(फोटो सौजन्य: istock)
लट्ठपणा हे जगातील वाढत चाललेली आरोग्य समस्या आहे. आपल्याला सामान्य वाटत असलेली ही समस्या आपल्या आरोग्याचे मात्र मोठे नुकसान करत असते. लठ्ठपणामध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त चरबी जमा होऊ लागते ज्यामुळे हृदयविकार, मधुमेह आणि उच्च रक्तदाब अशा समस्या उद्भवू लागतात. चुकीची जीवनशैली, चुकीचा आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे लठ्ठपणा झपाट्याने वाढत जातो. एकदा का आपले वजन वाढले की मग ते कमी करणे फार कठीण असते. नेहमीच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे अनेकांना डाएट फॉलो करायला जमत नाही, परिणामी लठ्ठपणा कमी करणे त्याच्यासाठी आव्हात्मक ठरते. अशात आम्ही तुम्हाला सांगतो की, काही ड्रिंक्स तुम्हाला यात तुमची मदत करू शकतात आणि तुमचे वजन झपाट्याने कमी करू शकतात. आज आम्ही तुम्हाला अशा काही नैसर्गिक पेयांची माहिती सांगत आहोत ज्यांचे झोपेच्या वेळी सेवन करताच शरीराची चरबी वितळवण्याच्या प्रक्रियेला गती मिळते. यामुळे पचनक्रियाही सुरळीत होते आणि शरीरातील कॅलरीजही जळून निघतात.
महिनाभरात होईल केसांची घनदाट वाढ! ‘हे’ घरगुती उपाय केल्यास केस गळणे होईल कायमचे कमी
लिंबू पाणी
लिंबू पाणी हे एक सामान्य पेय आहे ज्याने तुम्ही तुमचे वजन कमी करू शकता. यासाठी कोमट पाण्यात लिंबू पिळून झोपण्याआधी याचे सेवन करा. हे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत होते. लिंबूमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे चरबी वितळवण्यात मदत करतात. यामुळे मेटाबॉलिझम वाढतो आणि पोट साफ होण्यासही मदत होते.
हळदीचं दूध
अनेक आजार दूर करण्यासाठी हळदीचे कोमट दूध फायदेशीर मानले जाते. हळदीच्या गरम दुधात ट्रॅप्टोफॅन असते त्यामुळे शांत आणि गाढ झोप लागण्यास मदत मिळते. याशिवाय यात अँटीइन्फ्लमेट्री गुणधर्म आढळून येतात जे वजन कमी करण्यास मदत करतात.
आल्याचा चहा
आल्याचा चहा देखील आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. आल्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. आल्याचा चहा पचनक्रिया सुधारते, रोगप्रतिकारशक्ती वाढते, आणि शरीरातील सूज कमी करण्यास मदत करते. एक कप गरम पाण्यात किसलेले आले उकळून याचे सेवन करा, यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी देखील कमी होईल.
ग्रीन टी
वजन कमी कारण्यासाठीचे सर्वात लोकप्रिय आणि प्रभावी ड्रिंक म्हणजे ग्रीन टी. यातील पोषक घटक पोटावरची चरबी वितळवण्यास प्रभावी ठरतात. रात्री झोपताना ग्रीन टीचे सेवन करा. यामुळे मेटाबॉलिझम झोपेच्या दरम्यानही कार्यरत राहतो, ज्यामुळे अधिक कॅलरी खर्च होतात.
मेथी दाण्याचं पाणी
स्वयंपाक घरात उपलब्ध असलेले मेथी दाणे वजन कमी करण्यास तुमची मदत करू शकतात. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी पाण्यात भिजवा आणि मग ते प्या. असं दररोज केल्यास शरीरातील मेटाबॉलिझम सुधारतो आणि पोटावरची चरबी कमी होते. हे पाणी शरीरातील पचनक्रिया नियंत्रित करते आणि हळूहळू वजन कमी करण्याचे काम करते.
मी माझ्या खाण्याच्या सवयी कशा बदलू शकतो?
अनहेल्दी सवयी ओळखून आणि त्याऐवजी आहारात अधिक फळे आणि भाज्यांचा समावेश करा.
मी माझी भूक कशी नियंत्रित करू शकतो?
नियमित, संतुलित जेवण खा, हायड्रेटेड रहा आणि पोट भरल्यासारखे वाटण्यासाठी तुमच्या आहारात फायबर आणि प्रथिने समाविष्ट करा.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.