Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळी झोपेतून उठल्यानंतर पाठीमध्ये गंभीर वेदना का जाणवतात? वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

सकाळी उठल्यानंतर पाठीच्या कण्यामध्ये वेदना जाणवत असतील तर दुर्लक्ष न करता वेळीच जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. अन्यथा शरीराला गंभीर हानी पोहचू शकते. चला तर जाणून घेऊया सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 18, 2026 | 08:45 AM
सकाळी झोपेतून उठल्यानंतर पाठीमध्ये गंभीर वेदना का जाणवतात? वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय

सकाळी झोपेतून उठल्यानंतर पाठीमध्ये गंभीर वेदना का जाणवतात? वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय

Follow Us
Close
Follow Us:

सकाळी उठल्यानंतर पाठीत वेदना का होतात?
वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी उपाय?
पाठ दुखीपासून आराम मिळवण्यासाठी जीवनशैलीत कोणते बदल करावे?

चुकीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, मानसिक ताण, तासनतास एका जागेवर बसून काम, पोषक घटकांचा अभाव, बैठी जीवनशैली, मोबाईल लॅपटॉपच्या अतिवापरामुळे शरीरसंबंधित गंभीर समस्या उद्भवतात. एका जागेवर जास्त वेळ बसून राहिल्यामुळे पाठीच्या कण्याला दुखापत होण्याची जास्त शक्यता असते. यामुळे पाठीमध्ये वेदना, पाठीच्या कण्याला गॅप, पाठीचे स्नायू आखडणे, रक्ताभिसरणात अडथळे इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागतात. तसेच सकाळी झोपेतून उठल्यानंतर पाठीमध्ये खूप जास्त तीव्र वेदना होतात. चुकीची गादी, चुकीची झोपण्याची पद्धत, व्यायामाचा अभाव किंवा शरीरातील आवश्यक विटामिनच्या कमतरतेमुळे पाठ खूप जास्त प्रमाणात दुखते. वय वाढल्यानंतर हाडांची झीज झाल्यामुळे पाठीत किंवा शरीराच्या इतर अवयवांमध्ये वेदना होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे हाडांसंबंधित वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)

Heart Failure: उभं राहिल्यानंतर पायांमध्ये कायमच वेदना होतात? ‘ही’ लक्षणे वेळीच ओळखल्यास टळेल मोठा अनर्थ

झोपेतून सकाळी उठल्यानंतर पाठ आखडल्यासारखी वाटणे, पाठीमध्ये वेदना होणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. चुकीच्या पोझिशनमध्ये झोपल्यामुळे किंवा दैनंदिन जीवनातील चुकांमुळे पाठीमध्ये वेदना होतात. मणक्याच्या हाडासंबधित वेदना जाणवू लागल्यानंतर दुर्लक्ष न करता वेळीच योग्य ते उपचार करणे आवश्यक आहे. पाठीच्या वेदना बेडवरील मॅट्रेस किंवा गादीवर अवलंबून असतात. चुकीच्या पद्धतीने झोपल्यामुळे पाठीत वेदना होतात. तसेच रात्रभर एकाच स्थिती झोपल्यामुळे पाठीच्या कण्यावर आणि स्नायूंवर जास्तीचा तणाव येतो. सकाळी उठल्यानंतर या वेदना खूप जास्त प्रमाणात जाणवू लागतात.

डॉक्टरांच्या मते, पाठीच्या वेदना सकाळच्या वेळी खूप जास्त प्रमाणात जाणवतात. यामागील कारण म्हणजे रात्रभर शरीराची हालचाल न झाल्यामुळे पाठीच्या कण्यातील चकत्यांमधील द्रवपदार्थ कमी होऊन जातो. ज्यामुळे पाठीचा कणा ताठ होतो आणि स्नायू स्टिफ होऊन जातात. पाठीच्या वेदना केवळ थकवा, अशक्तपणामुळे नाहीतर जीवनशैलीतील बदलांमुळे सुद्धा वाढतात. पोटावर जास्त वेळ झोपल्यामुळे पाठीच्या खालच्या भागावर जास्तीचा ताण येतो आणि स्नायूंना योग्य आधार न मिळाल्यामुळे वेदना वाढतात.

नखांवर पांढरे डाग कशामुळे येतात? विटामिनची कमतरता नसून आरोग्यासंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका

रक्तभिसरणात अडथळे:

तासनतास एका जागेवर बसून राहिल्यामुळे पाठीच्या स्नायूंमधील रक्तभिसरणात अडथळे निर्माण होतात. रक्तभिसरणात निर्माण झालेले अडथळे संपूर्ण शरीरासाठी धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने झोपणे, तासनतास एका जागेवर बसून राहणे टाळावे. तसेच सकाळी उठल्यानंतर पाठीमध्ये खूप जास्त वेदना जाणवत असल्यास उठण्याआधी अंथरुणावरच हातापायांची हलकी स्ट्रेचिंग किंवा शारीरिक हालचाल करावी. यामुळे पाठीच्या वेदनांपासून आराम मिळेल आणि रक्तभिसरणात अडथळे निर्माण होणार नाहीत.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पाठदुखीची प्रमुख कारणे काय आहेत?

    Ans: चुकीच्या पद्धतीने बसणे किंवा उभे राहणे, डिस्क सरकणे, व्यायामाचा अभाव किंवा जास्त वजन.

  • Que: पाठदुखी कमी करण्यासाठी काय करावे?

    Ans: वेदना असल्यास काही दिवस जड कामातून विश्रांती घ्या, नियमित पाठीचे व्यायाम, चालणे, किंवा योग करा.

  • Que: पाठदुखीमध्ये काय टाळावे?

    Ans: जास्त वेळ एकाच स्थितीत बसणे, एका दमात खूप जड वस्तू उचलणे.

Web Title: Why do you feel severe back pain after waking up in the morning follow these simple remedies to get relief from pain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 08:45 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • health issue
  • lifestlye tips

संबंधित बातम्या

World Thalassemia Day : थॅलेसेमिया हा आजार काय असतो? उपचार कसे केले जातात? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला
1

World Thalassemia Day : थॅलेसेमिया हा आजार काय असतो? उपचार कसे केले जातात? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला

वर्षाच्या बाराही महिने सर्दी होऊन नाकातून पाणी येते? मग आजच आहारातून काढून टाका ‘हे’ पदार्थ, सर्दी वाढण्यास ठरतात कारणीभूत
2

वर्षाच्या बाराही महिने सर्दी होऊन नाकातून पाणी येते? मग आजच आहारातून काढून टाका ‘हे’ पदार्थ, सर्दी वाढण्यास ठरतात कारणीभूत

५० वर्षांखालील महिलांमध्ये ओव्हेरियन कॅन्सर ओळखणे का आहे कठीण? जाणून घ्या गंभीर आजाराचे निदान उशिरा होण्याची कारणे
3

५० वर्षांखालील महिलांमध्ये ओव्हेरियन कॅन्सर ओळखणे का आहे कठीण? जाणून घ्या गंभीर आजाराचे निदान उशिरा होण्याची कारणे

कलिंगड कापल्यानंतर किती दिवस फ्रेश आणि ताजेतवटवीत राहते? जाणून घ्या कलिंगड खाण्याची योग्य वेळ
4

कलिंगड कापल्यानंतर किती दिवस फ्रेश आणि ताजेतवटवीत राहते? जाणून घ्या कलिंगड खाण्याची योग्य वेळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.