बीट कच्चे खावे की शिजवून? जाणून घ्या बीट खाण्याचे योग्य प्रमाण, पद्धत आणि शरीराला होणारे भरमसाट फायदे
बीट खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढते का?
बीट कच्चे खावे की शिजवून?
बीट खाताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांचा अभाव आणि आरोग्याकडे वारंवार दुर्लक्ष केले जाते. जीवनातील सवयी, आहार, आणि कामाचा वाढता ताण इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम मोठ्या प्रमाणावर शरीरावर दिसून येतो. मधुमेह, कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब इत्यादी आजार झाल्यानंतर शरीरात वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. थकवा, अशक्तपणा वाढल्यानंतर आहारात बीट खाण्याचा सल्ला दिला जातो. बीटमध्ये फायबर, फोलेट, पोटॅशियम, विटामिन सी आणि नैसर्गिक नायट्रेट्स इत्यादी गुणकारी घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. यामुळे शरीराचे रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते. हृदयाच्या आरोग्यासाठी बीट खूप जास्त फायदेशीर आहे.(फोटो सौजन्य – istock)
Health Tips: हेल्दी स्नॅक्स खाऊनही पोट सुटलंय? ‘या’ सवयींमुळे वाढू शकते वजन
बीट कच्चे खावे की शिजवून? असे अनेक प्रश्न सगळ्यांचं कायम पडतात. बीट खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक प्रमाणात विटामिन सी आढळून येते. बीट खाताना ते कुरकुरीत लागते. कच्चे बीट खाल्ल्यामुळे गॅस, पोट फुगणे, पोटात अस्वस्थता जाणवणे तर काहींना ऍसिडिटी होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे शिजवलेले बीट खावे. शिजवलेले बीट सहज पचन होते. त्यामुळे कुकरमध्ये बीट हलकेसे वाफवून घ्या. तसेच शिजवलेल्या बीटमधील पोषक घटक कायम टिकून राहतात.
बीट खाण्यावर नियंत्रण ठेवणे फार आवश्यक आहे. कारण नियमित बीट खाल्ल्यास पचनाच्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे आठवड्यातून दोनदा किंवा तीनदाच बीटचे सेवन करावे. जास्त प्रमाणात बीट खाल्ल्यास जुनाट बद्धकोष्टता वाढून शरीराला हानी पोहचू शकते. बीटमध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर असते. अतिप्रमाणात फायबर खाल्ल्यामुळे पचनाच्या समस्या वाढतात. त्यामुळे बीट खाल्यानंतर पाणी पिणे फार आवश्यक आहे. बीटमध्ये नैसर्गिकरित्या ऑक्सलेट्सचे प्रमाण खूप जास्त असते. कॅल्शियम ऑक्सलेट किडनी स्टोन तयार करतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने बीट खावे.
बीट खाल्ल्याने रक्त वाढते किंवा हिमोग्लोबिन वाढते, असे अनेक गैरसमज आहेत. पण बीट खाल्ल्यामुळे लगेच रक्त वाढत नाही. बीटमध्ये इतर पदार्थांच्या तुलनेत खूप कमी लोह असते. त्यामुळे लोहाची कमतरता किंवा अॅनिमियाची कमतरता निर्माण झाल्यास आहारात डाळी, कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या आणि विटामिन सी इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. त्यामुळे लोह वाढवण्यासाठी बीट खाणे पर्याय नाही. मधुमेहाचे रुग्ण बीट खाण्यास घाबरतात. कारण बीटची चव गोड असते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी बीट खाण्याऐवजी बीटच्या ज्यूसचे, सॅलड किंवा भाजी बनवून खावी.
Ans: बीटचे प्रमाण वय, आरोग्य आणि आहाराच्या गरजेनुसार बदलते. सामान्यतः संतुलित आहाराचा भाग म्हणून मध्यम प्रमाणात बीट खाणे योग्य मानले जाते.
Ans: बीटमध्ये फायबर, फोलेट, पोटॅशियम, व्हिटॅमिन C आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. हे हृदयाचे आरोग्य, पचनक्रिया, रक्तदाब नियंत्रण आणि एकूण आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
Ans: ज्यांना किडनी स्टोनचा (विशेषतः ऑक्सलेट स्टोन) धोका आहे किंवा विशिष्ट आरोग्य समस्या आहेत, त्यांनी बीटचे सेवन किती करावे याबाबत डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.






