Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिला दिनानिमित्त स्वतःला द्या एक खास गिफ्ट, भारतात एकट्याने फिरण्यासाठी सुरक्षित आहेत ही 5 ठिकाणं

८ मार्च हा दिवस स्त्रीशक्तीचा सन्मान करण्याचा दिवस मानला जातो. महिला दिनानिमित्त आम्ही तुम्हाला देशातील अशा काही सुंदर ठिकाणांची माहिती सांगत आहोत जिथे महिला एकट्याने मोकळेपणाने फिरू शकतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 08, 2026 | 09:06 AM
महिला दिनानिमित्त स्वतःला द्या एक खास गिफ्ट, भारतात एकट्याने फिरण्यासाठी सुरक्षित आहेत ही 5 ठिकाणं

महिला दिनानिमित्त स्वतःला द्या एक खास गिफ्ट, भारतात एकट्याने फिरण्यासाठी सुरक्षित आहेत ही 5 ठिकाणं

Follow Us
Close
Follow Us:
  • देशात अशी अनेक पर्यटनस्थळे आहेत जिथे महिला सुरक्षितपणे एकट्यानेही प्रवास करू शकतात.
  • शांत वातावरण, निसर्गसौंदर्य आणि सुरक्षितता यामुळे ही ठिकाणे सोलो ट्रिपसाठी विशेष लोकप्रिय मानली जातात.
  • कामाच्या रुटीनमधून थोडा ब्रेक घेऊन स्वतःसाठी वेळ काढण्यासाठी अशी ट्रिप उत्तम पर्याय ठरू शकते.
८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी स्त्री शक्तीचा सन्मान केला जातो. आज महिला प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहेत मग ते रिक्षा चालवणं असो, नोकरी असो किंवा विमान चालवणं असो… कोणत्याही क्षेत्रात महिलांचे योगदान कमी नाही. आपल्याला माहितीच असेल की काम करणारी प्रत्येक महिला ही फक्त पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कामच करत नाही तर तितक्याच जबाबदारीने घरातील कामही पार पडते. घरातील कामे करुन जाॅब करणं म्हणजे तारेवरची कसरतच असते पण कधीही महिलांचे यासाठी काैतुक केले जात नाही आणि म्हणूनच दरवर्षी ८ मार्च रोजी महिला दिन साजरा केला जातो.

भद्रकालीचे अद्भुत मंदिर जिथे देवीच्या डोळ्यात लावला होता कोहिनूर हिरा, जाणून घ्या इंग्रजांपर्यंत कसा पोहचला…

आज या लेखात महिला दिनानिमित्त आम्ही तुम्हाला देशातील अशा काही ठिकाणांविषयी सांगणार आहोत जिथे महिला एकट्यानेही कोणत्याही चिंतेशिवाय भ्रमंती करु शकतात. अनेकदा कामाच्या रुटीनमधून काहीवेळ आपल्याला स्वत:साठी काढून एका छानशा ट्रीपचा आनंद लुटायला हवा आणि यासाठीच सोले ट्रिप एक उत्तम पर्याय ठरते.

पुद्दुचेरी

फ्रेंच संस्कृती आणि शांत समुद्रकिनाऱ्यांसाठी पुद्दुचेरी हे ठिकाण फार लोकप्रिय आहे. महिला एकट्याने सुरक्षित या ठिकाणी फिरू शकता. येथील सुंदर आणि रंगीबेरंगी रस्त्यांवरून सायकलिंग करणे, फ्रेंच कॅफेमध्ये कॉफीचा आस्वाद घेणे आणि ऑरोव्हिलची शांतता अनुभवणे तुम्हाला खरोखरच शांत अनुभव देईल.
इथे वातावरण एकदम शांत आणि सुरक्षित आहे, ज्यामुळे मोकळ्या मानाने तुम्ही इथे फिरू शकता.

