सतत खोकला येऊन श्वास घेण्यास त्रास होतो? हंता व्हायरसने वाढलेले संपूर्ण जगाचे टेन्शन,'ही' लक्षणे दिसताच वेळीच व्हा सावध
हंता व्हायरस म्हणजे काय?
हंता व्हायरसची लक्षणे?
हंता व्हायरसवर उपचार पद्धती?
काही वर्षांपूर्वी संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा हंता व्हायरसने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. जागतिक आरोग्य संघटने दिलेल्या माहितीनुसार, या गंभीर विषाणूमुळे आत्तापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. हंता विषाणूची लागण झाल्यानंतर शरीरात वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. ताप, पोटाच्या गंभीर समस्या, न्यूमोनिया आणि ‘एक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम’ इत्यादी लक्षणे दिसू लागतात. तर काही रुग्णांना आयसोलेशनवर ठेवून उपचार केले जात आहेत. शरीराला गंभीर विषाणूची लागण झाल्यानंतर संपूर्ण आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. तसेच हे विषाणू थेट शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम करतात. यामुळे संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. चला तर जाणून घेऊया हंता व्हायरस म्हणजे काय? हंता व्हायरस झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे? जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य – istock)
हंता व्हायरसची लागण प्रामुख्याने उंदीर, खार इत्यादी कुरतडणाऱ्या प्राण्यांची विष्ठा, लघवी किंवा लाळेच्या संपर्कात आल्यामुळे मानवांमध्ये पसरण्याची शक्यता असते. हा विषाणू एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे जातो. हा अतिशय दुर्मिळ आजार आहे. १९९६ मध्ये ‘अँडीज व्हायरस’ एका माणसांकडून दुसऱ्या माणसांकडे पसरण्याची शक्यता असते.
हंता व्हायरसवर कोणतेही ठोस उपचार नाहीत. रुग्णाला ‘सपोर्टिव्ह केअर’ दिली जातात, ज्यामुळे शरीरात वाढलेली लक्षणे काही अंश कमी होतात. रुग्णाला आराम मिळवून देण्यासाठी शरीर हायड्रेट ठेवणे फार आवश्यक आहे. याशिवाय संतुलित आहार आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन केल्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. रुग्णांच्या फुफ्फुसांना त्रास होत असल्यास इंट्यूबेशन किंवा ब्रीदिंग सपोर्ट दिली जातो. यामुळे श्वासांच्या समस्या अजिबात उद्भवत नाहीत. रुग्णांच्या किडनीवर परिणाम झाल्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी डायलिसिस पर्याय दिला जातो. डायलिसिस केल्यामुळे रक्तातील घाण बाहेर पडून जाते.
Ans: हंता व्हायरस हा उंदरांमुळे पसरणारा धोकादायक विषाणूजन्य संसर्ग आहे. संक्रमित उंदरांच्या लघवी, विष्ठा किंवा लाळेमुळे हा व्हायरस पसरू शकतो.
Ans: ताप, अंगदुखी, थकवा, सतत खोकला, डोकेदुखी आणि श्वास घेण्यास त्रास ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात.
Ans: हंता व्हायरस फुफ्फुसांवर परिणाम करू शकतो. त्यामुळे फुफ्फुसांमध्ये सूज येऊन श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो.






