न रेजर, ना वॅक्स, पूर्वीच्या काळी महिला शरीरावरील केस कशा काढायच्या? जाणून घ्या रंजक पद्धती
‘अगं सलॉनमध्ये वॅक्स करायला जायला वेळच मिळाला नाही किंवा घरीच आता अंडरआर्म्स करते’ असं कधी ना कधी तुम्ही किंवा तुमच्या मैत्रिणीने म्हटलंच असेल. महिला दर महिन्याला शरीरावरील नको असलेले केस काढण्यासाठी रेझर, वॅक्स, ट्रिमर आणि हेअर रिमूव्हल क्रीम्स यांसारख्या असंख्य आंधुनिक पद्धतींचा वापर करतात. काही जणी सलॉनमध्ये जाऊन प्रॉपर वॅक्स करून घेतात तर काही जण घरीच उपाय करतात. सलूनमध्ये जाणे ही एक सामान्य गोष्ट झाली असली तरी, या आधुनिक प्रगतीपूर्वी स्त्रिया त्यांच्या शरीरावरील केस काढत असतील याचा तुम्ही कधी विचार केलाय का? हेच आज आम्ही आमच्या व्हिडिओतून तुम्हाला सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – pinterest)
सर्वप्रथम, शरीरावर इतके केस का असतात? असाही प्रश्न पडतो तर हे सांगणे महत्त्वाचे आहे की महिलांच्या शरीरावरील केस पूर्णपणे नैसर्गिक आहेत आणि त्यात मूलतः काहीही आरोग्यासाठी हानिकारक नाही. बहुतेक प्रौढांच्या शरीरावर अंदाजे ५० लाख केस असतात. शरीराच्या जवळजवळ प्रत्येक भागावर असलेले केस, त्वचेच्या संवेदनाक्षम क्षमतांमध्ये आणि घामाद्वारे तापमान नियंत्रित करण्यात भूमिका बजावतात.
मध्ययुगापासून ते २० व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत, स्त्रियांचे कपडे अत्यंत उघडे-ढाकळे होते, त्यामुळे शेव्हिंग करणे ही एक सामान्य प्रथा नव्हती. तथापि, १९३० च्या दशकात कपड्यांची लांबी थोडी कमी झाली असली तरी, स्त्रियांची फॅशन अधिकाधिक मॉडर्न होऊ लागली, ज्यामुळे शेव्हिंगचा उदय झाला. दुसऱ्या महायुद्धादरम्यान नायलॉनच्या कमतरतेमुळे, स्त्रियांनी त्यांच्या पायांवरील केस काढायला सुरुवात केली. स्त्रियांमध्ये शेव्हिंग अधिक सामान्य झाल्यानंतर काही कंपन्यांच्या हे लक्षात आले आणि त्यानंतर लहान गुलाबी रेझरचा जन्म झाला.
View this post on Instagram
पूर्वीच्या काळी केस काढण्यासाठी, मधमाशांचे मेण, साखरेची पेस्ट आणि शिंपल्यांपासून बनवलेल्या चिमट्या वापरल्या जात असत. रोमन साम्राज्य आणि ग्रीसमधील महिला या दगड आणि एका विशेष क्रिमचा देखील वापर करत असत. तथापि, ही प्रथा श्रीमंत आणि उच्च-वर्गीय महिलांकडून पाळली जात असे असंही सांगण्यात येतं.
चिकन-मटण खाऊन पोट डबडबीत झाले आहे? आतड्यांमध्ये चिकलेली घाण स्वच्छ करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
आज बाजारात केस काढण्याच्या क्रीमची मागणी वाढली आहे. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की त्याचा शोध सर्वप्रथम कधी लागला? पहिल्या केस काढण्याच्या क्रीमचा शोध १८४४ मध्ये लागला. त्याला ‘पाउद्र सबटायटल’ (Poudre Subtitle) म्हटले जात असे. तेव्हापासून महिला अशा क्रीमचा वापर करत आहेत. त्यानंतर लगेचच, १८८० मध्ये पुरुषांसाठी पहिल्या आधुनिक रेझरचा शोध लागला. त्या वेळी पुरुष दाढी करण्यासाठी ब्लेड वापरत असत. महिलांसाठीचे रेझर बाजारात येण्यासाठी आणखी तीन दशके लागली असली तरी, महिला अनेकदा शरीरावरील केस काढण्यासाठी पुरुषांचेच रेझर वापरत असत असाही उल्लेख रिसर्चमध्ये करण्यात येतो.न रेजर, ना वॅक्स, पूर्वीच्या काळी महिला शरीरावरील केस कशा काढायच्या? जाणून घ्या रंजक पद्धती.
Ans: रेजर आणि आधुनिक वॅक्सिंग उपलब्ध नसताना विविध संस्कृतींमध्ये धागा, चिमटीसारखी साधने, नैसर्गिक मिश्रणे आणि इतर पारंपरिक पद्धतींचा वापर केला जात असे.
Ans: काही संस्कृतींमध्ये साखर, मध किंवा इतर चिकट पदार्थांपासून तयार केलेली मिश्रणे केस काढण्यासाठी वापरली जात असल्याचे ऐतिहासिक संदर्भ आढळतात.
Ans: सौंदर्य, स्वच्छता, सामाजिक प्रथा आणि धार्मिक किंवा सांस्कृतिक परंपरा यांसारखी विविध कारणे वेगवेगळ्या समाजांमध्ये होती.

