काखेत वाढलेला काळेपणा दूर करण्यासाठी हळदीचा 'या' प्रकारे करा वापर
सुंदर दिसण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी फेशिअल केले जाते तर कधी क्लीनअप करून त्वचा स्वच्छ केली जाते. बऱ्याचदा शरीरावर नको असलेले केस काढण्यासाठी वॅक्सिंग केले जाते. मात्र अनेकांना वॅक्सिंग करण्याची भीती वाटते. याशिवाय काखेत वाढलेले केस काढण्यासाठी महिला लेझरचा वापर करतात. यामुळे त्वचेवर डेड स्किन जमा होण्यास सुरुवात होते. डेड स्किनमुळे त्वचा अधिकच काळी आणि निस्तेज दिसू लागते. काखेत वाढलेला काळेपणा घालवण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या केमिकल युक्त क्रीम्स किंवा इतर स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करता. मात्र यामुळे काहीवेळा महिलांना स्किन इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य – iStock)
काखेत वाढलेला काळेपणा आणि डेड स्किन काढून टाकण्यासाठी कोणत्याही केमिकल युक्त प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी नैसर्गिक आणि घरगुती पदार्थांचा वापर करावा. घरगुती पदार्थांच्या वापरामुळे त्वचा अतिशय सुंदर आणि उजळदार होते. त्वचा नैसर्गिक चमक कायम टिकून ठेवण्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर करावा. आज आम्ही तुम्हाला काखेत वाढलेला काळेपणा कमी करण्यासाठी आणि वॅक्सिंगसाठी हळदीचा वापर कसा करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे काखेतील त्वचा उजळदार आणि सुंदर होईल.
मोठ्या भांड्यात बर्फाचे खडे, ब्राऊन शुगर, आंबेहळद, लिंबाचा रस घेऊन सर्व साहित्य एकत्र मिक्स करून घ्या. त्यानंतर तयार केलेले मिश्रण गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा. गरम झाल्यानंतर तयार केलेले मिश्रण घट्ट होण्यास सुरुवात होईल. तयार करून घेतलेले मिश्रण थंड झाल्यानंतर आणखीनच घट्ट होईल. या मिश्रणाचा वापर करून तुम्ही शरीरावरील वाढलेले अनावश्यक केस काढू शकता. याशिवाय डेड स्किन निघून जाण्यास मदत होईल.
तयार केलेले मिश्रण थंड करून घ्यावे. त्यानंतर थंड झालेले मिश्रण काखेतील केसांना लावून घ्या. वॅक्सिंगच्या पटीने हलक्या हाताने चोळून हेअर वॅक्सिंग पट्टी खेचून काढावी. यामुळे तुम्हाला कोणतीही दुखापत होणार नाही. याशिवाय काखेत वाढलेले केस अलगद निघून येतील. याशिवाय घरगुती पदार्थांचा वापर करून वॅक्सिंग केल्यास कोणतीही दुखापत होणार नाही.