उदयपूर, राजस्थान

“तलावांचे शहर” म्हणून ओळखले जाणारे उदयपूर हे केवळ त्याच्या शाही सौंदर्यासाठीच नाही तर त्याच्या अद्भुत आदरातिथ्यासाठी देखील ओळखले जाते. तुम्ही इथे राजवाडे, बाजारपेठ आणि काही ऐतिहासिक स्थळांना भेट देऊ शकता. राजस्थानी संस्कृती तुम्हाला घरी असल्यासारखे वाटेल आणि दिवसा एकटे प्रवास करणे खूप सुरक्षित मानले जाते.

ऋषिकेश, उत्तराखंड

उत्तराखंडमधील ऋषिकेश हे एक लोकप्रिय धार्मिक स्थळ आहे. परदेशातूनही लोक इथे फिरायला येतात. शांताता आणि आत्मिक शांतीच्या शोधात असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी एक योग्य पर्याय ठरते. गंगा नदीकाठी कॅफेमध्ये बसणे, योग आश्रमांमध्ये वेळ घालवणे आणि संध्याकाळी भव्य गंगा आरती पाहणे तुमचा प्रवास संस्मरणीय बनवेल. येथील आध्यात्मिक वातावरण महिलांसाठी एक सुरक्षित आश्रयस्थान निर्माण करते.

Goa Tour Package : आता स्वस्तात करा गोव्याची सफर, फक्त 15,000 रुपयांत खाण्या-पाण्याची, राहण्याची होईल सोय…

शिलाँग, मेघालय

भारताचे स्कॉटलँड म्हणून ओळखले जाणारे शिलॉंग हे नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. मेघालयचे वैशिष्ट्य असे आहे की इथे घराची प्रमुख महिला मानली जाते. म्हणूनच हे ठिकाण महिलांना एकट्याने फिरण्यासाठी एक चांगला पर्याय ठरते.

मुन्नार, केरळ

हिरवीगार चहाची बाग , धुक्याच्या दऱ्या आणि शांत वातावरण या सर्वच गोष्टींमुळे मुन्नार हे निसर्गप्रेमींसाठी एक स्वर्ग आहे. केरळ पर्यटन त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत अत्यंत कडक आणि सतर्क आहे, ज्यामुळे ते महिलांसाठी एक अद्भुत आणि सुरक्षित ठिकाण बनले आहे. इथे तुम्ही निसर्गसौंदर्याचा अनुभव घेऊ शकता तसेच ट्रेकिंग आणि आयुर्वेदिक मालिशचाही आनंद लुटू शकता.

 

Web Title: Womens day special know indias safest places to visit solo travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 09:05 AM

Topics:  

  • places to visit
  • travel news
  • womens day

संबंधित बातम्या

Travel Trend 2026 : महागडे स्पॉट सोडून आता स्वस्त ठिकाणांकडे अधिक वळू लागलेत पर्यटक, जाणून घ्या कारण
1

Travel Trend 2026 : महागडे स्पॉट सोडून आता स्वस्त ठिकाणांकडे अधिक वळू लागलेत पर्यटक, जाणून घ्या कारण

सामन्यांना परवडणार नाही या ट्रेन्सचा प्रवास! जगातील 5 Luxury Trains ज्यांचं तिकिट खरेदी करण्यात वर्षभराची कमाई होईल खर्च…
2

सामन्यांना परवडणार नाही या ट्रेन्सचा प्रवास! जगातील 5 Luxury Trains ज्यांचं तिकिट खरेदी करण्यात वर्षभराची कमाई होईल खर्च…

17 व्या शतकातील ते महल जिथे झाली होती भूल भुलैयाची शूटिंग, जाण्यासाठी किती पैसे लागतात? जाणून घ्या
3

17 व्या शतकातील ते महल जिथे झाली होती भूल भुलैयाची शूटिंग, जाण्यासाठी किती पैसे लागतात? जाणून घ्या

भारताची जादुई ट्रेन… 88 स्टॉपेज आणि 9 राज्यांमधून करते प्रवास, या सर्वात मोठ्या रूटने बनवलाय रेकॉर्ड
4

भारताची जादुई ट्रेन… 88 स्टॉपेज आणि 9 राज्यांमधून करते प्रवास, या सर्वात मोठ्या रूटने बनवलाय रेकॉर्ड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.