Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये का वाढतो पायांच्या गँगरीनचा धोका? जाणून घ्या लक्षणे आणि पाय स्वच्छ ठेवण्यासाठी उपाय

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पायांचा गँगरीन झाल्यानंतर त्वचेचे नुकसान होते. याशिवाय अधिक काळ दुर्लक्ष केल्यास पाय काप कापावा लागतो. जाणून घ्या गॅंगरीनची लक्षणे आणि गँगरीन होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 25, 2025 | 05:30 AM
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये का वाढतो पायांच्या गँगरीनचा धोका?

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये का वाढतो पायांच्या गँगरीनचा धोका?

Follow Us
Close
Follow Us:

संपूर्ण देशभरात मुसळधार पाऊस पडत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. या दिवसांमध्ये त्वचेवर इन्फेक्शन होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे त्वचेसह संपूर्ण आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. पावसाळ्यात चिखल, खराब पाणी आणि इतर अनेक कारणामुळे पायांचा संसर्ग होण्याची जास्त शक्यता असते. त्यात अनेकांमध्ये दिसून येणारी समस्या म्हणजे गँगरीन. गँगरीन इन्फेक्शन झाल्यानंतर पायांचे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते आणि आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. गँगरीन झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये योग्य वेळी लक्ष न दिल्यास समस्या आणखीनच गंभीर होत जाते. याशिवाय पाय कापून टाकण्यास लागू शकतो.(फोटो सौजन्य – istock)

सडलेले लिव्हर- किडनी पुन्हा एकदा होईल बरी! ‘या’ ५ रुपयांच्या आयुर्वेदिक पदार्थांच्या सेवनामुळे शरीर होईल स्वच्छ

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साथीच्या आजारांसोबतच त्वचा आणि पायांमध्ये इन्फेक्शन वाढण्याची जास्त शक्यता असते. पावसाळा ऋतू संसर्ग वाढवण्यासाठी अनुकूल ठरतो. त्यामुळे पावसाळ्यात हातापायांना कोणतीही जखम होणार नाही याची जास्त काळजी घ्यावी. मधुमेह, रक्ताभिसरण, पायाला जखमा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये लवकर भरत नाहीत. गँगरीन हा अतिशय धोकादायक आणि जीवघेणा आजार आहे. ज्यामुळे रक्तवाहिन्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. हा संसर्ग झाल्यानंतर योग्य वेळी लक्ष न दिल्यास पाय कापावा लागतो, अन्यथा गँगरीन संपूर्ण शरीरात पसरण्याची जास्त भीती असते.

पायाचे गँगरीन म्हणजे काय?

पायाचा गॅंगरीन होण्यामागे अनेक कारण आहेत. त्यातील प्रमुख कारण म्हणजे रक्तप्रवाहाच्या कमतरतेमुळे किंवा गंभीर जिवाणू संसर्गामुळे शरीरातील निरोगी पेशी मृत पावतात. ज्याचा परिणाम बोटांवर आणि संपूर्ण पायांवर होण्याची जास्त शक्यता असते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सतत जाणवणारा ओलसरपणा आणि घाणेरड्या पाण्यामुळे त्वचेचे नुकसान होते आणि संसर्गाचा धोका वाढू लागतो.

गँगरीन होण्यामागील कारणे:

  • रक्तभिसरण प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होणे
  • जखमा किंवा अल्सर
  • बुरशीजन्य किंवा जिवाणू संसर्ग
  • ओल्या चपला
  • कमकुवत रोगप्रतिकारशक्ती

गँगरीन झाल्यानंतर शरीरात दिसणारी लक्षणे:

  • पायाच्या बोटांमध्ये सुन्नपणा जाणवणे
  • तीव्र वेदना
  • त्वचा काळीनिळी होणे
  • दुर्गंधीयुक्त स्त्राव किंवा पायांमधून पू येणे
  • ताप
  • पायांवर वाढलेली सूज

पायांचे गँगरीन टाळण्यासाठी सोप्या टिप्स:

पायांचा गँगरीन होऊ नये पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ओल्या चप्पल किंवा मोजे परिधान करू नयेत. यामुळे पायांवर इन्फेक्शन वाढण्याची जास्त शक्यता असते. पायांवर फोड, जखम किंवा रंग बदलेला वाटू लागल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावे. घरातील लादीवर अनवाणी पायानी चालू नये. नेहमीच पाय कोरडे आणि स्वच्छ ठेवा.

कंबर आणि पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी स्वयंपाकघरातील ‘हे’ दोन पदार्थ ठरतील गुणकारी

FAQs (संबंधित प्रश्न)

गॅंगरीन टाळण्यासाठी काय करावे?

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवा. जखमा वेळेवर स्वच्छ करा आणि त्यावर योग्य उपचार करा.धूम्रपान रक्तवाहिन्यांचे नुकसान करते.नियमित व्यायामाने रक्तप्रवाह सुधारतो.

गँगरीन म्हणजे काय?

गँगरीन ही एक गंभीर वैद्यकीय स्थिती आहे ज्यामध्ये शरीराच्या एका भागाला रक्तपुरवठा पुरेसा होत नाही, ज्यामुळे ऊती मरतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Why does the risk of foot gangrene increase during the monsoon know the symptoms and hygiene tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • diabetes
  • Health Care Tips
  • monsoon care

संबंधित बातम्या

शरीरात निर्माण झालेल्या लोहाच्या कमतरतेमुळे श्वास घेण्यास त्रास होतो? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश
1

शरीरात निर्माण झालेल्या लोहाच्या कमतरतेमुळे श्वास घेण्यास त्रास होतो? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

झोपेतून उठल्यानंतर कायमच चक्कर येते? मग आरोग्यासंबंधित ‘या’ गंभीर आजाराची असू शकतात लक्षणे, चुकूनही करू नका दुर्लक्ष
2

झोपेतून उठल्यानंतर कायमच चक्कर येते? मग आरोग्यासंबंधित ‘या’ गंभीर आजाराची असू शकतात लक्षणे, चुकूनही करू नका दुर्लक्ष

मधुमेह झाल्यानंतर केवळ 3–5 वर्षांत तरुणांमध्ये वाढतोय डायबीटिक रेटिनोपथीचा धोका, नेत्रतज्ज्ञांनी दिला धक्कादायक इशारा
3

मधुमेह झाल्यानंतर केवळ 3–5 वर्षांत तरुणांमध्ये वाढतोय डायबीटिक रेटिनोपथीचा धोका, नेत्रतज्ज्ञांनी दिला धक्कादायक इशारा

भारतातील ४ पैकी एका व्‍यक्‍तीला अनुवांशिक घटकांच्या जोखीमेमुळे कार्डिओव्‍हॅस्‍कुलर डिसीज होण्‍याचा धोका, जाणून घ्या सविस्तर
4

भारतातील ४ पैकी एका व्‍यक्‍तीला अनुवांशिक घटकांच्या जोखीमेमुळे कार्डिओव्‍हॅस्‍कुलर डिसीज होण्‍याचा धोका, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.