सायकल चालविण्याचे फायदे (फोटो सौजन्य - iStock)
सायकल हे फक्त मनोरंजनाचे साधन नाही. आपण लहान असताना अनेकदा आपल्या पालकांकडून सायकलचा आग्रह धरतो कारण त्याच्या मदतीने आपण आपल्या मित्रांसोबत इकडे तिकडे फिरू शकतो किंवा कुठेही जाणं सोपं वाटतं आणि सुट्टीच्या दिवसात सायकल चालविण्याची मजाच काही और असते.
जुन्या काळात सायकल हे एक साधन होते, ज्यासाठी लोक दूरवर जायचे. जरी आजही सायकलचा वापर केला जात आहे तरीही आधुनिक जीवनशैलीत, हळू चालणाऱ्या सायकलींची मागणी थोडी कमी झाली आहे. सायकल हे फक्त प्रवासाचे साधन नाही. हे दुचाकी वाहन तुम्हाला अनेक आजारांपासून वाचवण्यासदेखील मदत करते. हो, रक्तदाब, हृदयाचे आरोग्य आणि ताण कमी करण्यासाठी सायकलिंग हा सर्वोत्तम पर्याय आहे, ज्याचा आपण आपल्या दैनंदिन जीवनात समावेश करू शकतो. आज जागतिक बायसिकल डे आहे आणि या निमित्ताने आपण योग प्रशिक्षक दीक्षा दाभोळकर यांच्याकडून फायदे जाणून घेऊया (फोटो सौजन्य – iStock)
काय आहे थीम
यावर्षी कोणती थीम
दरवर्षी 3 जून रोजी जागतिक सायकल दिन साजरा केला जातो. प्रदूषणमुक्त पर्यावरणाला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. परंतु सायकल दिनाचे महत्त्व आपल्या आरोग्याशी देखील संबंधित आहे. या वर्षी या दिवसाची थीम सायकलिंगद्वारे आरोग्य, समानता आणि शाश्वतता वाढवणे आहे.
हृदयरोग ठेवते दूर
हृदयाचे होते रक्षण
नियमित सायकलिंग केल्याने हृदयाचे ठोके नियंत्रित होतात आणि रक्ताभिसरण सुधारते. यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते आणि हृदयाच्या धमन्या स्वच्छ राहण्यास मदत होते. दररोज सायकलिंग केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते आणि हृदयरोगाचा धोका ४०-५०% कमी होतो. यासाठी तुम्ही स्वतःसाठी वेळ काढायला हवा
लठ्ठपणा
लठ्ठपणा दूर करण्यासाठी चालवा सायकल
भारतात लठ्ठपणा हा एक नवीन रोग पसरत आहे. पंतप्रधान मोदींनीही भारतात या आजाराच्या वाढीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. लठ्ठपणाची समस्या खूप वाढली आहे, विशेषतः लहान मुलांमध्ये अधिक दिसून येत आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही दररोज फक्त अर्धा ते १ तास सायकल चालवली तर शरीरात जमा होणारी चरबी झपाट्याने कमी होते. त्यामुळे चयापचय गतिमान होतो आणि चरबी जाळण्यास मदत होते. मुलांना सायकल चालविण्यास प्रवृत्त करा
सायकल चालवण्याचे आरोग्यदायी फायदे; शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उत्तम व्यायाम
टाइप २ मधुमेह
डायबिटीसपासून दूर राहण्यासाठी चालवा सायकल
सायकल चालवल्याने स्नायूंमध्ये इन्सुलिनची कार्यक्षमता वाढते. हा आजार लोकांमध्येही खूप वाढू लागला आहे. मधुमेह किंवा साखर हा देखील एक जीवनशैलीचा आजार आहे, जो केवळ एका कारणामुळेच नाही तर अनेक अस्वास्थ्यकर जीवनशैलीच्या सवयींमुळे होतो. तो लठ्ठपणा आणि शारीरिक हालचालींच्या अभावामुळे देखील होतो. दररोज सायकल चालवल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते आणि टाइप-२ मधुमेह टाळता येतो.
उच्च रक्तदाब
हाय ब्लड प्रेशरपासून मिळेल सुटका
सायकल चालवल्याने ताण कमी होतो, हृदयाचे ठोके सामान्य होतात. यामुळे बीपीची समस्या देखील सुधारते. उच्च रक्तदाब ही देखील जीवनशैलीशी संबंधित आरोग्य समस्या आहे. यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. उन्हाळ्यात उच्च रक्तदाबामुळे आणखी समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून दररोज सायकलिंग करा.
तुमचे जीवन त्रस्त आहे का? फक्त इतका वेळ चालवा सायकल; लाभेल निरोगी आयुष्य
नैराश्य आणि ताण
सायकलिंगमुळे नैराश्य होईल दूर
सायकल चालवल्याने एंडोर्फिन (आनंदाचे संप्रेरक) ची पातळी वाढते, ज्यामुळे मूड चांगला राहतो. दररोज सायकलिंग केल्याने नैराश्य, चिंता आणि एकाकीपणाशी लढण्यास मदत होते. मानसिक आरोग्य वाढवण्यासाठी आणि लक्ष केंद्रित करण्यासाठी, नियमितपणे सायकलिंगदेखील केले पाहिजे. या 5 आजारांसाठी तर तुम्ही नक्कीच रोज सायकल चालवणे गरजेचे आहे.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.