विवाहित पुरुषांना दुसऱ्याची बायकोच का आवडते? काय आहे यामागचं मूळ कारण? जाणून घ्या
विवाहित पुरुषांना दुसऱ्यांच्या बायका का आवडतात? हा आमचा प्रश्न नाही तर गेल्या काही काळापासून गुगलवर सर्च केल्या जाणाऱ्या प्रश्नांमध्ये या प्रश्नाचाही समावेश आहे. कोणतेही नातं हे विश्वास, प्रेम आणि समजून घेण्याचा क्षमतेवर टिकून असत. जसजसा वेळा जातो तसतसा नात्यात दुरावा जाणवू लागतो. आपलं मन विचलित झालं की मग नात्याचा गोड धागा एखाद्या बंधनासारखा वाटू लागतो. बहुतेक पुरुष हे इतर महिलांकडे निरखून पाहतात आणि त्यांची प्रशंसाही करतात. अशावेळी पुरुषांना इतर महिलांमध्ये नक्की असे काय दिसते जे त्यांना इतर महिलांकडे आकर्षित करते असा प्रश्न बायकांच्या मनात येऊ लागतो. आज आपण या लेखात याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत.
काखेत वाढलेला काळेपणा दूर करण्यासाठी हळदीचा ‘या’ प्रकारे करा वापर, टॅनिंगची समस्या होईल कायमची दूर
हे खरंच स्वाभाविक आहे… पण तेवढ्यापुरतंच!
पुरुष इतर स्त्रियांकडे पाहतात, हे नवल नाही. त्यांच्या मेंदूची रचना आणि भावनांची उर्मी अशा प्रकारे काम करते की एखादी आकर्षक स्त्री दिसली, की लगेचच मेंदू सक्रिय होतो. “Men will be men” असं म्हणणं आपल्याला सहजपणे ऐकायला मिळतं, आणि त्यामागे थोडंफार तथ्य असलं तरी, याला मर्यादा असायलाच हव्यात. कारण हे असं वागणं कुणाचंही वैवाहिक आयुष्य बिघडवू शकतं. कोणत्या गोष्टी मर्यादेत आहेत आणि कुठे थांबायचं याच भान ठेवणं फार महत्त्वाचं आहे.
जेव्हा नात्यात काहीतरी कमी वाटतं…
कधी कधी माणूस आपल्या वैवाहिक आयुष्याबाबत समाधानी नसतो. हे संवादाचा अभाव, मतभिन्नता किंवा एकमेकांची गरज न समजून घेणे यामुळे घडू शकते, यामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो. अशा वेळी पुरुषांचं लक्ष इतर स्त्रियांकडे वळू लागतं. काही वेळा ते फक्त पाहूनच समाधान मिळवायचा प्रयत्न करतात. पण जर भावना हाताबाहेर गेल्या, तर नातं विस्कटायला फार वेळ लागत नाही.
नवीनतेचा मोह
काही पुरुष ‘नवं काहीतरी’ अनुभवायच्या ओढीने इतर स्त्रियांकडे आकर्षित होतात. “थोडा बदल हवा आहे” असं त्यांच्या मनात चालू असतं. हा बदल त्यांना जुनं तरुणपण आठवून देतो, जबाबदाऱ्या नसलेल्या दिवसांची झलक! पण असे हे प्रयोग नात्यावर खोलवर परिणाम करू शकतात त्यामुळे वेळीच आपली मर्यादा ओळखून यावर योग्य त्या वेळी फुलस्टॉप देणे गरजेचे आहे.
तुलना करणे: एक धोकादायक सवय
दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावणं आणि ‘आपल्याकडं असं का नाही?’ असं वाटणं, हेही एक कारण इतर महिलांकडे आकर्षित करण्यास कारणीभूत ठरत असत. पुरुष दुसऱ्यांच्या बायकांशी आपल्या पत्नीची तुलना करतात, ज्यामुळे त्यांना आपली बाजू कमकुवत वाटायला लागते. ही तुलना फक्त असंतोष वाढवते आणि प्रेम, विश्वास आणि संवादाच्या कमतरतेमुळे अशा भावना वाढवण्याचे काम करते.
गुडघेदुखीमुळे ऑपरेशनची वेळ येऊ नये, दररोज न चुकता करा हे 3 सोपे व्यायाम; सर्व वेदनांपासून मिळेल आराम
फक्त लक्ष वेधण्यासाठी
अनेकदा पुरुष हे वागणं केवळ अटेन्शन मिळवण्यासाठी करतात. एखाद्या स्त्रीचं किंवा अगदी स्वतःच्या बायकोचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न असतो. आपल्या ईर्षा निर्माण करण्यासाठी पती असे करत असतो. यातून प्रेमाला एक नवी उभारी देण्याचा प्रयत्न असतो. महिलांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, अटेन्शनची गरज जेवढी त्यांना असते तितकीच गरज त्यांच्या पार्टनरलाही असू शकते. नवविवाहित असो वा दीर्घकाळ एकत्र असलेले, प्रत्येकालाच इम्पॉर्टन्स हवा असतो आणि वेळोवेळी त्याचे दाखलेही! मात्र हे मिळवण्याच्या प्रयत्नांना आपली हद्द पार करता कामा नये. परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते त्यामुळे वेळीच स्वतःला सावरावे. शेवटी एकच गोष्ट म्हणता येईल की, स्वाभाविक भावना मान्य आहेत, पण जबाबदारीने त्यावर नियंत्रण ठेवणं हीच खरी प्रगल्भता आहे.