
पावसाळ्यात सतत खोकला होऊन छातीत कफ साचून राहतो? मग 'या' पदार्थांचे सेवन केल्यास कफापासून मिळेल कायमची सुटका
पावसाळ्यात कफ होण्याची कारणे?
छातीत कफ साचून राहिल्यास काय खावे?
कफ होऊ नये म्हणून घरगुती उपाय?
पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर शरीरसंबंधित वेगवेगळ्या समस्या वाढू लागतात. पाऊस भिजून आल्यानंतर वारंवार सर्दी, खोकला होणे तर काहीवेळा साथीच्या आजारांची सुद्धा लागण होते. साथीचे आजार झाल्यानंतर शरीरात खूप जास्त थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे फार आवश्यक आहे. सर्दी खोकला झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध, उपचार आणि अँटी-बायोटिक औषधांचे सेवन केले जाते. पण गोळ्या औषधांच्या सेवनामुळे तात्पुरता फरक पडतो आणि पुन्हा एकदा सर्दी खोकला होऊन आरोग्य बिघडून जाते. छातीत जमा झालेला कफ कमी करण्यासाठी मेडिकलमधील गोळ्या औषधांचे सेवन करण्याऐवजी डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करावेत. याशिवाय आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेले पदार्थ खाल्ल्यास छातीत जमा झालेला कफ बाहेर पडून जाईल.(फोटो सौजन्य – istock)
प्रत्येक स्वयंपाक घरात आलं उपलब्ध असते. आल्याचा वापर जेवणातील विविध पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. आल्यामध्ये असलेले आरोग्य सुधारण्यास मदत करतात. सतत सर्दी, खोकला होत असल्यास आल्याचा रस काढून टाकून मध मिक्स करून प्यावे. आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा आल्याचा रस घेतल्यास कफ नष्ट होण्यास मदत होईल. छातीत जमा झालेला कफ आणि घसा खवखवणे यांसारख्या समस्यांपासून मिळवण्यासाठी आल्याचा रस प्यावा. आल्यात असलेले दाहक विरोधी गुणकारी घटक बॅक्टेरियल संसर्गांपासून सुटका मिळवून देतात.
सर्दी खोकला झाल्यानंतर कायमच गोळ्या औषधांचे सेवन करू नये. त्याऐवजी गरम पाण्यात पुदिन्याचे तेल टाकून वाफ घ्यावी. वाफ घेतल्यामुळे छातीत जमा झालेला कफ बाहेर पडून जाण्यास मदत होईल. याशिवाय घसा खवखवल्यास किंवा सतत नाकातून पाणी येत असल्यास पुदिन्याच्या तेलाची वाफ घ्यावी. वाफ घेतल्यामुळे कफ बाहेर पडून जातो.
छातीमध्ये जमा झालेला कफ बाहेर काढून टाकण्यासाठी काळीमिरी आणि मधाचे चाटण बनवून खावे. त्यानंतर गरम पाणी प्यायल्यास सर्दी खोकला कमी होण्यासोबतच पचनक्रिया सुरळीत चालू राहील. यासाठी काळीमिरी पावडरची पेस्ट बनवून त्यात मध मिक्स करून चाटण तयार करा. तयार केलेले चाटण दिवसभरातून दोनदा किंवा तीनदा घेतल्यास फरक दिसून येईल.
Ans: पावसाळ्यात हवामानातील आर्द्रता, व्हायरल संसर्ग, अॅलर्जी किंवा दमा यांसारख्या कारणांमुळे खोकला आणि कफाचा त्रास होऊ शकतो.
Ans: कोमट द्रवपदार्थ, सूप, पौष्टिक फळे-भाज्या आणि पुरेसे पाणी घेणे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करू शकते. मात्र कोणताही पदार्थ कफ ‘कायमचा’ दूर करतो असे निश्चितपणे म्हणता येत नाही.
Ans: कोमट द्रवपदार्थ घेतल्याने घशातील खवखव कमी होण्यास आणि कफ सैल होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे कफ बाहेर पडणे काही प्रमाणात सोपे होऊ शकते.