कंबर आणि पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी स्वयंपाकघरातील ‘हे’ दोन पदार्थ ठरतील गुणकारी
पोटाचा वाढलेला घेर, शरीरावर वाढलेली अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी महिलांसह पुरुष सुद्धा सतत काहींना काही उपाय करत असतात. वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जाते. कधी महागडा डाएट फॉलो केला जातो तर कधी वेगवेगळ्या सप्लिमेंट्सचे सेवन केले जाते. पण वारंवार सप्लिमेंट्सचे सेवन केल्यास किडनीच्या आरोग्यावर परिणाम होण्याची जास्त शक्यता असते. पोटावर वाढलेली चरबी वितळवण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. पण काही केल्या पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होत नाही. धावपळीची जीवनशैली, आहारात होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन, पाण्याची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींमुळे वाढलेले वजन कमी होण्याऐवजी आणखीनच वाढत जाते. वाढलेल्या वजनामुळे मनासारखे कपडे परिधान करण्यास मिळत नाही.(फोटो सौजन्य – istock)
आंबट गोड चवीचे लिंबू पाणी आरोग्यासाठी ठरेल विषारी, शरीरात ‘ही’ लक्षणे दिसताच चुकूनही करू नका सेवन
पोटावर साचून राहिलेली अनावश्यक चरबी आरोग्यासंबंधित गंभीर आजारांचे कारण बनते. यामुळे कोलेस्ट्रॉल वाढणे, मधुमेह किंवा आरोग्यासंबंधित इतर आजारांची लागण होण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी स्वयंपाक घरातील कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे प्रभावी पेय शरीराचे मेटाबॉलिझम सुधारण्यास मदत करेल. याशिवाय पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल, शरीर डिटॉक्स होण्यास मदत होईल.
शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी मसाल्यांच्या डब्यांतील पदार्थांचा वापर करावा. बडीशेप आणि ओवा आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. हेल्दी ड्रिंक तयार करताना सर्वप्रथम, टोपात पाणी घेऊन त्यात बडीशेप आणि ओवा टाकून व्यवस्थित उकळवून घ्या. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून तयार केलेले पाणी थंड करा. गाळून झाल्यानंतर त्यात मध मिक्स करा आणि सेवन करा. हे पेय सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी प्यायल्यास पोटात साचून राहिलेली घाण बाहेर पडून आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल. औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेले ओवा आणि बडीशेपचे पाणी आरोग्यासाठी गुणकारी ठरते.
वजन कमी करण्यासाठी काय खावे?
वजन कमी करण्यासाठी संतुलित आहार घ्या. आहारात फळे, भाज्या, संपूर्ण धान्य (ब्राऊन राईस, ओट्स), पातळ प्रथिने (चिकन, मासे, डाळी), आणि निरोगी चरबी (नट्स, बिया) यांचा समावेश करा.
वजन कमी करण्यासाठी किती व्यायाम करावा?
दररोज 30 मिनिटे मध्यम-तीव्रतेचा व्यायाम (उदा. जलद चालणे, सायकल चालवणे) किंवा 15 मिनिटे जोरदार व्यायाम (उदा. धावणे, पोहणे) करणे फायदेशीर आहे. आठवड्यातून 2-3 वेळा स्ट्रेंथ ट्रेनिंग व्यायाम करणे देखील महत्वाचे आहे.
वजन कमी करण्यासाठी पाणी पिणे का महत्वाचे आहे?
पाणी प्यायल्याने चयापचय क्रिया सुधारते, ज्यामुळे कॅलरीज बर्न होतात. तसेच, पाणी प्यायल्याने भूक कमी लागते आणि जास्त खाणे टाळता येते.