तामिळनाडूत अंड्यांच्या मेयोनीजवर का बंदी लादण्यात आली आहे (फोटो सौजन्य - iStock)
सार्वजनिक आरोग्य धोक्यांचा हवाला देत, तामिळनाडू सरकारने ८ एप्रिलपासून कच्च्या अंड्यापासून बनवलेल्या मेयोनीजचे उत्पादन, साठवणूक, वितरण आणि विक्रीवर एका वर्षासाठी बंदी घातली आहे. पारंपारिक मेयोनीजमध्ये तेल, अंड्याचा पिवळा भाग आणि लिंबाचा रस किंवा व्हिनेगर असतो, ज्यामध्ये अंड्यातील प्रथिने इमल्सीफायर म्हणून काम करतात. मेयोनीज आता जागतिक स्तरावर फास्ट फूडमध्ये एक महत्त्वाचा घटक बनला आहे.
असं असताना नक्की अंड्याच्या या मेयोनीजवर का बंदी घालण्यात येत आहे असा मुद्दा उपस्थित होणं साहजिक आहे. याचा नक्की शरीरावर काय परिणाम होतोय आणि कशा पद्धतीने कोणते आजार उद्भवत आहेत हे आपण या लेखातून जाणून घेऊया (फोटो सौजन्य – iStock)
का घालण्यात आली बंदी
तामिळनाडू सरकारने अंड्यांच्या मेयोनीजवर बंदी घातली आहे कारण त्यात स्वयंपाक प्रक्रियेदरम्यान पँथोजेन्स अर्थात पेस्टिसाईड्स असण्याचा धोका जास्त असतो. सरकारी अधिसूचनेत स्पष्टपणे म्हटले आहे की कच्च्या अंड्यातील मेयोनीज हे “हाय रिस्क फूड” आहे कारण यातून अन्न विषबाधा होण्याचा धोका आहे. भारतातील उष्ण आणि दमट हवामानात ही चिंता आणखी तीव्र करणारी आहे, ज्यामुळे मायक्रोबियल कॉन्टामिनेशन वाढू शकते, विशेषतः साल्मोनेला आणि ई. कोलाईचे दूषितीकरण वाढण्याचा धोका अधिक आहे असे अभ्यासात म्हटले आहे.
रात्री केलेल्या चुका सडवू शकतील तुमचे आतडे, समजल्यावर त्वरीत बदला सवय
साल्मोनेला आणि ई.कोलायचा धोका
जगभरात अन्नाच्या आजारांचे प्रमुख कारण साल्मोनेला बॅक्टेरिया आहेत, जे उष्ण आणि दमट परिस्थितीत वाढतात आणि अतिसार, उलट्या आणि पोटात पेटके यांसारखी लक्षणे निर्माण करतात. ई. कोलायच्या काही जाती गंभीर संसर्गासदेखील कारणीभूत ठरू शकतात. हे धोके विशेषतः कमी प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांसाठी, मुले आणि वृद्धांसाठी धोकादायक आहेत. या धोक्यांपासून सावधगिरीचा उपाय म्हणून डॉक्टरांनी अंड्यांच्या मेयोनीजवरील बंदीचे जोरदार स्वागत केले आहे.
कच्ची अंडी का धोकादायक
कच्च्या अंड्यामुळे नक्की काय होते
अंड्यांमध्ये अनेक रोगजनक असतात, जे सहसा स्वयंपाक प्रक्रियेद्वारे (उष्णतेचा वापर करून) निष्क्रिय केले जातात. परंतु मेयोनीजमध्ये कच्चे अंडे वापरले जाते. चेन्नईतील अपोलो हॉस्पिटल्समधील मुख्य क्लिनिकल आहारतज्ज्ञ डॉ. डॅफ्ने लव्हस्ली यांनी द इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, हे बॅक्टेरिया सर्वांना प्रभावित करू शकतात, परंतु ते “रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असलेल्या व्यक्ती, मुले आणि वृद्ध” अशा काही गटांसाठी अधिक गंभीर धोका निर्माण करतात. “हे एक ऊर्जा देणारे सॉस आहे, परंतु कच्च्या अंड्यांमध्ये साल्मोनेला बॅक्टेरिया असू शकतात. आरोग्याच्या दृष्टिकोनातून, हे एक स्वागतार्ह पाऊल आहे,” असेही त्यांनी सांगितले आहे.
बिझनेस स्ट्रॅटेजी बदल
या बंदीमुळे, तामिळनाडूमधील अन्न व्यवसायांना अंडी नसलेले किंवा पाश्चराइज्ड अंडी नसणाऱ्या मेयोनीजच्या पर्यायांकडे वळावे लागेल. भारतात अंडी नसलेले मेयोनीज अधिक लोकप्रिय असले तरी, अंड्याच्या मेयोनीजला मागणीदेखील आहे. तमिळ सरकारने तेलंगणाच्या मॉडेलचे अनुसरण केले आहे, जिथे अंड्यांच्या मेयोनीजवर आधीच बंदी घालण्यात आली आहे.
वयाच्या 20 व्या वर्षीही सडू शकते लिव्हर, 1 घाणेरड्या सवयीमुळे तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर
या निर्णयाचा परिणाम
बंदीच्या निर्णयाने काय प्रभाव पडेल
गेल्या दोन दशकांपासून, मेयोनीज शहरी भारतीय फास्ट फूड संस्कृतीचा अविभाज्य भाग बनले आहे. या बंदीमुळे अन्न व्यवसायांना अंडीविरहित किंवा पाश्चराइज्ड अंडी असणाऱ्या ठिकाणी वळावे लागेल, किमान जोखीम मूल्यांकन पूर्ण होईपर्यंत तरी हाच पर्याय उपलब्ध आहे. लक्षात ठेवा की भारतातील मेयोनीज बाजारपेठेत अंडीविरहित खाण्याचे अधिक वर्चस्व आहे.