या' ५ रुपयांच्या आयुर्वेदिक पदार्थांच्या सेवनामुळे शरीर होईल स्वच्छ
शरीरात सगळ्यात महत्वाचे अवयव म्हणजे किडनी आणि लिव्हर. शरीरात साचून राहिलेले विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी आणि शरीर स्वच्छ करण्यासाठी लिव्हर निरोगी असणे आवश्यक आहे. तर रक्त शुद्ध करण्यासाठी किडनीचे आरोग्य कायमचे निरोगी असणे आवश्यक असते. पण बऱ्याचदा आहारातील बदलांमुळे किंवा आरोग्यासंबंधित इतर अनेक गंभीर समस्यांमुळे लिव्हर आणि किडनी आतून सडून जाते. दारूचे सेवन न करता सुद्धा फॅटी लिव्हरची समस्या उद्भवू लागते. हल्ली किडनी आणि लिव्हरच्या आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. लिव्हरमध्ये अनावश्यक चरबी वाढल्यामुळे लिव्हर खराब होण्यासोबतच किडनीसुद्धा कमजोर होण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सडलेले लिव्हर आणि किडनी स्वच्छ करण्यासाठी आयुर्वेदातील काही गुणकारी उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यास शरीर स्वच्छ होईल.(फोटो सौजन्य – istock)
कंबर आणि पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी स्वयंपाकघरातील ‘हे’ दोन पदार्थ ठरतील गुणकारी
शरीरात वाढणारा कफ दोष लिव्हर आणि किडनीच्या आजारांसाठी कारणीभूत ठरतात. शरीरात वाढलेल्या कफामुळे किडनीचे आजार होण्याची जास्त शक्यता असते. शरीरात कफ साचून राहिल्यानंतर तो बऱ्याचदा शरीराच्या बाहेर पडून जात नाही. अशावेळी तो कफ बाहेर पडून जाणे आवश्यक आहे, अन्यथा शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. घरगुती उपाय केल्यामुळे शरीराच्या कोणत्याही भागात साचून राहिलेला कफ बाहेर पडून जाईल आणि शरीर आतून स्वच्छ होण्यास मदत होईल.
शरीरसंबंधित कोणतीही समस्या उद्भवल्यानंतर डॉक्टरांच्या गोळ्या औषधांसोबतच आयुर्वेदिक आणि घरगुती उपाय करावे. यासाठी तुळशीची पाने आणि काळीमिरीचा वापर करावा. मोठ्या खलबत्यामध्ये तुळशीची पाने आणि काळीमिरी बारीक वाटून घ्या. वाटून झाल्यानंतर सुती कपड्यात तयार केलेले मिश्रण टाकून गाळून घ्या. काढून घेतलेला रस कोमट पाण्यात मिक्स करून प्यायल्यास शरीरात साचलेले विषारी घटक बाहेर पडून जातील आणि शरीर स्वच्छ होईल.
कायम निरोगी आणि हेल्दी राहण्यासाठी जास्त तेलकट, मसालेदार अन्न, व्यसन, आणि रात्रीचे अधिक वेळ जागणे टाळावे. यामुळे डोळ्यांखाली काळे डाग येणे, अपचनाची समस्या किंवा शरीरसंबंधित गंभीर आजार होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे कायमच ७ ते ८ तासांची निरोगी झोप घेणे आवश्यक आहे. दीर्घकाळ जीवन जगण्यासाठी मन आनंदी असणे अतिशय महत्वाचे आहे. यासाठी ३० मिनिटे चालणे, योगासने करणे आवश्यक आहे.
पावसाळ्यातील हवामानाचा तुमच्या मणक्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम; जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
फॅटी लिव्हर म्हणजे काय?
फॅटी लिव्हर म्हणजे यकृतामध्ये चरबी जमा होणे. निरोगी यकृतामध्ये चरबीचे प्रमाण कमी असते, परंतु काही कारणांमुळे यकृतामध्ये चरबी वाढू शकते, ज्यामुळे फॅटी लिव्हर होतो.
फॅटी लिव्हरची लक्षणे काय आहेत?
फॅटी लिव्हरची लक्षणे सुरुवातीच्या अवस्थेत दिसत नाहीत. काही लोकांना थकवा, ओटीपोटात दुखणे किंवा अस्वस्थता जाणवू शकते. ओटीपोटाच्या वरच्या उजव्या बाजूला दुखणे किंवा अस्वस्थता जाणवू शकते.
फॅटी लिव्हर टाळण्यासाठी काय करावे?
फळे, भाज्या, आणि संपूर्ण धान्ये आहारात असावी. जास्त वजन किंवा लठ्ठपणा असल्यास, वजन कमी करण्याचा प्रयत्न करा. दररोज कमीत कमी 30 मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे.