Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Women Health News : महिलांच्या हार्मोनल विकाराला नवे नाव; PCOS आता PMOS म्हणून ओळखला जाणार

Women Health News : महिलांमध्ये आढळणाऱ्या PCOS या विकाराचे नाव बदलून आता PMOS करण्यात आले आहे. १४ वर्षांच्या जागतिक संशोधनानंतर हा बदल करण्यात आला असून द लॅन्सेट मध्ये याची अधिकृत नोंद झाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 13, 2026 | 03:18 PM
PCOS Renamed as PMOS, New Identity for Hormonal Disorder

PCOS Renamed as PMOS, New Identity for Hormonal Disorder

Follow Us
Follow Us:
  • महिलांच्या हार्मोनल विकाराला नवे नाव
  • PCOS आता PMOS म्हणून ओळखला जाणार
  • वैद्यकीय क्षेत्रात नवा बदल
Women Health News in Marathi : सुनयना सोनवणे : महिलांमध्ये आढळणाऱ्या ‘पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम’ (पीसीओएस) या विकाराचे नाव बदलून आता ‘पॉलीएंडोक्राइन मेटाबॉलिक ओव्हेरियन सिंड्रोम’ (पीएमओएस) असे करण्यात आले आहे. गेली १४ वर्षे सुरू असलेल्या जागतिक स्तरावरील संशोधन, वैद्यकीय तज्ञ, रुग्ण गट आणि महिलांच्या सहभागातून हा बदल करण्यात आला असून त्याची नोंद वैद्यकीय नियतकालिक ‘द लॅन्सेट’मध्ये करण्यात आली आहे.

Hantavirus outbreak 2026 : हंताव्हायरसचा महाभयंकर विळखा! रुग्णांची संख्या 11 वर ; WHO ने लागू केले 42 दिवसांचे ‘हे’ कडक निर्बंध

PCOS दिशाभूल करणारे नाव

तज्ञांच्या मते, ‘पीसीओएस’ हे नाव दिशाभूल करणारे होते. या विकारात अंडाशयात ‘सिस्ट’ तयार होतात, असा गैरसमज दीर्घकाळ राहिला. प्रत्यक्षात हा विकार केवळ अंडाशयांपुरता मर्यादित नसून हार्मोन्स, चयापचय प्रक्रिया, प्रजनन क्षमता, मानसिक आरोग्य आणि शरीरातील इतर अंतःस्रावी ग्रंथींवरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे नव्या नावात ‘पॉलीएंडोक्राइन’ आणि ‘मेटाबॉलिक’ या शब्दांचा समावेश करण्यात आला आहे.

संशोधनात भारताचा महत्त्वपूर्ण सहभाग

या जागतिक प्रक्रियेत भारताचाही महत्त्वपूर्ण सहभाग होता. भारतीय सहाय्यक प्रजनन संस्था (इंडियन सोसायटी फॉर असिस्टेड रिप्रॉडक्शन)च्या अध्यक्षपदाच्या निवडीत असलेल्या डॉ. माधुरी पाटील यांनी सांगितले की, २२ हजारांहून अधिक प्रतिसाद, कार्यशाळा, रुग्णांचे अनुभव आणि ५६ वैद्यकीय व रुग्ण संस्थांच्या सहभागातून या बदलावर एकमत झाले.

त्यांच्या मते, भारतात या विकाराचे प्रमाण १६ ते १८ टक्क्यांदरम्यान असून ‘मेटाबॉलिक’ हा शब्द विशेष महत्त्वाचा आहे. कारण भारतात इन्सुलिन प्रतिकार, लठ्ठपणा आणि चयापचयाशी संबंधित विकारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. किशोरवयीन मुलींमध्येही या विकाराची लक्षणे दिसू शकतात.

अंडाशयात नेमकं काय घडतं?

