
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या का जातात? वारंवार गाठी जाणे बेतू शकते जीवावर, ब्लड क्लॉट्स कमी करण्यासाठी उपाय
ब्लड क्लॉट्स कमी करण्यासाठी उपाय
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या का जातात?
मासिक पाळीत कोणता आहार घ्यावा?
मासिक पाळी आल्यानंतर सर्व महिलांना शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते.पाळीच्या दिवसांमध्ये रक्तस्त्राव होताना रक्ताच्या लहान गाठी पडणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. गर्भाशयाचे अस्तर बाहेर पडताना रक्त, उती आणि प्रथिनांपासून या गाठी तयार होतात. पण वारंवार मोठ्या आकाराच्या गाठी अतिरक्तस्त्राव, असह्य वेदना किंवा ७ दिवसांपेक्षा जास्त वेळ मासिक पाळी राहिल्यास दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. महिला कामाच्या धावपळीमध्ये शरीराकडे व्यवस्थित लक्ष देत नाहीत. वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे शरीरसंबंधित आजार मोठे आणि गंभीर होतात आणि संपूर्ण आरोग्याला हानी पोहचवतात.(फोटो सौजन्य – istock)
Monsoon Tips: पावसाळ्यात उद्भवतात मासिक पाळीच्या समस्या? काय आहेत कारणं आणि उपाय
गर्भाशयातील फायब्रॉइड्स, एंडोमेट्रिओसिस, हार्मोनल असंतुलन किंवा इतर आजारांमुळे मासिक पाळीच्या दिवसांमध्ये रक्ताच्या गाठी जाण्याची जास्त शक्यता असते. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये गर्भाशयाच्या आतील अस्तराला शरीराबाहेर टाकले जाते. पण शरीरातून जास्त रक्तस्त्राव होऊ नये म्हणून शरीर प्रो-कोग्युलेन्ट्स नावाचा घटक तयार करतो, ज्याच्या परिणामामुळे मासिक पाळीचे रक्त सुरळीतपणे बाहेर पडून जाते. आज आम्ही तुम्हाला मासिक पाळीच्या दिवसांमध्ये रक्ताच्या गाठी कशामुळे पडतात? ब्लड क्लॉट्स कमी करण्यासाठी कोणते उपाय करावेत? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे उपाय केल्यास मासिक पाळीच्या दिवसांमध्ये कोणतीही समस्या उद्भवणार नाही.
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये रक्तस्त्राव होताना गाठी पडणे अतिशय सामान्य समस्या आहे. पण वारंवार रक्तस्त्राव होताना गाठी पडत असतील तर ती समस्या लक्षणे नाहीत. गर्भाशयात होणाऱ्या फायब्रॉइड्सच्या गाठी, गर्भाशयाच्या अस्तराशी संबंधित जुनाट आजार, हार्मोन्सचे असंतुलन, थायरॉईडचे विकार, रक्तस्त्रावाचे विकार, अॅनिमिया किंवा कोणताही दुर्मिळ आजार असल्यास रक्ताच्या गाठी पडण्याची शक्यता असते. गर्भधारणेतील गुंतागुंत महिलांच्या आरोग्यासाठी धोका निर्माण करते.
अति-रक्तस्त्रावामुळे शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होऊ नये म्हणून हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये, डाळी, सुकामेवा आणि प्रथिनांचा समावेश करावा. याशिवाय शरीरातील पाण्याचे संतुलन राखण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. तसेच शरीराचे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी पोषक घटकांचे सेवन करावे. रोज हलका शारीरिक व्यायाम किंवा योगासने करावीत. शारीरिक हालचाल केल्यास खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन होते. थायरॉईड, पीसीओएस किंवा अॅनिमिया यांसाख्या गंभीर आजाराने त्रस्त असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करावेत.
Ans: होय. पाळीदरम्यान अधूनमधून लहान रक्ताच्या गुठळ्या जाणे अनेक महिलांमध्ये सामान्य असू शकते, विशेषतः रक्तस्राव जास्त असल्यास.
Ans: जास्त रक्तस्राव, हार्मोनल असंतुलन, गर्भाशयातील फायब्रॉइड्स, ॲडेनोमायोसिस, एंडोमेट्रिओसिस किंवा इतर स्त्रीरोगांमुळे मोठ्या किंवा वारंवार गुठळ्या जाऊ शकतात.
Ans: संतुलित आहार घ्या, आयर्नयुक्त पदार्थांचे सेवन करा, पुरेसे पाणी प्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे घेऊ नका. वारंवार गुठळ्या जात असल्यास योग्य तपासणी करून मूळ कारणावर उपचार करणे आवश्यक आहे.