Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 28 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

घरातील लाकडी फर्निचरला अचानक वाळवी लागल्यास ती नष्ट करण्यासाठी सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय कोणते? जाणून घ्या

घरातील लाकडी फर्निचरला वाळवी लागल्यामुळे तुमचे लाकूड आतून पूर्णपणे पोकळ आणि खराब होत आहे का? केमिकलशिवाय घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या सोप्या साहित्याचा वापर करून वाळवीला कायमचे कसे नष्ट करावे?लगेच घ्या जाणून

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 28, 2026 | 11:30 AM
घरातील लाकडी फर्निचरला अचानक वाळवी लागल्यास ती नष्ट करण्यासाठी सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय कोणते? जाणून घ्या
Follow Us
Follow Us:
  • कडुनिंबाच्या पानांचा रस किंवा पावडर वापरल्याने वाळवी नष्ट होऊन फर्निचर सुरक्षित राहण्यास मदत होते.
  • व्हिनेगर आणि लिंबाचा रस एकत्र करून फवारल्यास वाळवी कायमची नष्ट होण्यास मोठी मदत मिळते.
  • लाकडी फर्निचर काही तास कडक उन्हात ठेवल्याने उष्णतेमुळे वाळवी आणि त्यांच्या अळ्या नष्ट होतात.

घरातील लाकडी फर्निचरला वाळवी लागणे ही एक भलतीच मोठी समस्या असते. वाळवी ही अशी कीटक आहे जी हळूहळू लाकडाला आतून पोखरून पूर्णपणे नष्ट करते. जर तुमच्याही घरातील लाकडी कपाट, बेड किंवा सोफ्याला वाळवी लागली असेल, तर काही सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय करून तुम्ही त्यावर कंट्रोल मिळवू शकता. हे उपाय अत्यंत साधे असून त्यासाठी महागड्या रसायनांची गरज भासत नाही.

कडुनिंबाच्या पानांचा किंवा पालापाचोळ्याचा वापर

कडुनिंबामध्ये जंतुनाशक आणि कीटकनाशक गुणधर्म असतात, जे वाळवीला दूर ठेवण्यासाठी खूप प्रभावी ठरतात. यासाठी कडुनिंबाची पाने वाळवून त्याची पावडर बनवू शकता किंवा कडुनिंबाची पाने पाण्यात उकळून ते पाणी थंड करून वाळवी लागलेल्या भागात स्प्रे करू शकता. कडुनिंबाच्या तीव्र वासाने वाळवी नष्ट होते आणि ती लाकडापासून दूर राहते.

कामाच्या वेळी सतत झोप आणि आळस येतोय? नेहमी फ्रेश राहण्यासाठी हे नैसर्गिक पर्याय वापरून पाहा? जाणून घ्या

पांढरा व्हिनेगर आणि लिंबाचा रस

व्हिनेगर वाळवी नष्ट करण्यासाठी एक रामबाण उपाय मानला जातो. अर्धा कप पांढऱ्या व्हिनेगरमध्ये दोन ते तीन लिंबाचा रस चांगल्या प्रकारे मिसळा. हे मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि जिथे वाळवी लागली आहे किंवा लाकडाला प्लाईवुडला छिद्रे पडली आहेत, तिथे फवारा. हा उपाय नियमितपणे केल्यास वाळवी कायमची नष्ट होण्यास मदत होते.

खोबरेल तेल आणि नीलगिरीचे तेल

खोबरेल तेल आणि नीलगिरीच्या तेलाचे मिश्रण वाळवीसाठी विषारी ठरते. थोडे खोबरेल तेल गरम करून त्यात नीलगिरीच्या तेलाचे काही थेंब टाका. हे तेल कापसाच्या मदतीने वाळवी लागलेल्या लाकडी भागावर आणि छिद्रांमध्ये लावा. यामुळे वाळवी गुदमरून मरते आणि लाकडाला चमकही मिळते.

सासरच्या लोकांमुळे नवरा-बायकोच्या नात्यामध्ये सतत वाद होतात? मग फॉलो करा ‘या’ टिप्स, भांडण होतील कमी

सूर्यप्रकाशात फर्निचर ठेवणे

वाळवीला अंधारी आणि दमट जागा खूप आवडते. जर तुमचे लाकडी फर्निचर हलण्यासारखे असेल, तर कडक उन्हामध्ये काही तासांसाठी उन्हात ठेवा. सूर्यप्रकाशातील उष्णता आणि अतिनील किरणे वाळवी आणि त्यांच्या अळ्या नष्ट करतात.

बोरिक पावडरचा वापर

बोरिक पावडर ही एक प्रकारची नैसर्गिक कीटकनाशक पावडर आहे. ही पावडर वाळवीच्या जागी किंवा लाकडाच्या भेगांमध्ये टाकल्यास वाळवी नष्ट होते.

या घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही तुमच्या लाकडी फर्निचरचे वाळवीपासून रक्षण करू शकता. जर वाळवीचे प्रमाण खूप जास्त असेल, तर मात्र तज्ज्ञांची मदत घेणे योग्य ठरेल.

Web Title: Wooden furniture termite control home remedies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • LIFESTYLE

संबंधित बातम्या

स्मार्टफोन, लॅपटॉप स्क्रीन मधून निघणारे रेडिएशन कमी करण्याचे हे आहेत काही सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!
1

स्मार्टफोन, लॅपटॉप स्क्रीन मधून निघणारे रेडिएशन कमी करण्याचे हे आहेत काही सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

कामाच्या वेळी सतत झोप आणि आळस येतोय? नेहमी फ्रेश राहण्यासाठी हे नैसर्गिक पर्याय वापरून पाहा? जाणून घ्या
2

कामाच्या वेळी सतत झोप आणि आळस येतोय? नेहमी फ्रेश राहण्यासाठी हे नैसर्गिक पर्याय वापरून पाहा? जाणून घ्या

सासरच्या लोकांमुळे नवरा-बायकोच्या नात्यामध्ये सतत वाद होतात? मग फॉलो करा ‘या’ टिप्स, भांडण होतील कमी
3

सासरच्या लोकांमुळे नवरा-बायकोच्या नात्यामध्ये सतत वाद होतात? मग फॉलो करा ‘या’ टिप्स, भांडण होतील कमी

श्रावण सोमवार आणि सत्यनारायण पूजेचे काय आहे विशेष महत्त्व? जाणून घ्या शास्त्रीय अर्थ
4

श्रावण सोमवार आणि सत्यनारायण पूजेचे काय आहे विशेष महत्त्व? जाणून घ्या शास्त्रीय अर्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.