ऑटिझम म्हणजे काय? लहान मुलांमध्ये दिसून येणाऱ्या गंभीर आजाराची लक्षणे
संयुक्त राष्ट्र संघाच्या घोषणेनंतर दरवर्षी २ एप्रिल रोजी जागतिक ऑटिझम जागरूकता दिन साजरा केला जातो. हा एक मानसिक आजार आहे जो पहिल्यांदा मुलांमध्ये दिसून आला होता. ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असलेल्या व्यक्तींसाठी जागरूकता, स्वीकृती आणि समर्थनास प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. ऑटिझम असलेल्या मुलांना त्यांच्या समवयस्कांशी आणि सर्वसामान्य लोकांशी संवाद साधण्यात अनेक अडचणी येतात.(फोटो सौजन्य – istock)
तज्ज्ञांच्या मते, ऑटिझम हा एक प्रकारचा मानसिक विकार आहे. मुलांमध्ये हा आजार १-३ वर्षांच्या दरम्यान सुरू होतो. या आजारामुळे मुलांच्या मेंदूचा योग्य विकास होत नाही. एकदा हा आजार आढळला की तो लवकर बरा होऊ शकत नाही. यामुळे मुलांचा मेंदू संकुचित होतो. त्यामुळे मुलं कुटुंब आणि मित्रांपासून दूर राहू लागतात. ऑटिज्म आजार नक्की का होतो याबाबत अजूनही तितकीशी ठोस माहिती नाही. मात्र अनुवंशिकता आणि गरोदर असताना जर अति ताण असेल तर बाळाच्या मेंदूवर त्याचा परिणाम होऊन ऑटिज्म आजार होण्याची शक्यता असते. बाळ जन्माला आल्यानंतर त्वरीत या आजाराबाबत कळत नाही. नंतर हळू-हळू याबाबत कळते.






