
मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी पोटात वेदना का होतात? वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय
मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी पोटात असह्य वेदना का होतात?
पाळीच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी काय करावे?
मासिक पाळीत दिसून येणारी वेगवेगळी लक्षणे?
मासिक पाळी येणे ही महिलांच्या शरीरातील नैसर्गिक क्रिया आहे. महिन्यातील चार ते पाच दिवस सर्वच महिलांना मासिक पाळी येते. योनीमार्गात होणाऱ्या रक्तस्त्रावामुळे आरोग्य बिघडते आणि शरीरात खूप जास्त थकवा जाणवू लागतो. काहींना पाळी आल्यानंतर शारीरिक आणि मानसिक त्रासांना सामोरे जावे लागते. पोटात दुखणे, कंबरदुखी, पाय दुखणे, अशक्तपणा आणि अस्वस्थता यांसारख्या समस्या उद्भवून सुरुवातीचे दिवस अतिशय असह्य होतात. यामुळे दैनंदिन जीवनातील कामे करताना सुद्धा त्रासांना सामोरे जावे लागते. ओटीपोटात येणाऱ्या असह्य पेटके, कंबर दुखणे आणि पायांत गोळे येणे इत्यादी समस्या वाढून दिवसभर अंथरुणात पडून राहावे लागते.(फोटो सौजन्य – istock)
Sleeping Tips: रात्री झोप येत नाही? फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स, मिळेल गाढ अन् शांत झोप
मासिक पाळी आल्यानंतर पोटात किंवा कंबरेत वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी अनेक लोक मेडिकलमधील पेनकिलरच्या गोळ्यांचे सेवन करतात. पण वारंवार पेनिकलर खाल्ल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची खूप जास्त शक्यता असते. पेनकिलरच्या गोळ्या थेट किडनीवर परिणाम करतात. त्यामुळे मासिक पाळी आल्यानंतर खूप स्त्राव किंवा वेदना होत असतील तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. आज आम्ही तुम्हाला मासिक पाळीच्या पहिल्याच दिवशी पोटात खूप जास्त वेदना का होतात? वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी कोणते उपाय करावेत? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे उपाय केल्यास मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळेल आणि शरीराला सुद्धा फायदे होतील.
मासिक पाळीच्या दरम्यान शरीरामध्ये प्रोस्टाग्लॅंडिन नावाचा घटक वाढतो. हा एक हार्मोन्स युक्त पदार्थ आहे, जो गर्भाशयाच्या आतील अस्तरामधून तयार होतो. गर्भाशय आकुंचित करून त्याचा आतील थर बाहेर काढून टाकणे, हे या हार्मोन्सचे काम आहे. गर्भाशय तीव्र आकुंचन पावल्यामुळे काही काळासाठी रक्त आणि ऑक्सिजनचा प्रवाह कमी होतो आणि पोटाच्या खालच्या भागात वेदना आणि पेटके येण्यास सुरुवात होते. या वेदना काही मर्यादित काळापुरत्या टिकून न राहता वारंवार पोटात वेदना होण्याची शक्यता असते. याशिवाय काहींना मळमळणे, जुलाब, डोकेदुखी, चक्कर येणे, थकवा आणि पोट फुगणे इत्यादी समस्या उद्भवून आरोग्य बिघडते.
दैनंदिन जीवनातील चुकीच्या सवयी शरीराला गंभीर हानी पोहचवतात. याशिवाय शरीरात वाढलेला मानसिक तणाव, पुरेशी झोप न घेणे, धूम्रपान करणे, लठ्ठपणा आणि शारीरिक हालचालींची कमतरता, एंडोमेट्रिओसिस, एडेनोमायोसिस, गर्भाशयात फायब्रॉइड्स किंवा पेल्विक इन्फेक्शनसारखे आजार इत्यादी कारणांमुळे सुद्धा मासिक पाळीच्या दिवसांमध्ये ओटीपोटात खूप जास्त वेदना होतात. प्रत्येक महिन्याला ओटीपोटात वेदना होत असतील तर दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत.
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये ओटीपोटात वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी गरम पाण्याच्या पिशवीने पोटाला शेक द्यावा. यामुळे आकुंचन पावलेले स्नायू पुन्हा एकदा नॉर्मल स्थितीत येण्यास मदत होते. रक्तभिसरण सुधारण्यासाठी नियमित चालणे, शारीरिक हालचाली आणि व्यायाम करणे फार आवश्यक आहे. दैनंदिन आहारात पालेभाज्या, फळे इत्यादींसोबतच मासिक पाळी आल्यानंतर आल्याचा चहा प्यावा. यामुळे पोट दुखीचा वेदनांपासून तात्पुरता आराम मिळतो आणि शरीराला सुद्धा फायदे होतात.
Ans: मासिक पाळीच्या वेळी गर्भाशय आकुंचन पावते. गर्भाशयातील अस्तर बाहेर टाकण्यासाठी होणाऱ्या या प्रक्रियेमुळे प्रोस्टाग्लॅंडिन्स नावाचे रसायन वाढते आणि त्यामुळे पोटात कळा, दुखणे व अस्वस्थता जाणवू शकते.
Ans: पोटावर गरम पाण्याची पिशवी ठेवणे, कोमट पाणी पिणे, हलका व्यायाम किंवा चालणे, पुरेशी विश्रांती घेणे आणि पौष्टिक आहार घेणे यामुळे वेदना कमी होण्यास मदत होऊ शकते.
Ans: हिरव्या पालेभाज्या, फळे, कडधान्ये, ड्रायफ्रूट्स आणि आयर्न व मॅग्नेशियमयुक्त पदार्थ आहारात समाविष्ट करणे फायदेशीर ठरू शकते.