मुंबई- सध्याच्या अस्थिर आणि स्पर्धेच्या जगण्यात कोणाचा कधी आणि कसा मृत्यू होईल, हे सांगता येणं शक्य नाही. अगदी काल-परवा भेट झालेल्या मित्राची, नातेवाईकाची मृत्यूची बातमी कधी अचानक येऊन धडकेल, आणि आपल्याला धक्का बसेल, हे सांगणं अवघड होऊन बसलं आहे. यातही हार्ट अटॅक (heart attack), कॅन्सर (cancer) यानं होणाऱ्या मृत्युंचं प्रमाण तर जास्त आहेच. मात्र गेल्या काही दिवसांपासून दर 4 मिनिटांला देशातील एका व्यक्तीचा मृत्यू स्ट्रोक म्हणजेच आघात आल्यानं होऊ लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही प्रख्यात न्युरॉलॉजिस्टच्या दाव्यांनुसार स्ट्रोकची (stroke) 68.6 टक्के प्रकरणं ही आपल्या देशात समोर येत आहेत. या आघातामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाणा 70.9 इतकं भारतात जास्त असल्याचंही सांगण्यात येतंय.
शरीरातील एखादी रक्तवाहिनी अतिदाबानं फाटते, त्यातून रक्तवाहिनीतून शरिरातच बाहेर वाहण्यास सुरुवात होते. किंवा मेंदूला होणाऱ्या रक्तपुरवठ्यात अडथळा निर्माण होतो, त्याला स्ट्रोक किंवा आघात असं संबोधलं जातं.
भारतात मृत्यूचं सर्वात मोठं दुसरं कारण हे स्ट्रोक असल्याचं प्रसिद्ध न्युरॉलॉजिस्ट यांनी नुकतचं सांगितलंय. भारतात स्ट्रोकची प्रत्येक वर्षी 1,85,000 प्रकरणं समोर येतायेत. देशाचा विचार केला तर प्रत्येक 40 सेकंदाला एका व्यक्तीला स्ट्रोक येतोय. आणि दर 4 मिनिटांनी स्ट्रोक आलेल्या एका आजारी व्यक्तीचा मृत्यू होतो आहे. हे आकडे अत्यंत चिंताजनक असल्याचं मतही वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त करण्यात येतंय.
स्ट्रोक आल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत माणसाचा जीव जाण्याची शक्यता आहे. त्यानुलं स्ट्रोक आल्यानंतर तातडीनं त्यावर उपचार करण्याची गरज असते. उपचार वेळेवर झाले नाहीत तर पॅरालिसिससारखी जन्मभराची व्याधीही मागे लागू शकते. 40 सेकंदाला एका व्यक्तीला देशात स्ट्रोक येत आहे, ही आकडेवारी भयंकर असूनही अशा रुग्णांवर तातडीनं उपचार करण्यासाठीची तयारी भारतातल्या हॉस्पिटलमध्ये नसल्याची खंत व्यक्त करण्यात येतेय. यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत उपकरणांचा आणि इच्छाशक्तीचा अभाव जाणवत असल्याचंही सांगण्यात येतंय.