हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे
हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठीच आहारात पौष्टिक आणि शरीराला पचन होईल अशाच अन्नपदार्थांचे सेवन करावे. पण काहींना सतत बाहेरचे तेलकट किंवा तिखट पदार्थ खाण्याची सवय असते. तेलकट किंवा तिखट पदार्थ खाल्यामुळे शरीराच्या नसांमध्ये पिवळ्या रंगाचे खराब कोलेस्ट्रॉल पोचण्यास सुरुवात होते. हे कोलेस्ट्रॉल हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. मागील काही वर्षांपासून हार्ट अटॅक येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. कमी वयात हार्ट अटॅकची समस्या जाणवू लागल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. हार्ट अटॅक येण्याआधी शरीरात अनेक लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे वेळीच ओळखून डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे.
हार्ट अटॅक येण्याच्या आधी हृदयाच्या नसा बंद होण्यास सुरुवात होते. तसेच हृदयाच्या आजूबाजूला असलेल्या असलेल्या नसा पातळ होऊन जातात. याला कोरोनरी आर्टरी ब्लॉक असे म्हणतात. ही समस्या उद्भवल्यानंतर येणाऱ्या काळात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. रक्तवाहिन्यांमध्ये अतिरिक्त चरबी जमा होण्यास सुरुवात झाल्यानंतर हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्या पातळ किंवा ब्लॉक होऊन जातात. ज्यामुळे शरीरातील रक्तदाब कमी होऊन हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: दोन आजार, ज्यामुळे अवयवाचे नुकसान होऊ शकते, माहीत असायलाच हवे
कोरोनरी आर्टरी ब्लॉकेज होण्याआधी छातीमध्ये दुखु लागते आणि अस्वस्थपणा वाटू लागतो. या वेदना छातीच्या मध्यभागी होऊ लागतात. त्यामुळे अशी कोणतीही लक्षणे दिसल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. जेणेकरून पुढे उद्भवणाऱ्या गंभीर समस्यांवर वेळीच मात करता येईल.
शांत बसून राहिल्यानंतर किंवा झोपल्यावर श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे. श्वास घेण्यास अडचण निर्माण झाल्यास हळूहळू हृदयाच्या नसा ब्लॉक होऊन जातात. तसेच यामुळे हृदयाचा रक्तप्रवाहात अडचणी निर्माण होतात.\
हे देखील वाचा: शारीरिक संबंधादरम्यानही पुरुषांमध्ये राहील Stamina, देशी पदार्थांचा करा आहारात समावेश
हृदयाचा रक्तप्रवाह कमी झाल्यानंतर शरीरात सतत थकवा जाणवणे किंवा अशक्तपणा जाणवण्यास सुरुवात होते. या लक्षणांकडे काहीवेळा दुर्लक्ष केलं जात. पण हेच छोटे आजार पुढे जाऊन मोठे होण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य वेळी औषध उपचार करून आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. थकवा जाणवू लागल्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो.