होणे, वेळ-ठिकाणाबाबत गोंधळ होणे आणि व्यक्तिमत्त्व किंवा वर्तनात बदल दिसणे ही सुरुवातीची काही लक्षणे असू शकतात.

  • Que: सामान्य विस्मरण आणि अल्झायमरमध्ये काय फरक आहे?

    Ans: वयामुळे कधीकधी विस्मरण होणे सामान्य असू शकते. मात्र, अल्झायमरमध्ये विस्मरणामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम होतो, महत्त्वाच्या गोष्टी वारंवार विसरल्या जातात आणि व्यक्तीला परिचित कामे करण्यातही अडचणी येऊ लागतात.

Web Title: What is alzheimers do not ignore these early symptoms learn important tips from experts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • brain
  • Doctor advice

संबंधित बातम्या

वजन अचानक वाढतंय किंवा कमी होतंय? थायरॉईडच्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, वेळीच करा योग्य चाचण्या
1

वजन अचानक वाढतंय किंवा कमी होतंय? थायरॉईडच्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, वेळीच करा योग्य चाचण्या

स्तनपान करताना ‘या’ चुकीच्या समजुतींवर अजिबात ठेवू नका विश्वास; जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती
2

स्तनपान करताना ‘या’ चुकीच्या समजुतींवर अजिबात ठेवू नका विश्वास; जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

सतत थकवा आणि श्वास घ्याल त्रास होतोय? क्रॉनिक फटीग सिंड्रोमच्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, वेळीच करा उपचार
3

सतत थकवा आणि श्वास घ्याल त्रास होतोय? क्रॉनिक फटीग सिंड्रोमच्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, वेळीच करा उपचार

पेरिमेनोपॉजच्या टप्प्यात महिलांमध्ये अंडाशयाच्या कर्करोगाचा धोका अधिक का असतो? तज्ज्ञांकडून जाणून घ्या महत्वपूर्ण माहिती
4

पेरिमेनोपॉजच्या टप्प्यात महिलांमध्ये अंडाशयाच्या कर्करोगाचा धोका अधिक का असतो? तज्ज्ञांकडून जाणून घ्या महत्वपूर्ण माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.