(फोटो सौजन्य: istock)
जसजसे आपले वय वाढू लागते, आरोग्याच्या समस्याही वेगाने वाढू लागतात. वय वाढतच आपली हाडे ठिसूळ होतात, शरीरात कॅल्शियमची कमी निर्माण होते आणि यामुळेच गुडघेदुखीची तक्रार सतावू लागते. बहुतेक महिलांना वयाची चाळीशी लोटली की समस्या जाणवू लागते. गुडघेदुखीची सर्वात सामान्य कारणे म्हणजे वृद्धत्व, दुखापत किंवा गुडघ्यावर वारंवार येणारा ताण. याशिवाय, पेरीमेनोपॉज आणि स्नायूंच्या नुकसानीमुळे देखील ही समस्या उद्भवू शकते. तज्ज्ञांच्या मते, पुरुष आणि महिलांच्या शरीराची रचना वेगळी असते, ज्यामुळे महिलांमध्ये गुडघेदुखीचा धोका वाढतो. खरं तर, महिलांचे कंबर रुंद असतात आणि ते थोडेसे गुडघे टेकलेले असतात आणि या संरेखनामुळे सांध्यांवर अतिरिक्त ताण निर्माण होऊ शकतो.
पोटावर वाढलेली चरबी झपाट्याने कमी करेल ‘हे’ बारीक दाण्यांचे जादुई पाणी, उपाशी पोटी नियमित करा सेवन
सततच्या वेदनांमुळे महिलांना त्यांची दैनंदिन कामे करण्यास अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आणि कोणतेही काम करणे कठीण बनते. भविष्यात, या वेदना अधिक वाढल्या की मग सर्जरीचा धोका देखील वाढू शकतो. अशात आज आम्ही तुमच्यासाठी काही सोप्या एक्सरसाइज घेऊन आलो आहोत ज्यांचा आपल्या जीवनशैलीत समावेश करताच तुम्ही गुढघेदुखीच्या समस्येपासून आराम मिळवू शकता.नियमित हे व्यायाम केल्यास तुम्ही तुमचे हाडे मजबूत आणि बळकट बनवू शकता.
जर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास होत असेल आणि ही वेदना दररोज होत असेल तर तुम्हाला आजच यावर काही उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. फिटनेस प्रशिक्षक नवनीत रामप्रसाद यांनी तीन व्यायाम सुचवले आहेत जे महिलांना गुडघेदुखीपासून आराम मिळविण्यास आणि सांध्यांची स्थिरता वाढविण्यास मदत करू शकतात. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
सीट टू स्टँड (Sit-to-Stand)
नावावरून स्पष्ट आहे की, त्यात उभे राहणे आणि नंतर बसणे समाविष्ट आहे. विशेष म्हणजे त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या उपकरणांची आवश्यकता नाही. फक्त एक खुर्ची घ्यावी लागेल. हे करण्यासाठी, खुर्चीवरून उभे रहा, नंतर नियंत्रणात बसा. प्रत्येक मीलनंतर तुम्हाला 10reps करायच्या आहेत. हे मांड्या बळकटी करण्यास मदत करते आणि गुडघ्यांसाठी उत्कृष्ट सपोर्ट सिस्टिम आहे.
वॉल स्क्वॅाट्स (Wall Squats)
हा व्यायाम दिवसातून ३ वेळा करावा लागतो. यामध्ये भिंतीचा आधार घेऊन बसावे लागते. भिंतीला पाठ टेकवून बसण्याच्या पोज घ्या. लक्षात ठेवा यावेळी तुमचे गुडघे ९०° वर असले पाहिजेत. ३० सेकंद याच पोजमध्ये उभे रहा आणि श्वास घ्या. यामुळे सांध्याला स्थिरता मिळते आणि पायऱ्या चढताना किंवा चालताना होणारा त्रास कमी होतो.
View this post on Instagram
A post shared by Navneeth Ramprasad | Fitness for All Ages (@getfitwithnav)
Liver ला हळूहळू सडवतात ‘हे’ 3 पदार्थ, आजच आहारातून करा बेदखल नाहीतर भोगावे लागतील गंभीर परिणाम
सीटेड बँड लेग एक्सटेंशन एक्सरसाइज (Seated Band Leg Extensions)
हा व्यायाम करण्यासाठी, रेझिस्टन्स बँड किंवा टॉवेल वापरा. खुर्चीवर बसा, पाय पसरवा, वरच्या बाजूला धरा. हे क्वाड्रिसेप्स (गुडघ्याचे रक्षण करणारा स्नायू) पुन्हा तयार करण्यास मदत करते. तुम्हाला दोन्ही पायांवर 12reps करायच्या आहेत.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.