चेहऱ्यावर कोणत्याही महागड्या क्रीम लावण्याऐवजी 'या' पद्धतीने करा पाण्याचा वापर
सर्वच महिलांना आपली त्वचा कायमच चमकदार आणि सुंदर हवी असते. त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. कधी स्किन केअर प्रॉडक्ट तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या ट्रीटमेंट केल्या जातात. त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी कायमच महागडी सौंदर्य उत्पादनांचा वापर करण्याऐवजी नैसर्गिक पद्धतीने त्वचा स्वच्छ करावी. चेहऱ्यावरील घाण स्वच्छ करण्यासाठी साबण किंवा फेसवॉशचा वापर केला जातो. पण केमिकल युक्त फेसवॉशचा वापर करण्याऐवजी पाण्याने त्वचा स्वच्छ धुवावी. पाण्याचा वापर करून त्वचा स्वच्छ केल्यास चेहऱ्यावर चमकदार ग्लो येईल आणि त्वचा खूप जास्त सुंदर दिसेल. (फोटो सौजन्य – istock)
चेहरा स्वच्छ करण्यासाठी पाण्याचा वापर करावा. पाण्याचा वापर केल्यामुळे त्वचेवर जमा झालेली धूळ, माती आणि घाण स्वच्छ होते. त्यामुळे दिवसभरातून किमान दोन वेळा त्वचा पाण्याने स्वच्छ करावी. चेहऱ्यावर कोणताही साबण किंवा फेसवॉश लावण्याची आवश्यकता नाही. सकाळी उठल्यानंतर चेहऱ्यावर हलक्या हाताने पाणी मारल्यास रात्रभरात साचलेला तेलकटपणा, घाण आणि मृत पेशी निघून जातात आणि त्वचेमधील ऑक्सिजन पातळी सुधारते. याशिवाय त्वचा स्वच्छ करण्यासाठी गरम पाण्याचा वापर अजिबात करू नये. गरम पाण्याच्या वापरामुळे चेहऱ्यावरील नैसर्गिक तेल नष्ट होते आणि त्वचा खूप जास्त कोरडी दिसू लागते. त्यामुळे त्वचा स्वच्छ करण्यासाठी थंड किंवा कोमट पाणी वापरावे.
काहींना चेहरा धुवताना खूप जास्त फेसवॉश वापरण्याची सवय असते आणि त्वचा हाताने खूप जोरात घासल्यामुळे त्वचेला हानी पोहचते. त्यामुळे थंड पाण्याने चेहरा जोरात घासण्याऐवजी हलक्या हाताने चेहऱ्यावर पाणी शिंपडावे. यामुळे त्वचेमधील रक्तभिसरण सुधारते आणि त्वचेवर जास्तीचा तणाव येत नाही. चेहरा स्वच्छ धुवून झाल्यानंतर हलक्या हाताने पुसावा. जास्त जोरात त्वचा पुसू नये. यामुळे त्वचा लाल होणे, चेहऱ्यावर रॅश येणे किंवा त्वचेच्या समस्या वाढून चेहऱ्याचे नुकसान होते. तसेच थंड पाणी चेहऱ्यावर काहीवेळ तसेच ठेवावे. यामुळे चेहऱ्यामधील उष्णता कमी होते.
वाढत्या थंडीत रोज अंघोळ करावी का? रिसर्चमध्ये करण्यात आला आश्चर्यकारक खुलासा, कारण वाचून व्हाल आनंदी
दिसवभारातून दोनदा चेहऱ्यावर नियमित बर्फ फिरवल्यास महिनाभरात चेहऱ्यावर चमकदार ग्लो दिसून येईल आणि त्वचा खूप सुंदर दिसेल. त्वचेवर बर्फ फिरवल्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, यामुळे चेहऱ्यावर वाढलेला थकवा, अशक्तपणा, सूज कमी होऊन त्वचा फ्रेश दिसते. थकवा घालवण्यासाठी बर्फ कापडामध्ये गुंडाळून चेहऱ्यावर फिरवावा. यामुळे स्किनला कोणतीही हानी पोहचत नाही. त्वचेच्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी कायमच घरगुती आणि नैसर्गिक पदार्थांचा वापर करावा.






