Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World IVF Day: आयव्हीएफ म्हणजे काय? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेली सविस्तर माहिती

वाढलेले वय, जीवनशैलीतील बदल आणि महिलांच्या शरीरात सतत होणाऱ्या हार्मोनल बदलांचा परिणाम गर्भधारणेवर दिसून येतो. त्यामुळे डॉक्टर बऱ्याचदा आयव्हीएफ करण्याचा सल्ला देतात. जाणून घ्या आयव्हीएफबद्दल सविस्तर माहिती.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 25, 2025 | 01:42 PM
आयव्हीएफ म्हणजे काय?

आयव्हीएफ म्हणजे काय?

Follow Us
Follow Us:

२५ जुलैला जगभरात सगळीकडे जागतिक आयव्हीएफ दिन साजरा केला जातो. आईवडील होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक जोडप्यांसाठी हा दिवस अतिशय महत्वाचा आहे. जगातील अतिशय सुंदर भावना म्हणजे आई होणे. पण बऱ्याचदा वाढलेले वय, जीवनशैलीतील चुकीच्या सवयी, आहारात होणारे बदल, धूम्रपान किंवा इतर अनेक गोष्टींचा परिणाम पुरुषांपेक्षा महिलांच्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे बऱ्याचदा गर्भधारणेमध्ये अनेक अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते.अशावेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार घेतले जातात. सगळ्यांची टेस्ट ट्यूब बेबीबद्दल ऐकले असेलच. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आयव्हीएफ म्हणजे काय? आयव्हीएफ प्रक्रिया नेमकी कशी असते? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)

झोपेतच वितळून जाईल पोटावरची अतिरिक्त चरबी; कोणतेही कष्ट न घेता ‘या’ घरगुती उपायांनी करा शरीराचा लठ्ठपणा दूर

आयव्हीएफसाठी कोणते जोडपे योग्य आहेत?

  • गर्भधारणा होण्यात अडचण निर्माण झाल्यानंतर आयव्हीएफ प्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
  • ज्या महिलांच्या फॅलोपियन ट्यूब ब्लॉक आहेत
  • गंभीर एंडोमेट्रिओसिस आहे
  • ज्या पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या खूप कमी असते.
  • सर्व चाचण्या केल्यानंतर अहवाल सामान्य असूनही गर्भधारणा होत नाही. अशाच जोडप्यांची निवड केली जाते. त्यानंतर सगळ्यात
  • आधी त्यांची आरोग्य तपासणी केली जाते.

आयव्हीएफ करण्याआधी कोणत्या अवयवांची तपासणी केली जाते?

आयव्हीएफ करण्याआधी महिला आणि पुरुषांच्या विविध अवयवांची तपासणी केली जाते. त्यामध्ये मूत्रपिंड आणि यकृताचे कार्य, रक्तातील साखर, थायरॉईड, रक्त चाचण्या, मेटाबॉलिक प्रोफाइल इत्यादी अवयवांची तपासणी केली जाते. तपासणी केल्यानंतर काही असंतुलन आढळून आल्यास औषध उपचार करून शरीर संतुलित केले जाते. त्यानंतर शरीर योग्यरीत्या बरे झाल्यानंतर आयव्हीएफ प्रक्रिया केली जाते.

मासिक पाळी येण्याच्या किती दिवस आधी आयव्हीएफ प्रक्रिया सुरु होते?

आयव्हीएफ प्रक्रिया करण्यासाठी महिलांना मासिक पाळीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आयव्हीएफ सेंटरमध्ये बोलावले जाते. त्यानंतर आयव्हीएफसाठी आवश्यक असलेल्या सर्व रक्त चाचण्या, अल्ट्रासाऊंड केले जातात. त्यानंतर हार्मोनल इंजेक्शनची प्रक्रिया सुरू होते. हे इंजेक्शन नियमित दिले जाते, ज्यामुळे अतिशय सामान्य वेदना होतात. तसेच हे इंजेक्शन महिलांच्या पोटावर किंवा मांड्यांवरसुद्धा देतात.

