Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हार्ट फेल आणि हार्ट अटॅकमध्ये काय असतो फरक? कोणता जास्त घातक?

हार्ट फेल आणि हार्ट अटॅकमध्ये खूप फरक असतो. हार्ट फेल हार्ट अटॅकच्या तुलनेत जरा कमी प्रभावशाली असला तरी तो प्राणघातक ठरू शकतो. जगात बहुतेक अशी माणसे आहेत ज्यांचा मृत्यू हार्ट फेलने झाला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 15, 2024 | 09:21 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

हृदयविकाराचे अनेक स्वरूप असतात. त्यातील प्रत्येक स्वरूप हा त्या त्या रूपाने गंभीर असतो. जगात अनेक लोक या आजाराने त्रस्त आहेत. अनेक लोकांचा हृदयविकाराने बळी जातो. वेळीच उपचार घेतल्यावर याचे प्रमाण फार कमी होत असते. हृदयविकारा कोणताहि असो तरी तो आरोग्यसाठी घातकच असतो. जगात जास्त करून व्यक्ती हृदयविकारामुले मृत्यू पावतात. हल्ली हा आजार तरुणांमध्येही आढळून येत आहे. व्यायामशाळेमध्ये व्यायाम करताना अनेक मृत्यू पावत आहेत. या विकाराने त्याची सीमा ओलांडली आहे, याला व्यक्तीची जीवनशैली कारणीभूत आहे. आपण काय खातो? तसेच आपले संपूर्ण खानपान या विकाराशी संबंधित आहे. त्यामुळे हृदयविकार असणारी मंडळी खाण्यापिण्याच्या बाबतीत फार पथ्य पाळतात.

बटर की चीज? आरोग्यास काय जास्त फायद्याचे? जाणून घ्या

आपण अनेकदा ऐकले असेल कि एखाद्याचा हार्ट फेल होऊन मृत्यू झाला, तर कधी काळी असे ऐकण्यात येते कि हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाला. या दोन्ही गोष्टी फार वेगवगेळ्या आहेत. या दोन्ही गोष्टींनी जगात मृत्यूचे थैमान घातले आहे. हार्ट फेल म्हणजे हृदयाच्या स्नायूंची क्षमता कमी होते, ज्यामुळे हृदय योग्यरित्या रक्त पंप करू शकत नाही. तर हृदयविकाराच्या झटक्यामध्ये हृदयाच्या स्नायूंना ऑक्सिजन आणि रक्ताचा पुरवठा थांबतो, ज्यामुळे हृदयाच्या स्नायूंना इजा होते.

काय असते हार्ट फेल?

हार्ट फेल म्हणजेच हृदय निकामी होणे. हार्ट फेल म्हणजे हृदयाच्या स्नायूंना रक्त पंप करण्याची क्षमता कमी होते. यामुळे हृदय शरीराच्या गरजेनुसार रक्त पंप करू शकत नाही. हार्ट फेल हळूहळू विकसित होतो आणि दीर्घकालीन अवस्थेत गंभीर होतो. हाय ब्लड प्रेशर, कोरोनरी आर्टरी डिसीज तसेच हृदयाचे झडप (वॉल्व) बिघडणे अशा कारणांमुळे हार्ट फेल होते. श्वास घेण्यास त्रास होणे, थकवा तसेच पाय आणि टाचांमध्ये सूज येणे असे काही हार्ट फेलचे लक्षणे आहेत. हार्ट फेल दीर्घकालीन व्यवस्थापनाच्या मदतीने नियंत्रित करता येतो, पण वेळीच उपचार न घेतल्यास प्राणघातक ठरू शकतो.

काय असत हार्ट अटॅक?

हार्ट अटॅक म्हणजे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या (कोरोनरी आर्टरी) अडवल्यामुळे हृदयाच्या स्नायूंना ऑक्सिजनचा पुरवठा थांबतो. यामुळे हृदयाच्या स्नायूंना मोठ्या प्रमाणात इजा होते. हार्ट अटॅक अचानक घडतो आणि वेगाने उपचार आवश्यक असतो. कोलेस्ट्रॉलचे ब्लॉकेज, ब्लड क्लॉटिंग या कारणाने हार्ट अटॅकशी समस्या उद्भवते. हार्ट अटॅकवेळी छातीत तीव्र वेदना होतात. श्वास घ्यायला त्रास होतो, तसेच घाम येणे आणि थकवा अशी लक्षणे आढळतात.

‘या’ चुका बाप बनण्याच्या मार्गात आडव्या येऊ शकतात, आजच जाणून घ्या

हार्ट अटॅक हार्ट फेलपेक्षा जास्त घातक ठरतो. कारण शरीरात ही प्रोसेस फार वेगाने होत असते. हार्ट फेल शरीरामध्ये हळूहळू घडतो आणि हा असाच घडत जातो. पण तो पर्यंत उपचार घेण्यास व्यक्तीला जास्त वेळ मिळतो.

Web Title: What is the difference between heart failure and heart attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2024 | 09:21 PM

Topics:  

  • Health Tips

संबंधित बातम्या

Health Tips : सोप्या जीवनशैलीतील बदलांनी मधुमेह, स्थूलता आणि उच्च रक्तदाब टाळणं  शक्य, तज्ज्ञांचा महत्त्वपूर्ण सल्ला
1

Health Tips : सोप्या जीवनशैलीतील बदलांनी मधुमेह, स्थूलता आणि उच्च रक्तदाब टाळणं शक्य, तज्ज्ञांचा महत्त्वपूर्ण सल्ला

झोपेच्या कमतरेमुळे मेंदू आकुंचन पावत आहे! जाणून घ्या रोजच्या कोणकोणत्या सवयींमुळे ब्रेनवर होतो वाईट परिणाम
2

झोपेच्या कमतरेमुळे मेंदू आकुंचन पावत आहे! जाणून घ्या रोजच्या कोणकोणत्या सवयींमुळे ब्रेनवर होतो वाईट परिणाम

उष्णता, मुरुमे आणि बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय, उन्हाळ्यात फक्त 1 ग्लास हा ज्यूस प्या आणि कमाल पाहा; पैसे घालवण्याचीही गरज नाही
3

उष्णता, मुरुमे आणि बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय, उन्हाळ्यात फक्त 1 ग्लास हा ज्यूस प्या आणि कमाल पाहा; पैसे घालवण्याचीही गरज नाही

Bloating Problem : कमी खाल्लयानंतरही सतत पोट का फुगत? तुम्ही करत असलेली लहान चूक ठरतेय कारणीभूत; आजच जाणून घ्या
4

Bloating Problem : कमी खाल्लयानंतरही सतत पोट का फुगत? तुम्ही करत असलेली लहान चूक ठरतेय कारणीभूत; आजच जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.