या संशोधनातील तज्ञांनी स्पष्ट केले की, मासिक पाळीच्या प्रत्येक चक्रात अंडाशयात अनेक फॉलिकल्स तयार होतात. त्यापैकी एक परिपक्व होऊन अंडोत्सर्जन होते. मात्र या विकारात ही प्रक्रिया अर्धवट थांबते आणि अनेक अपरिपक्व फॉलिकल्स अंडाशयात राहतात.

अल्ट्रासाऊंडमधून स्पष्ट

अल्ट्रासाऊंडमध्ये हे छोटे द्रवयुक्त गोलाकार भाग ‘सिस्ट’सारखे दिसतात. त्यामुळे पूर्वी या विकाराला ‘पॉलिसिस्टिक’ असे नाव देण्यात आले होते. प्रत्यक्षात ते खरे सिस्ट नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

PMOS ची लक्षणे आणि आरोग्यातील धोका

‘पीएमओएस’मुळे अनियमित मासिक पाळी, वंध्यत्व, वजन वाढ, चेहऱ्यावर व शरीरावर अतिरिक्त केस, मुरूम, केस गळणे, चिंता, नैराश्य, गर्भधारणेतील गुंतागुंत, मधुमेह आणि हृदयरोगाचा धोका वाढू शकतो. जगभरातील सुमारे प्रत्येक आठ महिलांपैकी एका महिलेला या विकाराचा सामना करावा लागत असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले.

Hantavirus: नक्की कुठून सुरू झाला हंता व्हायरस? किती धोकादायक, या नावामागील काय आहे कहाणी

💡

Frequently Asked Questions

  • Que: PCOS चे नाव बदलून आता काय करण्यात आले आहे?

    Ans: महिलांमध्ये आढळणाऱ्या ‘पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम’ (पीसीओएस) या विकाराचे नाव बदलून आता ‘पॉलीएंडोक्राइन मेटाबॉलिक ओव्हेरियन सिंड्रोम’ (पीएमओएस) असे करण्यात आले आहे.

  • Que: PCOS चे नाव बदलण्याचे कारण काय आहे?

    Ans: PCOS या नावामुळे हा आजार अंडाशयातील सिस्ट (गाठी) मुळे होतो असा गैरसमज होता. पण प्रत्यक्षात हा विकार अंडाशायापुरता मर्यादित नसून हार्मोन्स आणि चयापचय प्रक्रियेशी (Metabolism) संबंधित आहे. यामुळे हे नाव बदलण्यात आले आहे.

Web Title: Women menstrual health news pcos renamed pmos hormonal disorder new name

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 03:11 PM

Topics:  

  • Health News
  • Menstrual health
  • women health

संबंधित बातम्या

Prakash Abitkar: ‘गर्भलिंग निदान’ करणाऱ्यांवर मोक्काची टांगती तलवार; कायदा कडक करण्याची तयारी
1

Prakash Abitkar: ‘गर्भलिंग निदान’ करणाऱ्यांवर मोक्काची टांगती तलवार; कायदा कडक करण्याची तयारी

Russia Plague Scare : रशियात न्यूमोनिक प्लेगची भीती? प्रयोगशाळेत कर्मचाऱ्याचा मृत्यू, 200 जण क्वारंटाईन
2

Russia Plague Scare : रशियात न्यूमोनिक प्लेगची भीती? प्रयोगशाळेत कर्मचाऱ्याचा मृत्यू, 200 जण क्वारंटाईन

Menstrual Leave: नेपाळचा ऐतिहासिक निर्णय! महिला सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार मासिक पाळीची रजा; भारतात काय आहेत नियम?
3

Menstrual Leave: नेपाळचा ऐतिहासिक निर्णय! महिला सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार मासिक पाळीची रजा; भारतात काय आहेत नियम?

Infertility: वंध्यत्व उपचारांसाठी मोठी सुविधा! प्रगत प्रजनन उपचारांची उपलब्धता होणार अधिक सक्षम, जाणून घ्या सविस्तर
4

Infertility: वंध्यत्व उपचारांसाठी मोठी सुविधा! प्रगत प्रजनन उपचारांची उपलब्धता होणार अधिक सक्षम, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.