
एक घास ३२ वेळा चावून खाण्यामागचे रहस्य काय? जाणून घ्या पचनक्रियेवर होणारे परिणाम
लहानपणी आपल्याला हजार वेळा हे कानावरून जातं की, एक घास ३२ वेळा चाऊन खावा. पण कधी विचार केलाय का, की एक घास ३२ वेळाच का चावायचा? नक्की काय सांगतं यामागील शास्त्र. आज या व्हिडिओतून आपण हेच जाणून घेऊया खरं तर प्रत्येक घास ३२ वेळा चावून खाल्ल्याने अन्नाचे बारीक तुकडे होतात आणि लाळ नीट मिसळून पचनक्रिया सुधारते असा विज्ञानात शिकवलं जातं. ३२ वेळा घास चावण्याचा मुख्य फायदा म्हणजे पचन सुधारते. अन्नात लाळ व्यवस्थित मिसळल्याने पोटात अन्नाचे पचन सोपे होते आणि अपचन, ॲसिडिटी किंवा गॅसचा त्रास होत नाही.(फोटो सौजन्य – istock)
याशिवाय ३२ वेळा घास चावल्याने शरीराला चांगली पोषणतत्त्वे मिळतात. म्हणजेच काय तर अन्न जास्त वेळ चघळल्याने शरीराला त्यातील पोषक घटक आणि ऊर्जा वेगाने व अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेता येतात.
तसंच महत्त्वाचा फायदा म्हणजे वजन नियंत्रणात राहते. हळूहळू खाल्ल्यामुळे मेंदूला पोट भरल्याचे संकेत मिळतात, ज्यामुळे अतिखाणे टाळले जाते आणि वजन नियंत्रणात राहते. तसंच दातांचं आरोग्यदेखील यामुळे चांगलं राखण्यास मदत मिळते. सततच्या चर्वणामुळे तोंडाच्या स्नायूंना चांगला व्यायाम मिळतो आणि दातांचे आरोग्य सुधारते.
आता प्रश्न नेमका हा आहे की, ३२ वेळाच का घास चावावा? तर ३२ हा आकडा माणसांच्या दातांच्या संख्येवरून किंवा परंपरेनुसार सांगितला गेला आहे. सर्व अन्नपदार्थ अगदी नेमके ३२ वेळाच चावले पाहिजेत असं अजिबात नाही; अन्नाच्या स्वरूपानुसार म्हणजेच मऊ अन्न व कडक पदार्थानुसार चघळण्याचे प्रमाण कमी-जास्त असू शकते. महत्त्वाचा उद्देश हाच आहे की अन्न गिळण्यापूर्वी तोंडात चांगले बारीक झाले पाहिजे आणि मगच ते पोटात जायला हवं.
Ans: नाही. प्रत्येक घास नेमका ३२ वेळा चावणे हा ठराविक वैज्ञानिक नियम नाही. मात्र अन्न नीट आणि हळूहळू चावून खाल्ल्याने पचनास मदत होऊ शकते.
Ans: चावल्यामुळे अन्नाचे छोटे तुकडे होतात आणि लाळ त्यात मिसळते. त्यामुळे अन्न गिळणे आणि पुढील पचनप्रक्रिया तुलनेने सुलभ होण्यास मदत होते.
Ans: घाईने खाल्ल्याने अन्न नीट चावले जात नाही आणि काही लोकांमध्ये पोट फुगणे, अपचन किंवा अस्वस्थता जाणवू शकते. त्यामुळे सावकाश जेवण्याची सवय चांगली.