अंडी तयार होण्यासाठी लागणारा कालावधी:

इंजेक्शन दिल्यानंतर साधारणपणे 10  दिवसांत फॉलिकल्स अंडी तयार होतात. त्यानंतर सहाव्या दिवशी पुन्हा एकदा रक्त तपासणी आणि अल्ट्रासाऊंड केले जाते. ज्यामध्ये इंजेक्शन वाढवायचे की कमी करायचे, याबद्दल ठरवले जातात. अंडी तयार होण्यासाठी 10 दिवसांचा कालावधी लागतो. ज्यावेळी अंडी पूर्णपणे तेव्हा ट्रिगर इंजेक्शन दिले जाते. 36 तासांनंतर अंडी काढून टाकली जातात, ज्याला एग रिट्रीव्हल म्हणतात.आयव्हीएफ प्रक्रिया करताना शरीरावर कोणतेही टाके किंवा कट दिले जात नाहीत. एका विशेष प्रकारच्या योनीच्या अल्ट्रासाऊंड प्रोबच्या मदतीने, महिलेच्या योनीतून अंडी काढली जातात. ही प्रक्रिया करताना महिलांना वेदनाशामक औषध दिले जातात.

‘लव्ह मॅरेज’ करणाऱ्यांसाठी प्रेमानंद महाराजांचा सल्ला! नाते आयुष्यभर टिकवण्यासाठी दिला महत्वाचा उपदेश

महिलांच्या शरीरातून काढलेली अंडी थेट गर्भतज्ज्ञाकडे सोपवली जातात. त्यानंतर ते द्रवापासून वेगळे केले जाते इन्क्यूबेटरमध्ये सुरक्षित ठेवले जाते. पुरुष जोडीदाराकडून घेतलेल्या वीर्याची सुद्धा चाचणी केली जाते.शुक्राणू कमकुवत असतील तर ICSI (इंट्रासाइटोप्लाज्मिक स्पर्म इंजेक्शन) तंत्राचा वापर करून, प्रत्येक शुक्राणू थेट अंड्यात टोचले जातात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: What is ivf know the detailed information given by the experts world ivf day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2025 | 01:42 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • IVF
  • pregnancy health

संबंधित बातम्या

पित्ताचा त्रास वाढवणाऱ्या ‘या’ पदार्थांचे अजिबात करू नका सेवन, अन्यथा पचनासंबंधित उद्भवतील गंभीर समस्या
1

पित्ताचा त्रास वाढवणाऱ्या ‘या’ पदार्थांचे अजिबात करू नका सेवन, अन्यथा पचनासंबंधित उद्भवतील गंभीर समस्या

आरोग्यासाठी नारळाचे तेल की Avocado ऑईल? रोजच्या आहारासाठी कोणते तेल ठरेल आरोग्यदायी, जाणून घ्या सविस्तर
2

आरोग्यासाठी नारळाचे तेल की Avocado ऑईल? रोजच्या आहारासाठी कोणते तेल ठरेल आरोग्यदायी, जाणून घ्या सविस्तर

सकाळच्या नाश्त्यात चुकीचे पदार्थ खात असाल तर थांबा! सकाळी चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ, उद्भवतील गंभीर समस्या
3

सकाळच्या नाश्त्यात चुकीचे पदार्थ खात असाल तर थांबा! सकाळी चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ, उद्भवतील गंभीर समस्या

दैनंदिन आहारात खाल्लेल्या चुकीच्या तेलामुळे वाढतो कोलेस्ट्रॉलचा धोका! हृदय निरोगी राहण्यासाठी ‘हे’ तेल आहे सर्वोत्तम
4

दैनंदिन आहारात खाल्लेल्या चुकीच्या तेलामुळे वाढतो कोलेस्ट्रॉलचा धोका! हृदय निरोगी राहण्यासाठी ‘हे’ तेल आहे सर्वोत्तम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.