
रेल्वेत नेहमी निळ्या रंगाच्या सीट्स का असतात? रंगामागच हे तथ्य तुम्हाला माहिती आहे का?
Travel News : ताजमहाल बघायला जाताय? तर मग आग्रातील या छुप्या ठिकाणांनाही एकप्लोर करा
आम्ही तुम्हाला सांगतो की, भारतीय रेल्वेमध्ये सीट्ससाठी वापरला जाणारा निळा रंग हा खूप विचारपूर्वक निवडण्यात आला आहे. हा रंग प्रवाशांचा डोळ्यांना आराम देतो आणि मानसिक शांततेचा अनुभव देतो. सर्वात मोठे कारण म्हणजे या रंगावर धूळ-माती लवकर दिसून येत नाही. भारतीय रेल्वे जी प्रत्येक ऋतूत प्रवाशांसाठी सज्ज असते तिच्या सीट्सचा रंग अनेक प्रकाराने महत्त्वपूर्ण ठरतो.
डोळ्यांना देतो आराम
नीळा रंग हा एक शांत, लाईट कलर आहे. साइकोलॉजिस्ट्सच्या अनुसार, हा रंग तणाव दूर करण्यास आणि मेंदूला शांत करण्यास मदत करतो. अनेकदा प्रवासी लांब पल्ल्याचा प्रवास करतात अशावेळी सीट्सचा भडक रंग त्यांच्या मनाला अस्वस्थ करु शकतो. यामुळे डोळ्यांनाही त्रास होऊ लागतो. हेच कारण आहे की रेल्वेच्या सीट्ससाठी निळ्या रंग एक उत्तम पर्याय ठरतो.
धूळ लगेच दिसून येत नाही
तुम्ही अनेकदा ही गोष्ट अनुभवली असेल की सीट्सवर धूळ असली तरी दिसताना मात्र ही धूळ दिसून येत नाही. फक्त सीट्सवर बसल्यावर काहीदा ती तुम्हाला जाणवून येऊ शकते. जर सीट्सचा रंग सफेद, क्रिम किंवा हिरवा, गुलाबी असा असता तर ही धूळ त्या रंगावर लगेच दिसून आली असती. निळा रंग धूळीला बऱ्याच प्रमाणात लपवून ठेवते ज्यामुळे सीट्स जास्त काळापर्यंत स्वच्छ दिसतात.
बदलत्या वातावरणाचा प्रभाव कमी असतो
भारतात काही जागी प्रचंड उष्णता असते तर काही ठिकाणी जास्त प्रमाणत थंडी असते. तथापि, निळा रंग जास्त काळापर्यंत आपली चमक बनवून ठेवतो. हेच कारण आहे की निळा रंग रेल्वेसाठी जास्त टिकाऊ आणि देखभालीसाठीचा एक सोपा आणि उत्तम पर्याय ठरतो.
Travel News : ताऱ्यांच जग पाहण्याची संधी, महाराष्ट्रात खुले झालेत नवे टुरिस्ट स्पॉट
मानसिकरित्या आपल्याला शांत करते
तज्ञांचे म्हणणे आहे की, निळा रंग प्रवाशांना मानसिकरित्या शांत करतो. गर्दीच्या वातावरणात आणि लांब पल्ल्याच्या प्रवासत मनाला शांततेची गरज असते. यादरम्यान निळा रंग तणाव वाढवत नाही तर ते कमी करण्यास मदत करतो. हेच कारण आहे की अनेक विमानांमध्येही निळ्या रंगाचाच वापर केला जातो. आता पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही रेल्वेने प्रवास कराल तेव्हा निळ्या सीट्समागचे कारण आणि यामागचा खोल विचार नेहमी स्मरणात ठेवा.