फोटो सौजन्य - Social Media
आताच्या काळी लोकं जवळच्या ठिकाणी जाण्यासाठी देखील गाड्यांचा पर्याय निवडतात. शरीराची जास्त हालचाल न केल्याने शरीर अनेक विकारांना आमंत्रण देतो, ज्याने आपले आरोग्य तर बिघडतेच तसेच आपल्या शरीराला आळसपणाची सवय लागते. या सवयीने माणूस पूर्णपणे विकरांच्या आहारी जातो. त्यामुळे डॉक्टर तसेच बरीच तज्ज्ञमंडळी नेहमी चालण्याचा संदेश देतात. जरी गाडी वापरायचीच असेल तर सायकलचा वापर करण्यास सांगतात. जपान, कोरिया तसेच बऱ्याच देशांमध्ये लोकं सायकलचा नियमित वापर करतात. त्यामुळे तेथील वृद्ध माणसाचे वयदेखील दिसून येत नाही. गाड्यांपेक्षा सायकलचा वापर केल्याने शरीराचा बऱ्यापैकी व्यायाम होतो. तसेच शरीरातील अतिरिक्त चरबी निघून जाते.
जर तुम्हीही आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आणि विकार टाळण्यासाठी दररोज सायकल चालवण्याचा निर्धार करत आहात, तर हे लेख पूर्ण नक्की वाचा. आपण जेव्हा दररोज सायकल चावण्याचा निर्धार करतो तेव्हा सगळ्यात पहिले मनात प्रश्न येतो तो म्हणजे दररोज किती वेळ सायकल चालवले पाहिजे? तर दररोक सायकल किमान ३० मिनिटे चालवले पाहिजे. सायकल चालवण्याचे अनेक फायदे असतात. तर चला मग, जाणून घेऊया दररोज किमान ३० मिनिटे सायकल चालवण्याचे फायदे:
सायकल चालवणे एक चांगले कार्डिओ एक्सारसाईज आहे. सायकल चालविल्याने हृदयाच्या धडकण्याच्या गतीत वाढ होते. शरीरात रक्तप्रवाह वाढतो. त्याचप्रमाणे ऑक्सिजन लेव्हलही वाढते. त्यामुळे हृदयविकारापासून व्यक्ती दूर राहतो. विशेष म्हणजे दररोज सायकल चालविल्याने शरीरतील फॅट बऱ्यापैकी कमी होतो, ज्याने वजन अगदी प्रमाणात येते. सायकल चालवण्याचा जास्त प्रभाव पायावर पडतो. एकाच गतीमध्ये पाय वर खाली केल्याने पायाच्या मांसपेशी मजबूत होतात. सायकल चालविल्याने संपूर्ण शरीराचे आरोग्य चांगले राहते तसेच व्यक्ती मानसिक तणावापासून दूर राहतो.