प्रतिकात्मक फोटो
मुंबई – गेल्या ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली असून लसीकरण केंद्रावर १८ वर्षांवरील लाभार्थी लशीच्या मात्रा घेण्यासाठी येत आहेत. त्यामुळे पालिकेस खाजगी लसीकरण केंद्रावर दोन सत्रात लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. दरम्यान, १५ ते १८ वयोगटातील जास्तीत जास्त मुलांचे लसीकरण करण्यासाठी, काही कनिष्ठ महाविद्यालयांसह मुंबईतील प्रत्येक खाजगी आणि सार्वजनिक शाळांच्या आवारात लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.
३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू झाले आणि १८ जानेवारीपर्यंत एकूण १,७७,६१४ मुलांनी डोस घेतला आहे. मुंबईत १५ ते १८ वयोगटातील ९ लाख २२ हजार ५६६ मुले लशीच्या मात्रा घेण्यास पात्र आहेत. “आतापर्यंत लक्ष्यित लोकसंख्येच्या २० टक्के लसीकरण करण्यात पालिकेला यश आले असून मुलांचा प्रतिसाद मिळत आहे. आता लसीकरण मोहीम जलद करण्यासाठी, शहरातील प्रत्येक शाळांच्या परिसरात लसीकरण शिबिरे आयोजित करण्यात येणार असून खासगी संस्थांना देखील लसीकरण शिबिराचे आयोजन करणे गरजेचे आहे, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. दरम्यान, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत लसीकरण मोहीमेला गती देण्यासाठी ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मुलांच्या लसीकरणाला गती देणे यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.
दोन सत्रांत लसीकरण
“मुलांव्यतिरिक्त सर्व पात्र विद्यार्थी देखील जंबो सेंटरमध्ये डोस घेण्यासाठी येत आहेत. त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्यांना डोस मिळावे म्हणून कर्मचार्यांना शिफ्टमध्ये विभाजित करत टाइम स्लॉट देणार आहे. १५- १८ वर्षांच्या मुलांना त्यांचा डोस फक्त दुपारी मिळेल तर उर्वरित पात्र लाभार्थ्यांना सकाळी त्यांचा डोस मिळेल, असे काकाणी म्हणाले.
[read_also content=”शहरे सुरक्षित करण्यासाठी ‘ईज ऑफ लिव्हिंग’चा काळाची गरज – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे https://www.navarashtra.com/latest-news/kokan/time-is-needed-for-ease-of-living-to-secure-cities-says-urban-development-minister-eknath-shinde-225893.html”]