इजिप्तने कशा प्रकारे मिळवली डासांपासून मुक्ती
वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे सगळीकडे मोठ्या प्रमाणावर रोगराई पसरते. रोगराई पसरल्यामुळे साथीचे आजार वाढू लागतात. यामध्ये दरवर्षी डेंग्यू, मलेरिया, कावीळ इत्यादी अनेक आजार वाढू लागतात. मलेरिया सारखा गंभीर आजार झाल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. शरीरामध्ये सतत अशक्तपणा जाणवू लागतो. त्यामुळे सर्वच ऋतूंमध्ये आरोग्याची व्यवस्थित काळजी घ्यावी. मादी ॲनोफिलीस डास चावल्यानंतर मलेरिया होतो. हा डास सगळ्यात आधी मलेरिया झालेल्या व्यक्तीला चावतो, त्यानंतर त्यांच्या शरीरातील जीव आपल्या शरीरात घेऊन निरोगी व्यक्तीला चावतो. यामुळे मलेरिया संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरतो. मलेरिया झाल्यानंतर योग्य वेळी उपचार न मिळाल्यामुळे रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: हृदयाच्या नसा बंद होण्याआधी शरीरात दिसून येतात ‘ही’ लक्षणे, वेळीच करा तपासणी
जगभरातील सर्वच देशांमध्ये मलेरियासह इतर सर्व साथीचे आजारांचे रुग्ण आहेत. त्यामुळे असा कोणताही देश नाही जिथे ,मलेरिया किंवा इतर आजारांचे रुग्ण नाहीत. सर्वच देशांमध्ये मलेरियाचे रुग्ण आहेत. पण जागतिक आरोग्य संघटनेने इजिप्तला मलेरिया मुक्त देश म्हणून घोषित केले आहे. इजिप्तच्या या ऐतिहासिक कामगिरीचे सर्वच देशांनी कौतुक केले आहे. इजिप्त मलेरिया मुक्त देश झाल्यामुळे सर्वच देशांना मोठा धक्का बसला आहे.
भारतासह इतर सर्वच देशांमध्ये मलेरियासह इतर सर्वच आजाराचे रुग्ण आहेत. ग्रामीण आणि आदिवासी भागात मोठ्या प्रमाणावर साथीच्या आजारांचा प्रसार होतो. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता नसल्यामुळे आणि योग्य त्या सोयीसुविधांचा अभाव असल्यामुळे मलेरिया सारखे गंभीर आजार पसरण्याची शक्यता असते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर डास, मच्छर येतात. त्यामुळे डास मुक्त होण्यासाठी औषधांची फवारणी करणे फार गरजेचे आहे.
हे देखील वाचा: बॅड कोलेस्ट्रॉल हटवण्यासाठी उपयुक्त ठरते ही भाजी
मलेरियापासून मुक्त मिळवण्यासाठी इजिप्तने काही धोरण आखली होती. त्या धोरणांनुसार मलेरियाचे निदान आणि उपचार, प्रशिक्षित आरोग्य तज्ञ आणि शेजारील देशांशी मजबूत भागीदारी करण्यात आली होती. त्यामुळे भारतासारख्या जास्त लोकसंख्या असलेल्या देशात आरोग्य सेवा बळकट करून, प्रतिबंधात्मक उपायांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.